सलीम दुराणी कोण होते? Cricketer Salim Durani

सलीम दुराणी कोण होते? Cricketer Salim Durani

नुकतीच एक क्रिकेट विश्वातील अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. भारत देशाचे माजी क्रिकेटपटू सलीम दुराणी यांचे आज काही तासांपूर्वी जामनगर गुजरात येथे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे.

असे सांगितले जाते आहे की कर्करोग ह्या आजाराने त्रस्त असल्याने सलीम दुराणी यांचे निधन झाले आहे.

सलीम दुराणी यांचे पुर्ण नाव सलिम अजीज दुराणी असे आहे.सलीम यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ मध्ये अफगाणिस्तान मधील काबुल ह्या शहरात झाला होता.

Cricketer Salim Durani
Cricketer Salim Durani

सलीम दुराणी हे भारत देशाकडुन क्रिकेट खेळणारे एक माजी अष्टपैलू क्रिकेटपटू होते.सलीम दुराणी हे भारतीय टीममधील डावखुरा फलंदाज गोलंदाज दोघे म्हणून प्रचलित होते.

सलीम दुरानी यांना त्यांच्या सिक्स म्हणजेच षटकार लावण्यामध्ये केलेल्या पराक्रमामुळे अधिक ओळखले जायचे.१९६० ते १९७३ या कालावधी मध्ये सलीम दुराणी यांनी तब्बल २९ कसोटी सामने खेळले होते.

सलीम दुराणी हे अफगाणिस्तान मध्ये जन्मलेले अणि भारतीय क्रिकेट टीममध्ये खेळणारे एकमेव भारतीय कसोटीपटटु म्हणुन सर्वांना परिचित होते.

अफगाणिस्तान मध्ये जन्मलेले सलीम हे सगळ्यात पहिले जेव्हा आपल्या परिवारासमवेत कराची येथे आले तेव्हा त्यांचे वय फक्त ८ ते ९ वर्ष इतके होते.

एम पासपोर्ट पोलिस ॲपविषयी माहिती

त्यानंतर आपल्या भारत देशाची फाळणी झाली ज्यानंतर ते आपल्या कुटुंबासोबत भारतात राहावयास आले होते.भारतीय संघामध्ये सलीम दुराणी हे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे विशेष ओळखले जायचे.

त्यांच्या ह्या अष्टपैलू कामगिरी मुळे १९६० च्या दशकात त्यांना अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आले होते.अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय क्रिकेटपटू होते.

१९६० च्या दशकात सलीम दुराणी यांनी भारतीय क्रिकेट संघाकडुन‌ खेळताना २९ कसोटी सामने खेळले.यात त्यांनी सात अर्धशतक अणि एक शतक देखील केले.हया सर्व मॅचमध्ये खेळताना सलीम यांनी तब्बल १२०२ एवढे रण देखील केले.

See also  ENT म्हणजे काय ? ENT Marathi full form

१०४ रण हा सलीम यांचा बॅटिंग मधील सर्वात हायेस्ट स्कोअर होता.

याचसोबत त्यांनी बाॅलिंगमध्ये देखील खुप उत्तम कामगिरी दर्शवत.हया २९ सामन्यात बाॅलिग करताना सलीम यांनी ७५ विकेट काढल्या.१७० रणांवर १० गडी बाद करणे ही त्यांची गोलंदाजी मधील केलेली सर्वात उत्तम कामगिरी मानली जाते.

सलीम दुराणी यांनी इंग्लंड ह्या देशाविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता.१९७३ मध्ये त्यांनी आपला हा अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

प्रेक्षकांच्या मागणीवर चौकार षटकार लावणारा भारतीय क्रिकेट टीममधील विस्फोटक फलंदाज म्हणुन त्यांना सर्व प्रेक्षक ओळखायचे

१९७३ मध्येच त्यांनी क्रिकेट मधुन कायमस्वरूपी निवृत्ती घेण्याचा निर्णय देखील घेतला होता.अणि असे सांगितले जाते की यानंतर सलीम दुराणी यांनी चित्रपटात काम करायला आरंभ देखील केला होता.

एका चरित्र नावाच्या चित्रपटात अभिनेत्री परवीन बाबी हिच्यासोबत त्यांनी काम केले होते.म्हणजेच अभिनयक्षेत्राच्या पडद्यावर प्रथमत झळकले होते.