कँश फ्लो स्टेटमेंट विषयी माहीती Cash flow statement information in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

कँश फ्लो स्टेटमेंट विषयी माहीती Cash flow statement information in Marathi

मित्रांनो कुठल्याही कंपनीची आर्थिक परिस्थिती, बाजारातील सध्याची असलेली त्या कंपनीची कामगिरी कशी आहे?

अणि त्या कंपनीचे शेअर खरेदी करणे आपल्यासाठी किती फायद्याचे अणि तोटयाचे ठरेल हे जाणुन घेण्यासाठी म्हणजेच विश्लेषण करण्यासाठी गुंतवणुकदारांकडुन पुढील तीन महत्वाच्या स्टेटमेंटचा वापर केला जात असतो.

1)ताळेबंद -balance sheet

2) उत्पन्न विधान- income statement

3) रोख प्रवाह विवरण -cash flow statement

वरील तिघांपैकी दोन स्टेटमेंटविषयी मागील दोन लेखात आपण माहीती जाणुन घेतली.

आता आजच्या लेखात आपण रोख प्रवाह विवरण म्हणजेच कँश फ्लो स्टेटमेंट विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

कँश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय?

कँश फ्लो स्टेटमेंट हे कंपनीच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीचे बाजारातील कामगिरीचे एक आर्थिक विवरण असते.

कंपनीचे कँश फ्लो स्टेटमेंट कुठे दिले जाते?

कंपनीकडुन दरवर्षी सादर केल्या जात असलेल्या त्यांच्या वार्षिक अहवालामध्ये हे कँश फ्लो स्टेटमेंट नेहमी दिले जात असते.

कँश फ्लो स्टेटमेंट कंपनीकडुन का तयार केले जाते?

वार्षिक अहवालात दिलेल्या कँश फ्लो स्टेटमेंटमध्ये कंपनीकडुन हे दिले जात असते की सदर कंपनीकडे एका ठरलेल्या निश्चित कालावधीत किती रक्कम आली.कुठुन आली तसेच किती रक्कम कंपनीच्या बाहेर गेली आहे.

तसेच ठरलेल्या एका निश्चित कालावधीत कंपनीमध्ये नियमित जी रक्कम येते आहे तिच्यात सध्याच्या चालु वर्षात काय अणि किती बदल घडुन आला आहे.

See also  पोलिस शिपाई चालक आणि पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेची तारीख घोषित - Maharashtra police bharti written exam date 2023 in Marathi

कँश फ्लो स्टेटमेंटचे महत्व –

कँश फ्लो स्टेटमेंटदवारे गुंतवणुकदार हे विश्लेषण करून जाणुन घेऊ शकतो की कंपनीत कुठुन पैसे येतो आहे? अणि कंपनीचे पैसे कुठे जाता आहे?

कंपनीला आपल्या दैनंदिन जीवणातील विविध पेमेंट करण्यासाठी कँशचाच आधार घ्यावा लागत असतो.

उदा,कंपनीमधील कर्मचारींची सँलरी,रोजच्या दैनंदिन जीवणातील कंपनीतील इतर महत्वाच्या खर्चाचें पेमेंट इत्यादी.

अणि जर कंपनीला कँशमध्ये पेमेंट करत असताना आपला प्राँफिट प्राप्त होत नसेल तसेच मिळविता येत नसेल तर ही कंपनीसाठी चिंतेची गोष्ट ठरू शकते.

हे कँशचे महत्व कंपनीमध्ये गुंतवणुक करत असलेल्या प्रत्येक तज्ञ गुंतवणुकदारांना माहीत असते.

म्हणुन गुंतवणुकदार कुठल्याही कंपनीत आपले पैसे गुंतविण्याच्या अगोदर त्या कंपनीचे कँश फ्लो स्टेटमेंटचे नीट,व्यवस्थित बारकाईने विश्लेषण करीत असतात.
कारण यात कंपनीकडे येणारया अणि कंपनीकडुन बाहेर जाणारया सर्व कँश पेमेंटची तपशीलवार माहीती दिलेली असते.

कारण समजा एखादी कंपनी नफ्यात आहे पण तिचे कँश फ्लो स्टेटमेंट व्यवस्थापित नसेल तर प्राँफिटमध्ये असुन देखील कंपनीला आर्थिक अडी अडचणीला सामोरे जावे लागु शकते.

