एप्रिल २०२३ मध्ये आपणास हे महत्त्वाचे बदल होताना पाहायला मिळणार – Changes from 1st April

एप्रिल २०२३ मध्ये आपणास हे महत्त्वाचे बदल होताना पाहायला मिळणार

१)हाॅलमार्क केलेल्या दागिण्यांचीच विक्री आता होणार –
१ एप्रिल २०२३ पासुन आता फक्त हाॅलमार्क केलेल्या दागिण्यांचीच विक्री दुकानात होताना आपणास दिसून येणार आहे.

म्हणजे ज्या दागिण्यांवर डिजिटल गोल्ड हाॅलमार्क केलेले असेल एचयु आयडी नंबर दिलेला असेल तेच सोने किंवा चांदी दुकानांमध्ये आता विकले जाईल.

एचयु आयडी हा सहा अंकी अल्फा न्युमरीक युनिक आयडेंटीफिकेशन कोड आहे.यात अंक अणि अक्षर दोघे असणार आहेत.

सोने अणि चांदीची विक्री करत असलेल्या विक्रेत्यांनी जर १ एप्रिल २०२३ पासुन हा नियम पाळला नाही तर त्यांच्यावर शासनाकडुन कठोर कारवाई देखील केली जाणार आहे.

म्हणजे आता १ एप्रिल २०२३ पासुन आपणास हाॅलमार्क नसलेल्या सोने चांदी दागिण्यांची दुकानात विक्री होताना अजिबात दिसुन येणार नाही.

२) दिव्यांगांना शासनाकडुन मिळत असलेले लाभ प्राप्त करण्यासाठी युडीआयडी कार्ड बनवणे बंधनकारक असणार आहे.

आपल्या भारत देशातील दिव्यांग व्यक्तींसाठी भारत सरकारने अनेक कल्याणकारी अणि लाभदायक योजना सेवा सुविधा लागू केल्या आहेत.

अणि ह्या योजनांचा लाभ सरकारकडून सर्व दिव्यांग व्यक्तींना दिला देखील जात आहे.पण आता १ एप्रिल २०२३ पासुन जर आपणास हा दिव्यांग लाभ उठवायचा असेल तर आपल्याकडे युडी आयडी कार्ड असणे अनिवार्य तसेच बंधनकारक असणार आहे.

जर आपण देखील दिव्यांग आहात अणि शासनाकडुन दिव्यांगांना दिल्या जात असलेल्या सर्व सेवा सुविधा योजनांचा आपण लाभ घेत आहात अणि यापुढे देखील आपणास हा लाभ प्राप्त करायचा आहे तर आपणास युडीआयडी(unique disability identity card) कार्ड बनवणे अत्यंत आवश्यक असणार आहे.

युडीआयडी कार्ड हे अपंग दिव्यांग व्यक्तीचे ओळखपत्र असते.ज्यावरून शासनाला तो दिव्यांग आहे याची ओळख पटवुन घेता येते.

३) हाय प्रिमियम इन्शुरन्सवर टॅक्स लागु होणार आहे

आता शासन विमा इन्शुरन्सवर देखील टॅक्स आकारणार आहे.याबाबद २०२३ मध्ये करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की ज्यांच्या विम्याचा वार्षिक प्रिमियम पाच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना आपल्या विमा इन्शुरन्सवर कर भरावा लागेल.

See also  1-100 अंक अक्षरी गुजराती, इंग्रजी - Numbers 1 to 100 in Gujrati, English

४) वाहनांच्या किंमतीत वाढ होऊ शकते

१ एप्रिल २०२३ नंतर टाटा मोटर्स तसेच मारूती सिजुकी सारख्या वाहनांच्या किंमतीत अधिक वाढ होऊ शकते.१ एप्रिल २०२३ पासुन अनेक कंपन्या आपल्या वाहनांचे नवीन दर लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

५) गुंतवणुकदारांना डेब्ट म्युच्युअल फंड मध्ये एलटीसीजी टॅक्स बेनिफिट प्राप्त होणार नाही

जे गुंतवणुकदार १ एप्रिल २०२३ नंतर गुंतवणुक करतील अशा गुंतवणुकदारांना डेब्ट म्युच्युअल फंडवर आता एलटी सीजी(long term capital gain) (दीर्घकालीन भांडवली नफा) टॅक्स बेनिफिट प्राप्त होणार नाही.

६) गुंतवणुकदारांना एन एस ई(national stock exchange) वर कोणतेही व्यवहार शुल्क द्यावे लागणार नाही

नॅशनल स्टॉक एक्सचेंज कडुन एक घोषणा करण्यात आली आहे ज्यात असे सांगितले आहे की एन एस ई २०२१ मध्ये लागु केलेले जास्त व्यवहार शुल्क आता कमी करणार आहे.

सध्या एन एस ईने व्यवहार शुल्कामध्ये चार टक्के इतकी घट देखील केली आहे.

७) गॅस सिलेंडरच्या भावात बदल होणार

आपल्या भारत देशातील जेवढयाही पेट्रोलियम कंपन्या संस्था आहेत त्या दर नवीन महिन्यात पहिल्या दिवशी आपल्या गॅस सिलेंडर मधील किंमतीत काही बदल करत असतात.

ज्यात कंपनी सिलेंडरचे दर वाढवत किंवा कमी देखील करत असते.