सेल्स आणि मार्केटिंग – विक्री व विपिनण म्हणजे काय – Difference Between Sales And Marketing In Marathi
जगातील कुठलाही व्यवसाय बिझनेस असो त्यात जर आपल्याला अधिकाधिक प्रगती करायची असेल,नफा प्राप्त करायचा असेल. आपल्या प्रोडक्ट तसेच सर्विस विकत घेत असलेल्या कस्टमरच्या संख्येत जास्तीत जास्त वाढ घडवून आणायची असेल तर दोन गोष्टी खुप महत्वाच्या असतात.
एक म्हणजे सेल्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटिंग.आपल्यातील खुप जणांच्या मनात हा एक प्रश्न असतो की सेल्स आणि मार्केटींग या दोघांमध्ये काय फरक आहे?
तसेच आपल्यातील खुप जणांना असे देखील वाटत असते की सेल्स आणि मार्केटिंग ह्या दोन वेगवेगळया संज्ञा नसुन या एकच आहेत.आणि दोघांचा अर्थ देखील एकच असतो.
अशा अलग अलग समजुती प्रत्येक व्यक्तीच्या सेल्स आणि मार्केटिंग विषयी असलेल्या आपणास दिसुन येतात.
आपल्या मनात सेल्स आणि मार्केटिंग विषयी असलेले हेच विविध प्रकारचे गैरसमज दुर करण्यासाठी आजच्या लेखात आपण सेल्स म्हणजे काय?मार्केटिंग म्हणजे काय?आणि या दोघांमध्ये काय फरक असतो?हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
सेल्स म्हणजे काय? – Sales Meaning, What Is Sales In Marathi
सेल्स म्हणजे आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट ,वस्तु,सामग्रीचा जो स्टाँक असतो त्याची कंपनीकडुन,कंपनीच्या विक्री विभागाकडुन,सेल्स टीमकडुन,सेल्समन दवारे जी विक्री केली जात असते त्याला सेल्स असे म्हणतात.
● यात कुठल्याही कंपनीचे प्रोडक्ट सर्विस किंवा इतर वस्तु सेल करणारा सेल्समन तसेच सेल्स टीम ही आपल्या टारगेट कस्टमरसोबत चांगले संबंध प्रस्थापित करत असते.कस्टमरला आपल्या कंपनीचे प्रोडक्ट विकत घेण्यासाठी कन्वहेंस करून त्यांना ते प्रोडक्ट विकत असते.
● तसेच कस्टरच्या मनात आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसविषयी काही शंका तसेच तक्रार असेल तर ही शंका आणि तक्रार दुर करण्याचे काम देखील त्या कंपनीची सेल्स टीम करत असते.
● प्रत्येक कंपनीच्या सेल्स टिमचे एक फिक्स विकली,मंथली,ईयरली इत्यादी टारगेट असते.जे त्यांना दिलेल्या वेळेत पुर्ण करायचे असते.
● सेलिंगमध्ये सेलर हा फक्त आपल्या प्रोडक्ट सेलिंगच्या गरजेवर लक्ष केंद्रित करत असतो कारण त्याचे मुख्य टारगेट सेलिंग करणे हेच असते.म्हणुन त्याच्यासाठी फक्त प्रोडक्ट आणि त्याची सेलिंग महत्वाची असते.
● सेलिंगमध्ये आपण विकत असलेल्या प्रोडक्ट वस्तुची खरच कस्टमरला गरज आहे का हे बघितले जात नाही फक्त काहीही करून आपले प्रोडक्ट कस्टमरला विकणे याचाच विचार यात प्रामुख्याने केला जात असतो.
● सेलिंगचे मुख्य उददिष्ट आपल्याकडे असलेल्या प्रोडक्टची विक्री करणे आणि पैसे कमविणे हे असते.
● सेलिंगमध्ये आपण पाहिजे ती किंमत आपण विकत असलेल्या प्रोडक्ट सर्विसची ठेवत असतो.आणि कस्टमरकडुन ती वसुल करत असतो.कारण यात आपल्याला फक्त जास्तीत जास्त किंमतीत सेलिंग करून पैसे कमवायचे असतात.
● सेलिंगमध्ये आपण जितके जास्त प्रोडक्ट विकत असतो तितका आपला प्राँफिट होत असतो.
● सेलिंगला आपण शाँर्ट टर्म बिझनेस प्लँन असे संबोधित असतो.
● सेलिंगमध्ये फक्त सेलिंग करणे हीच एक गोष्ट समाविष्ट असते.
मार्केटिंग म्हणजे काय? Marketing Meaning, What Is Marketing In Marathi
मार्केटींग म्हणजे आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट वस्तु,सामग्रीचा जो स्टाँक असतो त्याला आपल्या टारगेट कस्टमरपर्यत घेऊन जाणे.जेणेकरून कस्टमर आपल्या प्रोडक्ट सर्विसकडे आकर्षिले जातील आणि त्याची जास्तीत जास्त खरेदी करतील.आणि आपल्याला अधिक नफा प्राप्त होईल.आणि आपल्या कस्टमरमध्ये देखील वाढ होईल.
