निवडणुक चिन्हाविषयी माहीती- Electoral Symbol Information in Marathi
निवडणुक चिन्हाचा जर वाद निर्माण झाला तर आपल्यातील खुप जणांच्या मनात निवडणुक चिन्हाविषयी काही प्रश्न निर्माण तर चिन्ह कोणत्या पक्षल जाऊ शकते याचे घटनात्मक नियम काय आहेत ज्यांची उत्तरे आज आपण आजच्या लेखात थोडक्यात जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
1)निवडणुक चिन्ह काय असते?
निवडणुक चिन्ह हे एक प्रमाणित चिन्ह तसेच निशानी असते जिचे वितरण निवडणुक आयोगाकडुन राजकीय पक्षांना निवडणुक लढवण्यासाठी केले जात असते.
2)निवडणुक चिन्ह कधी अणि कशासाठी वापरले जाते?
निवडणुक चिन्हाचा वापर हा कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराकडुन आपला प्रचार करताना केला जात असतो.
अणि हेच निवडणुकीचे चिन्ह मतदान करत असलेल्या व्यक्तींना निवडणुक लढवत असलेल्या उमेदवाराच्या नावापुढे इलेक्ट्राँनिक वोटिंग मशिनवर देखील दिसुन येत असते.म्हणजेच ही निवडणुक लढवत असलेल्या पक्षाची तसेच उमेदवाराची ओळख असते.
3)निवडणुक चिन्हाचा मुख्य उददेश काय असतो?निवडणुक चिन्ह आणण्याचे मुळ कारण काय होते?
मतदान करत असलेल्या लोकांना जर वोटिंग करताना निवडणुक लढवत असलेल्या उमेदवाराचे नाव ते निराक्षर असल्यामुळे वाचता येत नसेल तर अशा परिस्थीतीत वाचना येत नसताना देखील कुठल्याही पक्षाला आयोगाने दिलेले ठाराविक निवडणुक चिन्ह ओळखुन लोकांना मतदान करता यावे यासाठी निवडणुक आयोगाकडुन निवडणुक चिन्ह आणण्यात आले होते.
4)निवडणुक चिन्हांची वाटप प्रक्रिया कशी पार पडत असते?
राखीव चिन्ह आहे अशा पक्षास सुरूवातीलाच अधिकृत चिन्ह देण्यात आलेले असते.
जेव्हा एखादा पक्ष तसेच त्यांचा उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरत असतो.तेव्हा त्याला निवडणुक आयोगाच्या मुक्त चिन्हांच्या यादीमधील तीन चिन्हांची यादी ही निवडणुक अधिकारी कडुन प्राप्त होत असते.
त्यापैकी पक्ष तसेच उमेदवार यांना प्रथम येईल त्याला पहिले प्राधान्य दिले जाईल ह्या तत्वावर चिन्ह देण्यात येत असते.
5)आशिया खंडात निवडणुक चिन्हाचा वापर सर्वप्रथम कोठे करण्यात आला?
आशिया खंडात निवडणुक चिन्हाचा वापर हा सर्वप्रथम श्रीलंका ह्या देशामध्ये करण्यात आला होता.
6) निवडणुक चिन्हाची सुरुवात कधी झाली?
ही संकल्पणा कशी अणि कुठुन उदयास आली?यामागचा मुख्य इतिहास काय आहे?
आशिया खंडात असलेला भारताचा शेजारील देश श्रीलंका हा भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त होण्याच्याही अगोदर स्वतंत्र झाला होता.
श्रीलंका ह्या देशाची अवस्था पण एकदम भारतासारखीच होती तिथे देखील निरक्षरतेचे अधिक प्रमाण होते.
तेव्हा तिथे जी निवडणुक लढवली गेली तिथे एक ठाराविक चिन्हाचा वापर करण्यात आला होता.जेणेकरून तेथील निराक्षर लोकांना हे समजेल की आपण कोणाला मतदान करतो आहे?आपले मत कोणाला जाते आहे?
म्हणजेच निरक्षरता हे निवडणुक चिन्ह येण्याचे प्रमुख कारण आहे.
