21 मे महत्वाच्या चालू घडामोडी – Current affairs in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

२१ मे रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी

२१ मेला दरवर्षी दहशतवाद विरोधी दिवस साजरा केला जातो.

जैविक विविधतासाठी आंतरराष्ट्रीय दिवस २२ मे रोजी साजरा केला जातो.

३१ मे रोजी तंबाखु विरोधी दिवस अणि अहिल्याबाई होळकर जयंती साजरी केली जाते.

सुप्रीम कोर्ट आॅन कमर्शियल आर्बीट्रेशन हे पुस्तक मनोज कुमार यांनी लिहिलेले आहे.

माय लाईफ अॅज काॅमरेड ह्या नावाचे पुस्तक के के शैलेजा यांनी लिहिलेले आहे.

मिल्क अॅण्ड हनी नावाचे पुस्तक रूपी कौर यांनी लिहिलेले आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने २००० रूपयांच्या नोटा चलनातून काढुन घेण्याची घोषणा केली आहे.दोन हजार रुपयाच्या नोटा कायदेशीर निविदा म्हणून म्हणून सुरू राहणार आहेत.

२३ मे ते ३० सप्टेंबर पर्यंत नागरीकांना आपल्या जवळच्या दोन हजारच्या नोटा बॅकेत जमा करता येणार आहे.२० हजार एकाचवेळी म्हणजेच दोन हजारांच्या दहा नोटा एका वेळी आपणास जमा करता येणार आहे.

नोव्हेंबर २०१६ मध्ये दोन हजाराच्या नोटा बाजारात आल्या होत्या.त्यानंतर आरबीआयने २०१९ पासुन दोन हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती.

टाटा गृपचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

युकेचा मेंबर आॅफ दी आॅडर आॅफ ब्रिटीश अॅम्पायर एम एन नंदकुमार यांना सन्मानित करण्यात आले आहे.

भावेश गुप्ता हे पेटीएमचे नवीन अध्यक्ष अणि सीओओ बनले आहेत.

भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष रबनीत कौर बनलेले आहेत.

मध्य प्रदेश राज्य सरकारने मुख्यमंत्री सीखो कमाओ योजना सुरू केली आहे.

उत्तराखंड मध्ये मुख्यमंत्री लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली आहे.

पंचवटी योजना ही हिमाचल प्रदेश मध्ये सुरू करण्यात आली आहे.

26 नोव्हेंबर हा दिवस यूएन जनरल असेंब्लीने जागतिक शाश्वत वाहतूक दिवस म्हणून घोषित केला आहे.

पीव्हीआर पिक्चर्सचे नाव बदलून पीव्हीआर आयनाॅक्स पिक्चर असे ठेवण्यात आले आहे.

See also  चालु घडामोडी मराठी 5 मे २०२३- Current Affairs in Marathi

प्रवासी भारतीय केंद्राचे नवीन नाव सुषमा स्वराज भवन असे ठेवण्यात आले आहे.

मोटेरो स्टेडियमचे नवीन नाव नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवण्यात आले आहे.

मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नाव बदलुन शिक्षण मंत्रालय असे ठेवण्यात आले आहे.

16 मे रोजी सिक्कीमने आपला 48 वा राज्य दिवस साजरा केला आहे.16 मे1975 रोजी सिक्कीम भारताचे 22 वे राज्य बनले आहे.

जपान ह्या देशात सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स 222 डाॅलर दशलक्ष चीप विकास सुविधा तयार करणार आहे.

37 व्या राष्ट्रीय खेळामध्ये गटका मार्शल आर्टचा समावेश करण्यात आला आहे.हा राष्ट्रीय खेळ गोवा राज्यात होणार आहे.

स्लीप सोल्युशन प्रदाता डयुरो फ्लेक्सने नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून विराट कोहलीची निवड करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा