CRP test म्हणजे काय?CRP test information

CRP test म्हणजे काय?CRP test information

सीआरपी टेस्टचा फुलफाॅम c reactive protein test असा होत असतो.

C reactive protein test कधी केली जाते?

जेव्हा आपल्या शरीरावर एखाद्या प्रकारची सुज येत असते.किंवा आपल्याला एखादा जुनाट आजार जडलेला असेल,आपल्याला कुठल्याही प्रकारचे इंन्स्पेक्शन वगैरे झाले असेल,आपणास एखादा तीव्र दाहक तसेच स्वयंप्रतिरोधक रोग झाला असेल,तेव्हा c reactive protein test केली जात असते.

याचसोबत आपणास हदय रोगाचा तसेच हदयाशी संबंधित इतर कुठला धोका तर नाही आहे ना याची खात्री करून घेण्यासाठी देखील ही टेस्ट केली जाते.

C reactive protein test का केली जाते?

CRP test information
CRP test information

आपल्या शरीरातील सी रिअॅक्टिव्ह प्रोटीनचे प्रमाण जाणुन घेण्यासाठी आपण ही टेस्ट करत असतो.

आपल्या शरीरात कोणते इंन्स्पेक्शन आहे आपल्याला कोणता आजार आहे हे जाणून घेण्यासाठी ही टेस्ट केली जाते.

ह्या टेस्टदवारे आपल्याला फक्त हे कळत असते की आपल्याला इंन्स्पेक्शन आहे किंवा नाही ते कुठले इंन्स्पेक्शन आहे हे ह्या टेस्टने अजिबात कळत नाही

सीआरपी टेस्टची नाॅरमल रेंज किती असते?c reactive protein test normal range

सीआरपी टेस्ट ह्या दोन प्रकारच्या असतात.

१) standard CRP test –

ह्या टेस्ट दवारे आपणास जाणुन घेता येते की एखाद्या रूग्णाला एखादा तीव्र दाहक रोग तसेच इंन्स्पेक्शन जडलेले आहे किंवा नाही.

ह्या सीआरपी टेस्ट मध्ये नाॅरमल व्हॅल्यू ही ५ मिलीग्रॅम पर लिटर पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.पण याची व्हॅल्यू १० ते ५० दरम्यान झाल्यास खालील परिस्थिती असु शकते किंवा खालील दिलेल्या आजारांपैकी एखादा आजार आपल्याला असु शकतो.

  • संधिवात
  • जंतुसंसर्ग
  • क्षयरोग टायफॉइड न्युमोनिया सारखे बॅकटेरिया इंन्स्पेक्शन
  • किडनीचा तसेच यकृताचा आजार
  • गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन
  • पण याची नाॅरमल व्हॅल्यू ५० पेक्षा अधिक झाल्यास आपल्याला ब्लड कॅन्सर,लिंफोमा मल्टिपल मायलोमा इत्यादी आजार असु शकतो.
See also  कोण आहेत महादेवी वर्मा? । चरित्र, कार्य, पुरस्कार, मनोरंजक तथ्ये

२) high sensitive CRP test –

ही टेस्ट रूग्णाला काही हार्ट संबंधित आजाराचा धोका आहे का हे जाणुन घेण्यासाठी केली जाते.

समजा हया सीआरपी टेस्टची नाॅरमल व्हॅल्यू १० एम जी पेक्षा अधिक असेल तर समजुन घ्यायचे की आपणास काही तीव्र दाहक रोग जडलेला आहे किंवा जडलेला असण्याची शक्यता असु शकते.

जेव्हा आपणास हदयरोग जडलेला आहे का याची तपासणी करण्यासाठी आपण ही टेस्ट करत असतो.अणि आपली सीआरपी व्हॅल्यू १ एम एल पेक्षा कमी येत असते याचा अर्थ आपल्याला हदयरोगाचा तसेच हदयाशी संबंधित इतर कुठल्याही आजाराचा धोका नाहीये.

पण हीच व्हॅल्यु १ ते ३ एमजी एल दरम्यान असल्यास आपणास हदयरोगाचा किमान धोका असण्याची शक्यता असु शकते.

पण हीच व्हॅल्यु ३ ते १० एमजी एल दरम्यान असल्यास किंवा यापेक्षा अधिक असल्यास आपणास हदयरोगाचा तीव्र धोका असण्याची शक्यता असु शकते.

सीआरपी टेस्ट कशी केली जाते?

सीआरपी टेस्ट मध्ये आपल्या हातादवारे रक्ताचा नमुना घेतला जातो.

ही टेस्ट करण्यासाठी आपणास कुठल्याही प्रकारची विशेष पुर्वतयारी करण्याची आवश्यकता नसते.आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा आपण ही टेस्ट करू शकतो.

सीआरपीची पातळी वाढण्याची कारणे –

जेव्हा आपणास क्षयरोगासारखा एखादा तीव्र दाहक रोग जडलेला असेल किंवा न्युमोनिया किंवा इतर काही इंन्स्पेक्शन झाले असेल.

जेव्हा आपणास एखादा स्वयंप्रतिरोधक रोग जडलेला असेल तेव्हा देखील आपल्या शरीरातील सीआरपीची पातळी वाढत असते.

गर्भावस्थेत असताना नाॅरमल परिस्थिती असताना देखील महिलांमध्ये सीआरपीची पातळी वाढलेली आपणास दिसून येत असते.काही गोळ्या औषधांचे सेवन केल्यास देखील सीआरपी पातळी वाढत असते.

C reactive protein म्हणजे काय?

हे एक प्रकारचे प्रोटीन असते जे आपल्या शरीरात लिव्हर दवारे निर्माण होत असते.जेव्हा आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारचा आजार इंन्स्पेक्शन असेल तेव्हा लिव्हर दवारे हे प्रोटीन अधिक प्रमाणात निर्माण होऊ लागते.

See also  रेपो रेट म्हणजे काय - RBI मॉनेटरी पॉलिसी ? Repo rate meaning in Marathi

तेव्हा ह्या प्रोटीनचे प्रमाण जाणुन घेण्यासाठी आपण सी रिअॅक्टिव्ह प्रोटीन टेस्ट करीत असतो.