नेट अणि जे-आर एफ मधील फरक | Difference between net and jrf in Marathi
नेट अणि जे आर एफ मधील साम्य
● नेट अणि जे आर एफ या दोघांची परीक्षा एकाच दिवशी एकाच तारखेला,एकाच वेळेस घेतले जात असतात.
● नेट अणि जे आर एफ दोघेही परिक्षा एनटीए कडून आयोजित केल्या जात असतात.
● नेट अणि जे आर एफ या दोघे परीक्षेसाठी फाँर्म आपण एकाच वेळी भरू शकतो.तसा पर्याय आपल्याला दिला जात असतो.म्हणजे आपण सहायक प्राध्यापक पदाच्या परिक्षेसाठी अणि जे आर एफ दोघांसाठी एकाच वेळी फाँर्म भरु शकतो.किंवा आपण दोघांपैकी कुठलाही एक फाँर्म देखील भरू शकतो.तसे आँप्शन आपल्याकडे फाँर्म भरताना उपलब्ध असते.
● जेआर एफ अणि नेट परीक्षेसाठी आपण पोस्ट ग्रँज्युएशन पुर्ण करून अँप्लाय करू शकतो.किंवा आपण पोस्ट ग्ँज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असाल तरी देखील आपण ह्या दोघे परीक्षेसाठी फाँर्म भरू शकतो.
नेट अणि जे आर एफ मधील फरक
● नेट म्हणजे नँशनल एलिजीबीलिटी टेस्ट असते.नेट काँलीफाय केल्यावर आपण भारतातील कुठल्याही सरकारी तसेच खाजगी संस्थेत,विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदावर नोकरीला लागु शकतो.
● जे आर एफ म्हणजे ज्युनिअर रिसर्च फेलोशिप असते.यात फेलोशिपसाठी आपणास एक सर्टिफिकेट दिले जाते.हे सर्टिफिकेट आपणास तेव्हा दिले जाते जेव्हा आपण एखाद्या विद्यापीठातुन एम फिल तसेच पीएचडीचे शिक्षण करत असतो.फेलोशिप म्हणजे एक शिष्यवृत्ती असते जी आपणास यूजीसीकडुन दिली जाते.
● ज्यांचे निकालात कट आँफ थोडे कमी लागते ज्यांना थोडे कमी गुण मिळतात त्यांना नेटचे सर्टिफिकेट मिळते.
अणि ज्या उमेदवाराला कट आँफ मध्ये जास्त गुण मिळतात त्या उमेदवाराला ज्युनिअर रिसर्च फेलोशिप करीता निवडले जात असते.
● जो उमेदवार परीक्षेत नेट काँलिफाय होतो त्याला नेटचे सर्टिफिकेट फक्त मिळत असते.
पण जो उमेदवार जे आर एफ परीक्षेत काँलीफाय होतात त्यांना नेटचे सर्टिफिकेट सोबत जे आर एफचे सर्टिफिकेट पण मिळत असते.
● नेट परीक्षा देण्यासाठी कुठलीही वयाची अट नसते.
पण जे आर एफ परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादेची एक अट असते.एस सी,एसटी टी कँटँगरीमधील उमेदवार ३५ वय होईपर्यत ओबीसी ३३ वय मर्यादा पर्यत जेआर एफची परीक्षा देऊ शकतात.अणि जनरल कँटँगरी मधील पुरूष उमेदवाराला फक्त ३० वय होईपर्यत ही परीक्षा देता येत असते.पण महिलांना यात ३५ वय होईपर्यत परीक्षेसाठी अर्ज करता येत असतो मग ती महिला उमेदवार कोणत्याही कँटँगरीमधील असली तरी चालते.
● नेट तसेच जे आर एफ दोघे परीक्षांचा फाँर्म भरायला ओबीसी एस सी एसटी गटातील उमेदवाराला पोस्ट ग्रँज्युएशन मध्ये ५० टक्के आवश्यक असतात.
अणि जे उमेदवार जनरल कँटँगरीमधील आहेत त्यांना पोस्ट ग्रँज्युएशन मध्ये ५५ टक्क्यांची आवश्यकता असते.
नेट परीक्षेत जनरल कँटगरी मधील उमेदवारांकडुन परीक्षा फी हजार रूपये घेतली जाते.ओबीसीकडून ५०० अणि एससी एसटी कडुन २५० इतकी परीक्षा फी घेतली जाते.नेट परीक्षेत निगेटिव्ह मार्कींग नसते.
नेट परीक्षेला दोन पेपरसाठी तीन तास दिले जातात.
नेट परीक्षेत काँलीफाय होण्यासाठी जनरल कँटगरीच्या उमेदवाराला ४० गुण असावे लागतात तर ओबीसी एससी,एसटी पीडबल्युडी यांना ३५ गुण असणे आवश्यक आहे.
नेट परीक्षा काँलीफाय करण्याचे फायदे
नेट परीक्षेत काँलीफाय झाल्यानंतर उमेदवाराला भारतातील कुठल्याही राज्यात खासगी तसेच सरकारी संस्थेत विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदाची नोकरी प्राप्त करण्यासाठी अर्ज करता येत असतो.
ज्या उमेदवाराला कुठल्याही विद्यापीठातुन महाविद्यालयातुन एम फिल तसेच पीएचडी करायची आहे असे उमेदवार नेटच्या माध्यमातुन नेटच्या आधारावर काही ठाराविक विद्यापीठातुन पीएचडी एमफिल साठी प्रवेश प्राप्त करू शकतो.
जे आर एफ परीक्षा काँलिफाय करण्याचे फायदे
● जे आर एफ परीक्षा पास त्यात काँलिफाय केल्यानंतर आपणास दोन सर्टिफिकेट मिळत असतात नेट अणि जेआर एफ ह्या दोघांचे.
● जे आर एफ काँलीफाय केल्यानंतर तीन वर्षाच्या आत जर आपण एखाद्या विद्यापीठात पीएचडी तसेच एम फिल साठी प्रवेश घेतला तर आपल्याला पीएचडी पुर्ण होईपर्यत सलग पाच वर्षासाठी दर महिन्याला किमान ४० ते ४५ हजारापर्यतची फेलोशिप म्हणजेच शिष्यवृत्ती दिली जात असते.
● पीएचडी करत असलेल्या उमेदवाराला वेगवेगळया काँलेज विद्यापीठामधील सेमिनार वगैरे मध्ये जाण्यासाठी वर्कशाँप मध्ये जाण्यासाठी युजीसीकडुन जाण्या येण्याचा खर्च तसेच भत्ता दिला जात असतो.विविध सुविधा देखील युजीसी कडुन उपलब्ध करून दिल्या जात असतात.
● सदर उमेदवाराला दरवर्षी २० ते १५ हजार इतके कंटेजन्सी अमाऊंट देखील दिले जाते.ज्यात आपण टाईपिंग बाईडिंग वगैरेसाठी खर्च दिला जात असतो.
● पुढे जाऊन हे जे आर एफ सिनिअर रिसर्च फेलोशिपमध्ये रूपांतरीत झाल्यानंतर उमेदवाराला अजुन जास्त फोलोशिपचा फायदा प्राप्त होत असतो.