एचबी एवनसी टेस्ट अणि फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट मध्ये कोणता फरक आहे Difference between HBA1C test and fasting blood sugar test

एचबी एवनसी टेस्ट अणि फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट मध्ये कोणता फरक आहे Difference between HBA1C test and fasting blood sugar test

एचबी एवनसी अणि फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट ह्या दोघे ब्लड टेस्टचा उपयोग एखाद्या व्यक्तीच्या रक्तात साखरेचे प्रमाण किती आहे हे जाणून घेण्यासाठी केला जातो.त्याला डायबिटीस झालेला आहे का हे जाणुन घेण्यासाठी केला जातो.

मागील तीन महिन्यात आपल्या रक्तातील साखरेचे सरासरी प्रमाण किती वाढले आहे हे एचबी एवनसी टेस्ट मधुन समजत असते.

Difference between HBA1C test and fasting blood sugar test
Difference between HBA1C test and fasting blood sugar test

फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट मध्ये आपणास फक्त ज्या दिवशी आपण फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट करतो त्या दिवसातील त्या वेळेच्या रक्तातील साखरेचे सरासरी प्रमाण समजत असते.

एचबी एवनसी ह्या चाचणीचे मोजमाप हे टक्केवारी मध्ये केले जात असते.पण फास्टिंग ब्लड शुगर टेस्टचे मोजमाप हे मिलीग्रॅम पर डेसीलिटर मध्ये केले जाते.

फास्टिंग ब्लड शुगर ह्या टेस्टमध्ये आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी आपणास कमीत कमी १२ तासाचा उपवास करावा लागत असतो.तेव्हाच आपणास ही टेस्ट करता येते.

म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने पहिल्या दिवशी सकाळी आठ वाजेपासून उपवास ठेवला असेल तर तो व्यक्ती दुसरया दिवशी आठ वाजेनंतर फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट करू शकतो.

यात एखाद्या व्यक्तीने जर एक दिवस आधी जास्त शर्करा युक्त अन्नपदार्थाचे सेवन केले तर दुसरया दिवशी फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट केल्याने त्याचे रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक दिसुन येऊ शकते.

फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट ही आपल्या हायपोग्लायसेमिया हायपर ग्लायसेमिया ह्या दोन्ही समस्येचे अवस्थेचे योग्यरीत्या निदान करते.यात त्यावेळी त्यादिवशी आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे हे आपणास ह्या टेस्टदवारे जाणुन घ्यायला मदत होते.

फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट दवारे आपणास त्वरीत लक्षात येऊन जाते एखाद्या रूग्णाच्या रक्तातील उपस्थित प्लाझ्मा सिरम मध्ये साखरेचे तसेच ग्लूकोजचे प्रमाण किती आहे.

See also  म्हशीच्या दुधाचे आहारातील महत्व- गाई आणि म्हशीच्या दुधातला न्यूट्रिशन फरक -Nutritional values of cow and Buffalo milk  

एचबी एवनसी टेस्ट करण्यासाठी एक दिवस आधी आपल्याला कुठल्याही प्रकारचा उपवास करावा लागत नाही पण फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट करण्यासाठी आपणास बारा तासाचा उपवास करणे आवश्यक असते.