हार्ड काँपी आणि साँफ्ट काँपी मधील फरक – Difference Between Hard Copy And Soft Copy In Marathi

हार्ड काँपी व साँफ्ट काँपी बाबत माहिती – Difference Between Hard Copy And Soft Copy In Marathi

जेव्हा आपण एखाद्या आँफिसमध्ये नवीनच वर्क करत असतो.तेव्हा तिथे आपल्याला हार्ड काँपी आणि साँफ्ट काँपी हे दोन शब्द नेहमी ऐकायला मिळत असतात.

आणि हार्ड काँपी कशाला म्हणतात?साँफ्ट काँपी कशाला म्हणतात?आणि या दोघांमध्ये कोणता फरक असतो हे माहीत नसल्याने आपण आँफिसात काम करत असताना कधी हार्ड काँपी मागितल्यावर साँफ्ट काँपी देत असतो.

आणि साँफ्ट काँपी मागितल्यावर आपण हार्डकाँपी देत असतो.असे देखील काही विचित्र प्रकार आपल्याकडुन कधी कधी घडत असतात.

आपल्यासोबत देखील असा प्रकार घडु नये यासाठी आज आपण साँफ्टकाँपी म्हणजे काय?हार्ड काँपी म्हणजे काय?या दोघांमध्ये कोणता फरक असतो? हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

साँफ्ट काँपी म्हणजे काय? Soft Copy Meaning In Marathi

● साँफ्ट काँपी म्हणजे अशी फाईल,डाँक्युमेंट जी आपल्या कंप्युटर तसेच लँपटाँपमध्ये डिजीटल स्वरुपात सेव असते.आणि ह्या फाईल्स तसेच डाँक्युमेंटसला आपण स्पर्श देखील करू शकत नाही फक्त पाहु शकतो.

● साँफ्ट काँपीच्या फाँरमँटमध्ये जी फाईल किंवा डाँक्युमेंट असते ते आपण फक्त डिजीटल स्वरुपात पाहु शकतो,एखाद्याला ईमेल दवारे पाठवू शकतो किंवा ती फाईल किंवा डाँक्युमेंट ब्लुटुथचा वापर करून एखाद्यासोबत देवाण घेवाण करू शकतो.

● साँफ्ट काँपीमधील फाईल्स तसेच डाँक्युमेंटसला आपण डिजीटल स्वरूपात स्कँन करू शकतो.

● साँफ्ट कॉपी वाचण्याकरीता आणि बघण्याकरिता आपणास कंप्युटर,लँपटाँप किंवा मोबाईल इत्यादी सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांची आवश्यकता असते.

● साँफ्ट काँपी ही एक कायमस्वरूपी स्वरुपाची प्रत मानली असते.

See also  Communication Process विषयी माहीती- Process Of Communication In Marathi

● साँफ्ट काँपीजला ठेवण्यासाठी कॉम्प्युटर ,लँपटाँप,मोबाईल मधील डिजीटल मेमरी स्पेसची आवश्यकता असते.

● साँफ्ट काँपी ही आपण एखाद्याला ईमेलने ब्लुटुथने व्हाँटस अँपसारख्या डिजीटल मिडियादवारे पाठवू शकतो.

हार्ड काँपी म्हणजे काय? Hard Copy Meaning In Marathi

● कंप्युटरमध्ये तसेच लँपटाँपमध्ये डिजीटल स्वरुपात सेव्ह असलेल्या एखाद्या फाईल तसेच डाँक्युमेंटची जेव्हा आपण प्रिंट काढत असतो तेव्हा त्या डाँक्युमेंट तसेच फाईलला हार्ड काँपी असे म्हटले जात असते.

● हार्ड काँपी म्हणजे अशी फाईल,डाँक्युमेंट जी आपल्या कडे वस्तु स्वरुपात उपलब्ध असते.आणि ह्या फाईल्स तसेच डाँक्युमेंटसला आपण पाहु शकतो.स्पर्श देखील करू शकतो.

● कुठल्याही डाँक्युमेंटची हार्ड काँपी काढण्यासाठी आपल्याकडे प्रिंटर,झेराँक्स तसेच फँक्स मशीन असणे गरजेचे असते.

● हार्ड कॉपी वाचण्याकरीता आणि प्रदर्शित करण्याकरीता आपणास कंप्युटर,लँपटाँप किंवा मोबाईल इत्यादी सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांची आवश्यकता नसते.

● हार्ड काँपीमध्ये कुठलाही डेटा तसेच माहीती फिजिकल फाँरमँटमध्ये सेव्ह असते.

● हार्ड काँपी ही एक तात्पुरत्या स्वरुपाची प्रत मानली जाते.

● हार्ड काँपीजला ठेवण्यासाठी फिजीकल स्पेसची आवश्यकता असते.

● हार्ड काँपी ही आपल्याला समोरच्या व्यक्तीला त्याच्या हातात प्रत्यक्ष द्यावी लागत असते.