भारतातील निवडणुक चिन्हांचा वाद कधी सुरू झाला?
भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर इथे लोकसभा तसेच विधानसभा या दोन्ही निवडणुकांना आरंभ झाला.तेव्हा निवडणुक चिन्हाला आज आहे तितके महत्व अजिबात नव्हते.आज निवडणुक चिन्हावर जे वादविवाद होत आहेत ते तेव्हा होत नव्हते.
याला देखील एक मोठे कारण आहे.राज्य अणि केंद्र दोघे ठिकाणी तेव्हा फक्त काँग्रेसची सत्ता होती.कारण तेव्हा काँग्रेस हा एकच पक्ष होता.
1967 च्या कालावधीत जेव्हा भारतात क्षेत्रीय दल उदयास आले तेव्हा काँग्रेससोबत इतरही पक्ष अणि त्यांची निवडणुक चिन्हे उदयास आली.
मग त्यांना नियंत्रित तसेच व्यवस्थापित करण्याची आवश्यकता भासु लागली तेव्हा इलेक्शन कमिशनने निवडणुक चिन्हांना नियंत्रित करण्याकरीता1968 मध्ये एक नियमावली तयार केली.
1968 च्या दिलेल्या नियमांतर्गत निवडणुक चिन्हे ही दोन भागात विभाजित करण्यात आली.
१) राखीव चिन्हे –
राखीव चिन्हाचे वितरण अशा पक्षास तसेच उमेदवारास केले जाते जे राज्य तसेच राष्टीय पक्ष आहेत.
२) अराखीव चिन्हे –
अराखीव चिन्ह हे अपक्ष निवडणुक लढत असलेल्या उमेदवारास फाँर्म भरून झाल्यावर निवडणुक आयोगाकडुन दिले जात असते.
2004 मध्ये यात काही बदल घडुन आले होते ज्यात 2004 नंतरच्या कालावधीत प्राण्यांचे चिन्ह बंद करण्यात आले ते फक्त 2004 च्या आधीच्या कालावधी साठी लागु होईल असे सांगण्यात आले.
पक्षाचे चिन्ह कधी जाते?
जेव्हा एखाद्या पक्षाचा राष्टीय अणि राज्य असे दोघे दर्जे नष्ट होतात तेव्हा त्या पक्षाचे चिन्ह जात असते.
निवढणुक चिन्हाविषयी वाद कधी निर्माण होऊ शकतो?
निवडणुक चिन्हाविषयी वादाचा प्रसंग पुढील दोन प्रसंगी निर्माण होऊ शकतो.
● जेव्हा दोन वेगळे पक्ष एकाच चिन्हावर सारखेच दावा करतात.
● पक्षात फुट पडते तेव्हा
पक्षाचे चिन्ह कोणाला मिळेल हे कसे ठरविण्यात येते?
चिन्हावर दावा करण्याची पहिली अट अशी असते की फुटलेला गट हा २/३ पेक्षा मोठा असणे गरजेचे आहे.
यात भारतीय निवडणुक आयोग हे बघते की त्या पक्षात पक्षप्रतिनिधी अणि लोकप्रतिनिधी किती आहेत.कारण पक्ष प्रतिनिधी अणि लोकप्रतिनिधी ज्याच्या बाजुने अधिक असतात त्याला हे चिन्ह संविधानानुसार प्राप्त होत असते.
भारतीय निवडणुक आयोगाने घेतलेला निर्णय हा शेवटचा निर्णय ठरत असतो.
पक्ष प्रतिनिधींमध्ये कोणकोणाचा समावेश होत असतो?
पक्ष प्रतिनिधींमध्ये पक्षाच्या जिल्हाअधिकारी,जिल्हाअध्यक्ष,सचिव,सरचिटणीस अणि उपाध्यक्ष इत्यादी यांचा समावेश होत असतो.
लोकप्रतिनिधींमध्ये कोणाकोणाचा समावेश होत असतो?
लोकप्रतिनिधींमध्ये पक्षाचे आमदार अणि खासदार यांचा समावेश होत असतो.
Comments are closed.