डीएड होणार आता कायमचे बंद
सर्व उमेदवारांना आता शिक्षक होण्यासाठी बीएडचीच पदवी घ्यावी लागणार
सध्याचे शैक्षणिक धोरणानुसार –
सध्याच्या शैक्षणिक पदधतीनुसार ज्या उमेदवारांना बारावी उत्तीर्ण केल्यानंतर एखाद्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत व्हायचे आहे त्यांना दोन वर्षांचा डीएडचा कोर्स करावा लागत होता.
अणि ज्या उमेदवारांना उत्तीर्ण एखाद्या माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत व्हायचे आहे त्यांना बीएडचा कोर्स करावा लागत होता.अशा उमेदवारांना बीएड करणे बंधनकारक ठेवण्यात आले होते.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार –
पण आता तयार करण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक उमेदवाराला शिक्षक बनण्यासाठी बारावीनंतर देखील चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रमात पूर्ण करावा लागणार आहे.
अणि ह्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र हा विषय स्पेशल घेऊन उमेदवारांना आपले बीएड पुर्ण करणे आवश्यक असणार आहे.
हे नवीन शैक्षणिक धोरण लागु करण्यासाठी राज्य शासनाकडुन मान्यता देखील देण्यात आली आहे.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात ५ एप्रिल रोजी एक बैठक होणार आहे अणि ह्याच बैठकीत ह्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्कामोर्तब करून याची अंमलबजावणी केली जाईल.
सर्व अकृषिक विद्यापीठांना हे नवीन शैक्षणिक धोरण लागु केले जाणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आणखी कोणते बदल करण्यात येणार आहे?
नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवीचा कालावधी तीन वर्षे न ठेवता तो चार वर्षे इतका केला जाणार आहे.
ह्या चार वर्षांच्या पदवीनंतर विद्यार्थ्यांना डायरेक्ट पीएचडी देखील करता येणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणात विषय निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.यामुळे एखाद्या अभ्यासक्रमाच्या व्यक्तीला दुसरा विषय देखील घेता येणार आहे.
एका वर्षाच्या कालावधीनंतर प्रमाणपत्र दिले जाणार अणि दोन वर्षांच्या कालावधीनंतर डिप्लोमाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
अशी एकूण चार वर्षांची पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना डिग्री विद आॅनर डिग्री विद रिसर्च प्राप्त होणार आहे अणि समजा विद्यार्थ्यांने रिसर्च घेतले तर त्याला पीएचडी करता येणार आहे.
पाच वर्षाची पीएचडी पुर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी देण्यात येणार आहे.अणि समजा यात एखाद्याचा गॅप पडला तरी सुदधा त्या विद्यार्थ्याला दोन तीन वर्षांनी प्रवेश घेता येणार आहे.
आधी तीन वर्षाची पदवी पुर्ण करायला पाच वर्षे इतका कालावधी दिला जात होता पण आता नवीन शैक्षणिक धोरणात नुसार पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सात वर्षे इतका कालावधी दिला जाणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे त्यांना एक वर्षात पदवी प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांत बीएड करता येणार आहे.अणि बारावीनंतर बीएड करण्यासाठी चार वर्षे इतका कालावधी लागणार आहे.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार डीएड हे रद्द करण्यात येणार आहे म्हणून ज्यांना आता प्राथमिक किंवा माध्यमिक यापैकी कुठलाही शिक्षक बनायचे आहे त्यांना बीएड करणे बंधनकारक असणार आहे.
फक्त विषयाची निवड करताना कुठल्या विषयाचा शिक्षक व्हायचे यावरून आपणास विषय घेता येणार आहे.
महत्वाची सूचना –
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर जे विद्यार्थी नव्याने पदवीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छित आहे अशा विद्यार्थी वर्गासाठी हे पॅटर्न लागु करण्यात येणार आहे.जे विद्यार्थी सध्या शिकत आहेत त्यांना हे पॅटर्न लागु होणार नाही याची नोंद घ्यावी.