सर्टिफिकेट आॉफ डिपाझिट म्हणजे काय? Certificate of deposit meaning in Marathi

सर्टिफिकेट आॉफ डिपाझिट म्हणजे काय? Certificate of deposit meaning in Marathi

सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट म्हणजे ठेव प्रमाणपत्र.

हे एक असे वित्तीय साधन आहे ज्यात कमी जोखीम असते.सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट हे विविध शेडयुल कमर्शियल बँक तसेच भारतीय वित्तीय संस्थाकडुन त्यांच्या पैशांच्या गरजेनुसार जारी केले जाते.

सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट तसे पाहायला गेले तर एकदम बचत खात्याप्रमाणे असते.पण सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट चे एक फिक्स टर्म असते.हे टर्म एक वर्ष,तीन महिने तसेच सहा महिने इतके असते.

सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट हे इतर स्टाॅक तसेच बाॉण्डच्या तुलनेत अधिक सुरक्षित मानले जाते.कारण यात आपणास गॅरंटी रेट आॉफ इंटरेस्ट प्राप्त होत असतो.

सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिटची सेकंडरी मार्केट मध्ये सुदधा खरेदी विक्री केली जात असते.

आरबी आयकडुन वेळोवेळी नवनवीन मार्गदर्शक तत्वे सीडी करीता जाहीर केले जात असतात.जेणेकरून कुठलीही कंपनी कुठल्याही गुंतवणूकदाराचे पैसे बुडवू शकु नये.

सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिटला अजुन कोणत्या नावाने ओळखले जाते?

सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिटला सीडी ह्या नावाने देखील ओळखले जाते.

सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिटचा मुख्य हेतु काय असतो?

सर्टिफिकेट आपणास हे सांगत असते की आपण एका विशिष्ट कालावधीकरीता जे पैसे बँकेत जमा केले आहे.त्यावर बँक आपल्याला भरलेली रक्कम अणि कालावधीनुसार आपल्या ठेवीवर व्याज अणि पैशांची परतफेड करेल.

सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट भारतात १९८९ मध्ये जारी केले गेले.गुंतवणुकदारांना गुंतवणूक करण्यासाठी उत्तम प्रकारचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट भारतात जारी करण्यात आले होते.

See also  SOS विषयी माहीती - What dose SOS mean in Marathi

सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट कोणत्या स्वरुपात जारी केले जाते?

सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट हे डिजीटल,इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये जारी केले जाते.

सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट हे एक नेगोशिएबल म्हणजेच वाटाघाटी करण्यायोग्य साधन आहे.

सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट कधी जारी केले जाते?

सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट प्रामुख्याने तेव्हा जारी केले जाते जेव्हा बँक तसेच वित्तीय संस्थांना पैशांची अत्यंत गरज असते.तसेच हे तेव्हा जारी केले जाते जेव्हा बँकेतील कर्जाची मागणी खुप जास्त आहे व लोक आपले पैसे बँकेत जमा करू शकत नाहीये.

सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट कोणाला जारी करता येत नसते?

सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट हे फक्त भारतीय वित्तीय संस्था तसेच शेडयुल्ड कमर्शियल बँक जारी करू शकतात.रिझनल रूरल बँक RRB अणि लोकल एरिया बँक जारी करू शकत नसतात.

भारतीय वित्तीय संस्था मध्ये अशाच वित्तीय संस्था सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट जारी करू शकतात.ज्यांना आरबी आयकडुन अलप कालावधीत फंड गोळा जमा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट जारी करण्यासाठी त्यात फंड टाकणे आवश्यक असते.सर्टिफिकेट आॉफ डिपाॅझिट मध्ये कुठलाही व्यक्ती,काॉर्पोरेशन,कंपनी,एन आर आय सुदधा फंड टाकु शकतो.

डिपाँझिट म्हणजे काय?-Deposit meaning in Marathi