● एखाद्या कंपनीकडुन,कंपनीच्या मार्केटिंग टीमकडुन,इंटरनेटदवारे डिजीटली किंवा आँफलाईन पदधतीने जी त्यांच्या प्रोडक्ट सर्विसविषयी (उत्पादन व सेवा ) ग्राहकांना आकर्षुन घेण्यासाठी जाहीरात केली जात असते त्याला मार्केटिंग असे म्हणतात.
● मार्केटिंगमध्ये आपण फक्त आपल्या वस्तुची विक्री करण्याच्या गरजेवर लक्ष केंद्रित करत नसतो तर यात आपण ग्राहकांची मुख्य गरज पुर्ण होणे ह्यावर देखील लक्ष केंद्रित करत असतो.कारण आपण विकलेल्या प्रोडक्ट तसेच वस्तुची खरेदी करून ग्राहक संतुष्ट(Satisfy) आनंदी होणे हे मार्केटिंगमध्ये फार गरजेचे असते.कारण यानेच ग्राहका पुन्हा तेच प्रोडक्ट विकत घेण्यासाठी आपल्याकडे पुन्हा येत असतो.
● मार्केटिंगमध्ये पहिले आपण ग्राहकांची गरज समजुन घेत असतो आणि मग ती आपल्या उत्पादना दवारे पुर्ण कशी करता येईल याचा विचार करत असतो.ज्याने आपल्याला ग्राहकांच मन कायमचे लाँग टर्मसाठी जिंकता येईल.
● मार्केटिंगचे मुख्य उददिष्ट आपल्या टारगेट कस्टमरच्या मुख्य गरजेला आपल्या प्रोडक्ट सर्विसमधून पुर्ण करणे त्याच्या मुख्य प्राँब्लेमवर साँल्युशन असणारे प्रोडक्ट त्याला उपलब्ध करून देणे हे असते.
● मार्केटिंगमध्ये आपण पाहिजे ती किंमत आपण विकत असलेल्या प्रोडक्ट सर्विसची ठेवू शकत नाही.कारण यात आपल्याला मनाला वाटेल अशी काहीही किंमत लावता येत नसते.यात आपणास त्या प्रोडक्टची मार्केट प्राईज आधी लक्षात घ्यावी लागते.आणि त्यानुसार योग्य किंमत लावून ती वस्तु किंवा प्रोडक्ट विकावे लागते.
● मार्केटिंगमध्ये आपला प्राँफिट हा ग्राहकांच समाधान झाल्यानंतर होत असतो कारण आपल्या प्रोडक्ट सर्विस मधुन त्याची मुख्य गरज पुर्ण झाल्यावरच पुन्हा ग्राहक आपल्याकडे ते प्रोडक्ट घेण्यासाठी येत असतो.तसेच इतरांना देखील आपले प्रोडक्ट विकत घेण्यासाठी सांगत असतो.
● मार्केटिंगला आपण लाँग टर्म बिझनेस प्लँन असे संबोधित असतो.
● मार्केटिंगमध्ये फक्त सेलिंग ह्या एकच गोष्टीचा समावेश होत नसतो तर यात अनेक गोष्टींचा समावेश होत असतो.
मार्केटिंगमध्ये पुढील काही महत्वाच्या गोष्टींचा समावेश होतो-
● आपण ज्या क्षेत्रात व्यवसाय करतो आहे त्या क्षेत्राविषयी मार्केट रिसर्च करणे.
● त्या क्षेत्रातील ग्राहकांच्या गरजा,आवड पसंद,समस्या इत्यादी जाणुन घेणे.
● आपण ज्या प्रोडक्ट सर्विसचा बिझनेस करतो आहे त्या प्रोडक्ट सर्विसला मार्केटमध्ये अजुन कोण कोण किती जण सेल करत आहेत या विषयी जाणुन घेणे थोडक्यात मार्केट काँपिटिशनचा अंदाज घेण.
● आणि मग मार्केट काँपिटिशनचा अंदाज घेतल्यानंतर कस्टमरच्या गरजेनुसार,आवड नुसार योग्य ते आणि उत्तम प्रोडक्ट तसेच सर्विस त्यांना इतर काँपीटिटरपेक्षा वाजवी दरात आपल्याकडुन उपलब्ध करून देणे.
● आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसचा मार्केटमध्ये एक युनिक ब्रँण्ड तयार करणे जेणेकरून काँपीटिटर आपल्या प्रोडक्टची नक्कल करू शकणार नाही.
● आपल्या प्रोडक्ट सर्विसला जास्तीत जास्त कस्टमरपर्यत पोहचवण्यासाठी त्याची मार्केटिंग करणे ज्यात जाहीरात करणे,बिझनेसची एक युनिक स्ट्रँटेजी तयार करणे इत्यादीं गोष्टींचा समावेश मार्केटिंगमध्ये होतो.