ई श्रम कार्ड यादी – 2023 e-shram card list 2023 in Marathi

ई श्रम कार्ड यादी – 2023 e-shram card list 2023 in Marathi

आपल्या भारत देशातील श्रमिक अणि कामगार वर्गासाठी केंद्र अणि राज्य सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत असते.

ई श्रम कार्ड योजना ही देखील कामगार अणि श्रमिक वर्गासाठी सरकारने सुरू केलेली अशीच एक लाभदायक योजना आहे.

ई श्रम कार्ड योजना काय आहे ह्या योजनेचे स्वरूप कसे आहे याचा लाभ घेण्यासाठी नागरीकांना कोणकोणत्या आॅनलाईन प्रक्रिया पुर्ण करणे आवश्यक आहे हे आपण ई श्रम कार्ड वरील लेखात सविस्तर पणे पाहिलेले आहे.

आजच्या लेखात आपण सरकारने जारी केलेल्या ई श्रम कार्ड यादी २०२३ विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

ज्या असंघटित क्षेत्रातील कामगार श्रमिक वर्गाने आपले ई श्रम कार्ड बनवले आहे तसेच हे कार्ड प्राप्त करण्यासाठी आॅनलाईन अर्ज केलेला आहे.

ते सर्व नागरीक ई श्रम कार्डच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जाऊन आपले ई श्रम कार्ड आले आहे की नाही त्याचे स्टेटस काय आहे चेक करू शकतात.तसेच आपले बनलेले ई श्रम कार्ड डाऊनलोड देखील करू शकतात.

आता आपण हे जाणुन घेऊया की घरबसल्या आपण २०२३ मधील ई श्रम कार्डच्या यादीत आपले नाव आले आहे की नाही हे आॅनलाईन कसे चेक करू शकतो.

ई श्रम कार्डच्या यादीत आपले नाव कसे अणि कुठे चेक करायचे?

सर्वप्रथम आपण ई श्रम कार्डच्या आॅफिशिअल वेबसाईटवर eshram.gov.in जायचे आहे.यानंतर आपल्यासमोर वेबसाइटचे होम पेज ओपन होईल.

ज्यांनी आधीपासून नोंदणी केली आहे त्यांना ई श्रम कार्ड अपडेट करण्यास सांगितले जाईल.यासाठी अपडेट वर क्लिक करायचे आहे.

अपडेट बटणावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होते.या पेजवर आपल्याला आपला युए एन नंबर अणि डेट आॅफ बर्थ टाकायची आहे.

नंतर तिथे दिलेला कॅपच्या कोड जसाच्या तसाच भरून बाजुला दिलेल्या जनरेट ओटीपी आॅप्शनवर क्लिक करायचे आहे.

See also  महाराष्ट्र विधवा पेंशन योजना २०२३ विषयी माहिती - Maharashtra Vidhawa Pension Scheme

यानंतर आपल्या रेजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठविला जाईल तो ओटीपी स्क्रीनवर इंटर करायचा आहे.अणि खाली दिलेल्या सबमीट आॅप्शन वर क्लिक करायचे आहे.

सबमिट करून झाल्यावर २०२३ मधील ई श्रम कार्डची एक यादी आपल्यासमोर ओपन होईल त्यात आपले नाव दिलेले आहे किंवा नाही हे आपण यादी ओपन करून चेक करू शकतो.

ज्यांचे ह्या यादीत नाव असेल त्यांना दरमहिन्याला तीन हजार रुपये दिले जाणार आहे.याचसोबत दोन लाख रूपये इतका विमा लाभ देखील मिळणार आहे.