दिनेश कार्तिकचे इंडियन प्रीमियर लीग मध्ये अत्यंत खराब प्रदर्शन -Dinesh kartik indian premier league bad performance
आरसीबी म्हणजेच राॅयल चॅलेंजर्स बंगलोर ह्या संघाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला अकरा चेंडु खेळुन फक्त सोळा धावा करण्यात यश आले आहे.
म्हणजे ह्यावेळी देखील दिनेश कार्तिक याची बॅट चालली नाहीये.असे करत दिनेश कार्तिक याने एबी डिवहीलियर्स याच्या एका जुन्या खराब कामगिरीची देखील बरोबरी केली आहे.
२०२३ मधील राॅयल चॅलेंजर्स बंगलोर ह्या संघाचा आतापर्यंतचा प्रवास फार उत्तम चालला असल्याचे आपण बघितले आहे.
राॅयल चॅलेंजर्स बंगलोर ह्या संघाने आतापर्यंत नऊ सामने खेळले आहेत ज्यातील पाच सामने जिंकण्यात राॅयल चॅलेंजर्स बंगलोर ह्या संघाला यश देखील प्राप्त झाले आहे.
आतापर्यंत राॅयल चॅलेंजर्स बंगलोर ह्या संघाला आपल्या ह्या उत्तम कामगिरीसाठी पाचव्या क्रमांकावर स्थान पटकावता आले आहे अणि एकुण १० गुण देखील प्राप्त झाले आहे.
नुकतेच सोमवारी झालेल्या सामन्यात देखील आरसीबीने आपले हे उत्तम कामगिरीचे प्रदर्शन जारी ठेवत लखनौ सुपर जाईंटस संघाला १८ धावांनी पराभूत केले आहे.
पण ह्या सामन्यात देखील दिनेश कार्तिक याने खराब फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे.अकरा चेंडूचा सामना करत अवघ्या १६ धावाच दिनेश कार्तिक याला करता आल्या होत्या.
ज्यामुळे आता एबी डिवहीलियर्स याने केलेल्या एका जुन्या खराब कामगिरीची विक्रमाची बरोबरी देखील दिनेश कार्तिकने आता केली आहे..
आतापर्यंत एबी डिवहीलियर्स हा आयपीएल मध्ये चौदा वेळा रण आऊट झालेला आहे त्याच्या ह्या खराब कामगिरीची बरोबरी एल सीजी विरूद्धच्या सामन्यात रण आऊट होत दिनेश कार्तिक याने केली आहे.
आयपीएल २०२३ मधील खेळलेल्या सामन्यात आतापर्यंत दिनेश कार्तिक याने कुठलीही खास कामगिरी देखील केली नाहीये.
दिनेश कार्तिक याने आतापर्यंत आयपीएल मध्ये तब्बल नऊ सामने खेळले आहेत ज्यात त्याला फक्त ९९ धावा करण्यात यश प्राप्त झाले आहे.
ज्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही फक्त २८ रण इतकी होती.याचसोबत दिनेश कार्तिक दोन सामन्यांत भोपळाही फोडु शकला नव्हता.
आयपीएल मध्ये सर्वाधिक प्रमाणात धावबाद झालेले खेळाडु कोण कोण आहेत
आयपीएल सामन्यात आतापर्यंत सर्वाधिक प्रमाणात धावबाद होण्यामध्ये शिखर धवन प्रथम क्रमांकावर आहे.आता पर्यंत शिखर धवन हा आयपीएल सामन्यात तब्बल सोळा वेळा रण आऊट झाला आहे.
यानंतर दुसरया क्रमांकावर गौतम गंभीर याचा नंबर लागतो तो देखील आयपीएल सामन्यात १६ वेळा रण आऊट झाला आहे.
सुरेश रैना यात १५ वेळा रण आऊट होत तिसरया क्रमांकावर आहे.अंबाती रायडु देखील १५ वेळा रण आऊट झाला आहे तो यात चौथ्या क्रमांकावर आहे.
ह्या आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा रण आऊट झालेल्यांच्या यादीत एबी डिवहीलियर्स चौदा वेळा रण आऊट होत पाचव्या क्रमांकावर आहे
अणि आता दिनेश कार्तिक देखील आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा रण आऊट होणारयांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आला आहे समाविष्ट झाला आहे.दिनेश कार्तिक हा आतापर्यंत आयपीएल मध्ये चौदा वेळा रण आऊट झाला आहे