उदा,एखादी कंपनी आहे जिचे आँपरेटिंग अँक्टीव्हीटीमधील कँश फ्लो हे निगेटिव्ह जात असेल तर याचा अर्थ असा होतो की कंपनीकडुन आपल्या प्रोडक्ट सर्विसची जी विक्री केली जात आहे.
त्यातुन त्या कंपनीचा साधा खर्च देखील निघत नाहीये.अशा वेळी त्या कंपनीला आपला खर्च भागविण्यासाठी आपल्या इतर गुंतवणुकीचा वापर करावा लागत असतो.

म्हणुन गुंतवणुकदार कुठल्याही कंपनीत गुंतवणुक करण्याआधी त्या कंपनीच्या कँश फलों स्टेटमेंटचा सखोल अभ्यास करीत असतात.

कारण याने गुंतवणुकदारांना हे कळते की ती कंपनी सध्या किती फायद्यात अणि तोटयात आहे त्यांची सध्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे?कंपनीकडे किती रक्कम शिल्लक आहे.

याचसोबत गुंतवणुकदारांनी हे देखील बघायले हवे की आपण गुंतवणुक करतो आहे त्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसची बाजारात सध्या किती मागणी आहे?भविष्यात त्याला किती मागणी राहणार आहे.मगच तिथे गुंतवणुक करावी अन्यथा नाही.

See also  आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज गौरव, कधी, कुठे जाणून घ्या । Appasaheb Dharmadhikari is honored today

कँश फ्लो स्टेटमेंट बनवण्याचा कंपनीला होणारा वैयक्तिक फायदा –

● कँश फ्लो स्टेटमेंटदवारे कंपनीला हे कळत असते की त्यांचा सर्व पैसा कंपनीतील कोणत्या कामात कोणत्या प्रोडक्ट सर्विसमध्ये खर्च केला जातो आहे.तसेच त्यांच्या व्यवसायातील कोणते प्रोडक्ट सर्विस, व्यवसाय प्रक्रिया त्यांना अधिक नफा,पैसे कमावून देत आहे.

आँपरेटिंग अँक्टिव्हीटी कशाला म्हणतात?

कंपनीच्या व्यवसायातील कुठल्याही प्रक्रियेला आँपरेटिंग अँक्टिव्हीटी असे म्हटले जाते.

उदा,कंपनीसाठी माल खरेदी करणे,कंपनीच्या मालाची विक्री करणे,पेमेंट पाठविणे,पेमेंटची वसुली करणे इत्यादी.

इन्वहेस्टमेंट अँक्टिव्हीटी कशाला म्हणतात?

इन्वहेस्टमेंट अँक्टिव्हीटी मध्ये अशा कँशचा समावेश केला जात असतो जी कँश कंपनीला गुंतवणुकीदवारे प्राप्त झाली आहे.

फायनान्शिअल अँक्टीव्हीटी कशाला म्हणतात?

फायनान्शिअल अँक्टिव्हीटी मध्ये अशा कँशचा समावेश केला जात असतो जी कँश कंपनीला आर्थिक व्यवहारादवारे प्राप्त झाली आहे.

कंपनीच्या कँश फ्लोची गणना कशी केली जाते?

कंपनीच्या कँश फ्लोची गणना ही दोन पदधतीने करता येत असते.

1)प्रत्यक्ष पदधत -direct method

2)अप्रत्यक्ष पदधत -indirect method

1)प्रत्यक्ष पदधत -direct method

यात कँश पेमेंट,सँलरी पेमेंट,कस्टमरकडुन मिळालेल्या पावत्या,सप्लायरला दिलेली कँश इत्यादींचा समावेश यात होत असतो.

यात कंपनीकडे जिथुन पैसा आला आहे त्या ठिकाणाला अँड केले जाते अणि कंपनीकडुन जिथे पैसे जात आहे त्या ठिकाणाला वजा केले जाते.

2)अप्रत्यक्ष पदधत -indirect method

यात सर्व कंपनीतील सर्व कँश फ्लोला गृहित धरले जात नसते यात फक्त ठरलेल्या एका निश्चित कालावधीमधील कंपनीचे नेट इन्कम गृहित धरले जाते.

मग सर्व कँशलेस व्यवहाराला पेमेंटला नेट इन्कममधुन वजा करण्यात येते.तेव्हाच आपणास टोटल कँश फ्लो मिळत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा