बाबासाहेब आंबेडकर निबंध तसेच भाषण | Essay On Dr. Babasaheb Ambedkar
भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे आज प्रत्येक भारतीय व्यक्तीकरीता, आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने गरीबीतुन शिक्षण घेत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांकरीता एक आदर्श उदाहरण आहेत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १९९१ रोजी मध्य प्रदेशातील महु ह्या गावात झाला होता.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भीमाबाई अणि त्यांच्या वडिलांचे नाव रामजी बाबा असे होते.आंबेडकर फक्त पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते.
बालपणापासूनच बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यासात खुप हुशार होते,बाबासाहेब हे अत्यंत चाणाक्ष बुदधीचे होते.दलित कुटुंबात जन्माला आलेले असल्याने शालेय जीवनापासूनच त्यांना जातीयभेदाला सामोरे जावे लागले.
बाबासाहेब आंबेडकर यांना आधीपासूनच वाचनाची शिक्षणाची अत्यंत आवड होती हेच कारण आहे की रोज अठरा अठरा तास ते तहानभूक विसरून वाचणात नेहमी दंग असायचे.
१९०७ मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई विद्यापीठामधील मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्ती मधुन बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाची थोडक्यात माहिती
बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात जाऊन अर्थशास्त्र विषयात एम ए तसेच डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.
परदेशात असताना बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तसेच कोलंबिया विश्व विदयालयातुन अर्थशास्त्र ह्या विषयात डॉक्टरेट पदवी प्राप्त केली होती.
पुढे जाऊन बाबासाहेब आपले वकिलीचे शिक्षण पुर्ण करत बॅरिस्टर देखील बनले.बाबासाहेब आंबेडकर यांनी एकुण २६ डिग्री प्राप्त केलेल्या होत्या.
माणसाला माणसासारखीच वागणुक देण्यात आली पाहिजे खालच्या जातीतील वरच्या जातीतील असा भेदभाव त्याच्या सोबत कधीही करू नये आपण सर्व एक आहोत असे बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत.
समाजातील विषमता दुर करण्यासाठी अस्पृश्यांना आपले हक्क प्राप्त व्हावा यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी सदैव प्रयत्न केले.
यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात अस्पृश्यांना देखील प्रवेश दिला जावा यासाठी सत्याग्रह केला होता.जाती भेदाला खतपाणी घालणाऱ्या मनुस्मृतीस अग्नीत दहन देखील केले.
समाजातील स्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव संपवण्यासाठी समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यासाठी महड तसेच काळाराम मंदिर सत्याग्रह सारखे अनेक महत्वाचे सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
महिलांना संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी हिंदु कोड बिल मध्ये महिलांसाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या.सर्व समाजाला समतेची वाट दाखवत अस्पृश्यता निवारणाचे काम केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही प्रेरणादायी विचार
बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतातील जातीव्यवस्थेला प्रखर विरोध होता याचकरीता त्यांनी आयुष्यभर जातीय भेदाविरुदध लढा देण्याचे काम केले.
जातीयभेदा विरूद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी आपल्या समस्त अनुयायांसमवेत त्यांनी १४ आॅक्टोंबर १९५६ रोजी हिंदु धर्माचा त्याग करत त्यांनी बौदध धर्मात प्रवेश केला.
बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मुलमंत्र जगाला दिला.
याचसोबत बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढयात देखील महत्वाचे योगदान दिले होते.
बाबासाहेब आंबेडकर यांनीच आपल्या भारत देशाचे संविधान लिहिले होते म्हणून आपण त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार संविधानाचे जनक म्हणून देखील ओळखतो.
अशा ह्या महामानवाचे बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानावर महापरिनिर्वाण झाले.यालाच आपण ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन म्हणून देखील साजरा करतो.
मरणोत्तर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात साजरी केली जाते.