- १३ मे रोजीचे महत्वाचे दिनविशेष
- १३ मे १८८० रोजी थाॅमस अलवा एडिसन यांनी मेंलो पार्क न्यु जरसी येथे विजेवर चालत असलेल्या रेल्वेची चाचणी करण्यात आली होती.
- १३ मे १९५२ रोजी भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरविण्यात आले होते.
- १३ मे १९६२ रोजी भारत देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
- १३ मे १९६७ रोजी झाकीर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले होते.
- १३ मे १९९८ रोजी भारत देशाने दोन परमाणु शस्त्रांची तपासणी पोखरण येथे केली होती.
- १३ मे २००० रोजी भारतीय प्रसिद्ध माॅडेल मिस इंडिया लारा दत्ता हयांनी मिस युनिवहर्स हा पुरस्कार जिंकला होता.
- १३ मे १९५० रोजी फाॅम्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप पहिली रेस सिल्व्हर स्टोन येथे झाली होती.
- १३ मे १९७० रोजी नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी मुंबई शहरातील बिरला मातोश्री सभागृह येथे सलग अकरा तास अणि ४५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम नोंदविला होता.
- एलिसन हर ग्रव्हिज १३ मे १९९५ रोजी आॅक्सिजन किंवा शेरपा यांच्या मदतीशिवाय माऊंट एव्हरेस्ट सर करणारी प्रथम महिला बनली होती.
- १३ मे २००० रोजी मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांची फेररचना करून अनुक्रमे उत्तरांचल झारखंड छत्तीसगड ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकास केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती.
- १३ मे १९९६ रोजी लघुपट चित्रपट निर्माता अरूप खोपकर दिग्दर्शित सोच समझ के या कुटुंब नियोजनावरील लघुपटाला कुटुंब कल्याण विषयावरील सर्वोत्तम चित्रपट हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
- १३ मे १९९६ रोजी महिला जागतिक क्रमवारीत तब्बल ३३२ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनी मधील स्टेफी ग्राफने केला होता.
- १३ मे १९८४ रोजी भारतीय गायक बेनी दयाल यांचा जन्म झाला होता.
- १३ मे २०१३ रोजी भारतीय छायाचित्रकार जगदीश माळी यांचे निधन झाले होते.
- १३ मे १९७३ रोजी गीतलेखक संदीप खरे यांचा जन्म झाला होता.
- १३ मे १९५६ रोजी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचा जन्म झाला होता.
- १३ मे १९५६ रोजी अध्यात्मिक गुरू रविशंकर यांचा जन्म झाला होता.
- १३ मे १९५१ रोजी भारतीय दिग्दर्शक संगीतकार आनंद मोडक यांचा जन्म झाला होता.
- १३ मे १९२५ रोजी दलित साहित्य समीक्षक भालचंद्र दिनकर फडके यांचा जन्म झाला होता.
- १३ मे १९१८ रोजी भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती यांचा जन्म झाला होता.
- १३ मे १९१६ भारतीय ओरिया भाषेचे कवी सच्चिदानंद राऊत यांचा जन्म झाला होता.
- १३ मे १९०५ रोजी भारताचे पाचवे राष्ट्रपती फकुददीन अली अहमद यांचा जन्म झाला होता.
- १३ मे १९३९ रोजी अमेरिकन पहिले व्यावसायिक एफएम रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आले होते.
- १३ मे १८५७ रोजी ब्रिटीश सर रोनाल्ड राॅस यांचा जन्म झाला होता.
- १३ मे २०१० रोजी कवी बालकुमार साहित्यिक विनायक महादेव तथा विम कुलकर्णी यांचे निधन झाले होते.
- १३ मे २००१ रोजी लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायण स्वामी तथा आरके नारायण यांचे निधन झाले होते.
- १३ मे १९५० रोजी भारतीय इतिहास संस्कृतीचे अभ्यासक देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचे निधन झाले होते.
- १३ मे १९०३ रोजी फिलिपाईन्सचे पंतप्रधान अपोलेनिरीयो माबिनी यांचे निधन झाले होते.