ईडी आयचा फुलफाँर्म काय होतो?-EDI full form in Marathi
ईडी आयचा फुलफाँर्म Electronic data Interchange इलेक्ट्राँनिक पदधतीने माहीतीची देवाणघेवाण असा होत असतो.
ईडी आय म्हणजे काय?EDI meaning in Marathi
ईडी आय ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात आपण इलेक्ट्राँनिक पदधतीने संगणकाच्या माध्यमातुन कुठल्याही डेटा,फाईल तसेच माहीतीची आपापसात देवाणघेवाण करत असतो.
जेव्हा एखादी कंपनी इलेक्ट्राँनिक पदधतीने संगणकाच्या माध्यमातुन आपल्या व्यावसायिक कागदपत्रांची,फाईल्सची,डेटाची देवाणघेवाण करत असते तेव्हा त्याला इलेक्ट्राँनिक डेटा इंटरचेंज असे म्हणतात.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर ईडीआय ही एक अशी कम्युनिकेशन सिस्टम आहे ज्यामध्ये कोणत्याही डेटाला,इनफरमेशनला आपण एका कंप्यूटर वरून दुसरया कंप्यूटर वर इलेक्ट्राँनिक पदधतीने पाठवू शकतो तसेच रिसिव्ह करू शकतो.
यात आपल्याला एका कंप्यूटर वरून दुसरया कंप्यूटर वर डेटा इनफरमेशन पाठविण्यासाठी कुठलेही पेपरवर्क करावे लागत नसते.अणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे ह्या सर्व प्रक्रिये मध्ये आपणास कुठल्याही मानवी हस्तक्षेपाची देखील आवश्यकता भासत नसते.
ईडी आय सिस्टममची कार्यप्रणाली –
● इडी आय सिस्टमदवारे जो डेटा फाईल इनफरमेशन आपल्याला पाठवायची असते सर्वप्रथम त्याला संग्रहित करण्यात येते.त्याचे नीट व्यवस्थापन करण्यात येते.
● यानंतर ज्या डेटा फाईल इनफरमेशनला दुसरय्या कंप्यूटर वर सेंड करायचे आहे त्याला ट्राँसलेटर साँप्टवेअर दवारे इडिआय फाँरमँट मध्ये भाषांतरीत करण्यात येते.
● यानंतर गंतव्य ठिकाणी हे डाँक्युमेंटस,फाईल, इनफरमेशन इलेक्ट्राँनिक पदधतीचा वापर करून सेंड केले जातात.ह्या सर्व डाँक्युमेंटला फाईल्सला एचटीटीपी,एचटीटीपीएस,एफ टीपी ह्या प्रोटोकाँल्सच्या दवारे ट्रान्सफर करण्यात येत असते.
● अणि मग सेंडरने डेटा सेंड केल्यावर तो रिसिव्हर पर्यत पोहचत असतो पण जोपर्यत मेलबाँक्समध्ये जाऊन रिसिव्हर डेटाला फाईलला बघत नाही तोपर्यत ती फाईल रिसिव्हरच्या मेल बाँक्समध्येच पडुन राहत असते.
इडी आय सिस्टमचे कोणकोणते फायदे असतात?benefits of edi system in Marathi
● इडी आय सिस्टमच्या मदतीने आपण कुठलाही महत्वाचा डेटा,फाईल इनफरमेशन एका कंप्यूटर वरून दुसरया कंप्यूटर इलेक्ट्राँनिक पदधतीने काही सेकंदात पाठवू शकतो.
● ह्या प्रक्रिये मध्ये डेटा इनफरमेशनची देवाणघेवाण अचुक पदधतीने होते यात चुका होण्याची शक्यता फार कमी असते.
● इडीआय सिस्टमच्या मदतीने आपण खुप कमी वेळात महत्वाच्या डेटा फाईल्सची इनफरमेशनची आपापसात देवाणघेवाण करू शकतो.ते ही कुठेही न जाता फक्त कंप्यूटर दवारे.
● यात कुठल्याही पेपरवर्कची देखील आवश्यकता नसते.
● इडीआय सिस्टममध्ये डेटा पाठवण्यासाठी आपणास द्यावी लागणारी काँस्ट देखील फार कमी असते.
इलेक्ट्राँनिक डेटा इंटरचेंजचा वापर प्रामुख्याने कुठे केला जातो?
इलेक्ट्राँनिक डेटा इंटरचेंजचा वापर प्रामुख्याने व्यवसाय क्षेत्रात बी टु बी business to business ईकाँमर्समध्ये केला जात असतो.
इलेक्ट्राँनिक डेटा इंटरचेंजमध्ये सेंडर अणि रिसिव्हर कोणाला म्हणतात?
इलेक्ट्राँनिक डेटा इंटरचेंज मधील सेंडर अणि रिसिव्हरची व्याख्या –
Sender -पाठवणारा
इलेक्ट्राँनिक डेटा इंटरचेंज मध्ये ज्या कंप्यूटर दवारे डेटा फाईल सेंड केली जाती आहे त्याला सेंडर असे म्हटले जाते.
Receiver – प्राप्तकर्ता
इलेक्ट्राँनिक डेटा इंटरचेंज मध्ये ज्या कंप्यूटर दवारे डेटा फाईल रिसिव्ह करण्यात येत आहे त्याला रिसिव्हर असे म्हटले जाते.
इलेक्ट्रा़ँनिक डेटा इंटरचेंज मधील इलेक्ट्राँनिक पदधतीने देवाणघेवान करण्यात येणारी काही महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?
● Invoice -पावती
● Purchase order -खरेदी आँडर
● Shipping request -शिपिंग विनंती
● Acknowledgement -पोचपावती
● Business correspondence letter -व्यवसाय पत्रव्यवहार पत्रे
● Financial information letter -आर्थिक माहीती पत्र