चंद्रयान ३ चे आज थेट प्रक्षेपण – Chandrayan 3 soft landing live update
भारतातील सर्वात मोठे अंतराळ संशोधन संस्था इस्रोने हातात घेतलेली चंद्रमोहीम आज अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे.
आज सायंकाळी चंद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.हया देशातील सर्वात मोठ्या मोहीमेचे सर्व शाळा महाविद्यालयात विद्यापीठात थेट प्रक्षेपण व्हावे असे निर्देश देखील युजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत.
त्यामुळे आता चंद्रयान ३ ची लॅडिग सर्व शाळा महाविद्यालयात विद्यापीठात देखील विद्यार्थ्यांना लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये बघायला मिळणार आहे.
याबाबतची अधिकृत सुचना देखील युजीसी कडुन सर्व विद्यापीठांना देण्यात आली आहे.युजीसीच्या आॅफिशिअल वेबसाईट वर याबाबतचे एक नोटीफिकेशन देखील देण्यात आले आहे.
आज २३ आॅगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजुन २० मिनिट झाल्यावर ह्या लॅडिगच्या प्रक्रियेस सुरूवात केली जाणार आहे.
सर्व भारतीयांना ह्या लॅडिगचे थेट प्रक्षेपण डीडी नॅशनल ह्या टीव्ही चॅनलवर पाहायला मिळणार आहे.याचसोबत विविध न्यूज चॅनलच्या युटयुब वर देखील ह्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे.
आपण त्यावर जाऊन देखील हे लाईव्ह प्रक्षेपण पाहु शकतात.
युजीसीकडुन असे देखील सांगितले गेले आहे की भारताच्या चंद्रयान ३ ची चंद्रावर लॅडिग होणे ही आपल्या देशासाठी अत्यंत अभिमानाची गौरवास्पद अणि अविस्मरणीय प्रसंग आहे.
आजच्या तरूण वर्गाच्या मनामध्ये नाविन्याची आवड निर्माण व्हावी म्हणून हे निर्देश युजीसीने दिले आहेत.
कुठे कुठे आपणास चंद्रयान ३ चे थेट प्रक्षेपण पाहायला मिळेल?
चंद्रयान ३ चे थेट प्रक्षेपण आपणास इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळ isro.gov.in. वर तसेच इस्रोचे अधिकृत युटयुब चॅनल isroofficial5866 अणि फेसबुक पेज ट्विटर अकाऊंट इत्यादी वर पाहायला मिळणार आहे.
याचसोबत डीडी नॅशनल ह्या टीव्ही चॅनलवर तसेच नॅशनल जिओग्राफीक इंडियाच्या अधिकृत युटयुब चॅनल वर देखील हे प्रक्षेपण आपणास पाहावयास मिळणार आहे.
याव्यतिरिक्त सर्व न्युज चॅनलच्या अधिकृत वेबसाईट वर तसेच आॅफिशिअल युटयुब चॅनल,फेसबुक पेज इत्यादी वर देखील आपणास हे लाईव्ह प्रक्षेपण स्ट्रीमिंग पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल.
सर्व नागरिकांना आपल्या स्मार्टफोन मोबाईल वरून देखील हे प्रक्षेपण लाईव्ह बघता येणार आहे.
जर आपणास चंद्रयान ३ ची लॅडिग सुरू झाल्याची सुचना आपल्या मोबाईल वर हवी असेल तर आपणास यासाठी isroofficial5866 ह्या इस्रोच्या अधिकृत युटयुब चॅनलला सबस्क्राईब करून नोटीफिकेशन बेल आॅन करावी लागेल.
यानंतर जेव्हा प्रक्षेपण सुरू होईल लगेच आपल्याला युटयुब वर एक नोटीफिकेशन पाठविण्यात येईल त्यावर क्लिक करून आपण हे लाईव्ह प्रक्षेपण पाहु शकतात.