इन्व्हाँईस अणि बिल या दोघांमधील फरक Difference between invoice and bill in Marathi

इन्व्हाँईस अणि बिल या दोघांमधील फरक Difference between invoice and bill in Marathi

मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या दुकानातुन सामान खरेदी करत असतो.तसेच आँनलाईन एखाद्या कंपनीची सर्विस प्रोडक्ट विकत घेत असतो तेव्हा आपणास म्हणजेच कस्टमरला बिल तसेच इन्हाँईस दिले जात असते.

पण आपल्याला बिल अणि इन्हाँईस या दोघांमध्ये काय फरक असतो हेच माहीत नसते.आपल्याला हे दोघेही सारखेच वाटत असतात.

याचकरीता आज आपण बिल अणि इन्वहाँईस या दोघांमध्ये काय फरक असतो हे जाणुन घेणार आहोत.

जेणेकरून आपला बिल अणि इन्वहाँईस या दोघांमध्येही कुठल्याही प्रकारचा गैरसमज तसेच गोंधळ होणार नाही.

बिल –

  • बिल हे एक प्रकारचे प्रमाण तसेच रेकाँर्ड असते जे दुकानदार त्याच्या कुठल्याही ग्राहकाला त्याच्या दुकानातुन वस्तुंची सामानाची खरेदी केल्यावर देत असतो.
  • बिलमध्ये ग्राहकाने कोणकोणते सामान खरेदी केले आहे?किती सामानाची खरेदी दुकानातुन केली आहे?,त्या सामानाची एकुण किती किंमत आहे जी ग्राहकाने दुकानदारास दिली आहे सामान कधी खरेदी केले आहे हे सर्व दिलेले असते.
  • बिलमध्ये दुकानाचा पत्ता देखील मेंशन केलेला असतो.जेणेकरून समजा एखाद्या ग्राहकाचे खरेदी केलेले सामान खराब असेल तर तो आपले खरेदीचे बिल दाखवुन दुकानदाराकडुन ते सामान एक्सचेंज करून घेऊ शकतो.
  • बिलमध्ये दिलेल्या गँरंटी वाँरंटी च्या आत आपले सामान जर खराब झाले असेल तर दुकानदारास ते सामान एक्सचेंज करून द्यावे लागत असते.किंवा तो ते सामान फ्री मध्ये आपणास दूरूस्त देखील करून देऊ शकतो.
  • बिलमध्ये दुकानदार ग्राहकाने खरेदी केलेल्या सामानाची संख्या,ग्राहकाने किती सामानाची खरेदी केली,सामान कधी खरेदी केले त्याची तारीख देण्यात आलेली असते.
  • बिल हे अधिकतम दुकानदार आपल्या ग्राहकाला देत असतात.
  • बिल हे आपणास हार्ड अणि साँफ्ट काँपी दोघे स्वरूपात उपलब्ध होत असते.
  • बिल हे आपणास आँफलाईन एखाद्या दुकानात खरेदी केल्यावर दिले जात असते.
See also  डाॅ आनंदीबाई जोशी कोण होत्या? - birthday of India's first female doctor "Anandi Gopal Joshi

इन्वहाँइस

  • इन्वहाँईस हे देखील बिल प्रमाणेच एक रेकार्ड असते जे दुकानदार आपल्या ग्राहकाला त्याचे प्रोडक्ट खरेदी केल्यावर तसेच सर्विस घेतल्यानंतर देत असतो.

  • इन्वहाँईस हे दुकानदार ग्राहकाला तेव्हा देत असतो जेव्हा ग्राहक त्याच्याकडुन एखादे प्रोडक्ट तसेच सर्विस घेत असतो.

  • इन्वहाँईस मध्ये दुकानदाराच्या सर्व सर्विसेस विषयी माहीती दिलेली असते.ज्या तो आपल्या ग्राहकाला देत आहे.

  • इन्वहाँईस मध्ये दुकानदाराच्या कस्टमरची देखील माहीती दिलेली असते.ज्यात कस्टमरचे नाव,कस्टमरचे किती सामान खरेदी केले त्याची संख्या यादी,कस्टमरने कोणती सर्विस घेतली,कोणत्या तारखेला सर्विस घेतली, याचसोबत कस्टमरच्या खात्याविषयी देखील सर्व माहीती यात दिलेली असते.

  • इन्वहाँईस हे एखादी सर्विस देणारी कंपनी आपल्या कस्टमरला देत असते.

  • इन्वहाँईस हे देखील आपणास हार्ड अणि साँफ्ट काँपी दोघे स्वरूपात उपलब्ध होत असते.

  • इन्वहाँईसचा वापर आँनलाईन बिझनेसमध्ये आँनलाईन सर्विसेसमध्ये अधिक प्रमाणात केला जात असतो.