Etiquette – शिष्टाचार म्हणजे काय?- Etiquette information in Marathi
आपण आपल्या दैनंदिन जीवनात सभोवताली घडणाऱ्या लहान सहान गोष्टींची कधी बारकाईने निरीक्षण केलंय का? घाईने समोरून येणाऱ्या एकाद्या करता लिफ्ट थांबूवुन ठेवणे,, अनोळखी माणसाने कुणी मदत केल्यास थोडं हसून ,धन्यवाद,आभार मानणे. बस मध्ये गरजू ला आपली जागा देणे. एकाद्या अंध किंवा वयस्कर व्यक्ती ला रस्ता ओलडुंन देण्यास मदत करणे??
आपल्यात आपण एक मनुष्य म्हणून आणि प्राणीमात्र त नेमका काय फरक आहे? वेगळं काय?
मनुष्य म्हणून आपण समाजात कश्या पद्धतीने वावरल पाहिजे, वागलं पाहिजे असा विचार करतो तेव्हा शिष्टाचाराचे महत्व लक्षात येते.
कोणत्या ही व्यक्तीने समाजात जबाबदार पणे वागावं हे समाजाला अभिप्रेत असते.
आपल्या सभोवताली असलेल्या लोकांना आपल्या वागूणकीन लाजिरवाण वाटणार नाही अशी वागणूक आपली असली पाहिजे.
जनमानसात वावरताना अतार्किक ,असमंजस,अवास्तव, असंबद्ध, गोंधळलेला अशी वागणूक असू नये .
ईटीक्वेट्स म्हणजे काय? – Etiquette Meaning in Marathi
ईटीक्वेट्स म्हणजे औपचारिक सामाजिक सदवर्तन व अलिखित नियमांचे मार्गदर्शक तत्व आहेत जे आपण आपल्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात पाळावयास हवेत. यालाच आपण शिष्टाचार ही म्हणतो. एरिक्वेट्स आपल्याला सभ्य, सुसंकृत व नम्रपणे एकमेकांशी वागावं यावर भर देतात.
साध्या व सोप्या भाषेत ईटीक्वेट्स म्हणजे सदवर्तन, चांगली वागणूक, चांगली वर्तणूक ज्या द्वारे एक मनुष्य म्हणून आपल्यातला व आणि प्राण्याच्या वागणुकीतला फरक ठळकपणे जाणवतो.
मनुष्य एक समाजप्रिय माणूस असून , माणसा करता सदवर्तन, चांगल्या रीतीने वागणं याला खूप महत्व असते.
या एकप्रकारे समाजाने आखून दिलेल्या सीमा,पायंडे किंवा अलिखित नियम असतात त्यांना अनुसरून व्यक्तीनं वागलं पाहिजे अश्या अपेक्षा असतात .
शिष्टाचार आपल्याला समाजात कसे चालावं, वागावं हे तर शिकवतेच पण सर्वात महत्वाचं म्हणजे इतरांशी कसे वागावं हे शिकवते.
इतकंच न्हवे तर बोलण्याचा, चालण्याचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वागण्याचा मार्ग शिकवते.
ईटीक्वेट्स च महत्व – Importance of Etiquette in social life
1) आपण इंग्रजी म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन – प्रथमदर्शीनी प्रभाव पडण्या करता शिष्टचारपूर्वक वागणं मदत करते
2) तुमी आपल्या सहकाऱ्यांशी वरिष्ठांशी,, कनिष्ठांशी कसे वागता, आपल्या पालकांशी , कुटुंबातील व्यक्तींशी ,आपल्या मित्रांशी कार्यालायनी सहकारी कामगारांशी आपण कश्या प्रकारे संवाद साधता त्यावरून आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल समोरच्याला कळत, इतकंच न्हवे तर आपल्यावर झालेलं संस्कार ही समोर येतात.
3) शिष्टाचार ने असलेली वागणूक आपल्याला समाजात आदर आणि कौतुक मिळवून देते.
4) ज्या व्यक्ती ला समाजात कसे बोलायचे किंवा कसे वागावे हे माहित नसते अश्या व्यक्तीशी सहसा कुणी बोलत नाही,समंजस व्यक्ती बोलण्याच टाळत असतो.
5) शिष्टाचारपूर्वक वर्तणूक व्यक्तींमध्ये एक प्रकारचा दृढ विश्वास आणि निष्ठा भावना वृद्धिंगत करण्यास मदत करतात.
6) व्यक्ती अधिक जबाबदारीने वागतो तसेच अधिक समंजस आणि प्रगत दिसतो
7) शिष्टाचार व्यक्तींना समाजातील नातेसंबंधांना अधिक महत्त्व देण्यास ,नाती जोपासण्यास मदत करते.
शिष्टाचाराचे प्रकार – Types of Etiquette
समाजिक शिष्टाचार-
समाजात आपण कसे वागलं पाहिजे हे आपल्याला सामाजिक शिष्टचार शिकवतात
प्रसाधन शिष्टाचार- प्रसाधन शिष्टाचार यात आपण सार्वजनिक किंवा कार्यालयीन टॉयलेट किंवा बाथरूम , किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहांचा कसा योग्य वापर करावा हे लक्षात आणून देत. आपण वापर केल्या नंतर त्यास स्वच्छ व नीटनेटकं कसे ठेवावा हे समजते.
कार्यालयीन शिष्टाचार-
या शिष्टाचारत एखाद्या व्यक्तीने कामावर असताना आपल्या इतर कार्यालयीन कर्मचारी , वरिष्ठ , सहकारी तसेच कनिष्ठांशी कसे से वागावे याच महत्व पाठवून देते. संस्थेच्या मर्यादा पाळल्या जातील याची दक्षता घेतली पाहिजे. इतरांच्या कर्तव्यात ,कामात ढवळाढवळ टाळली पाहिजे.
विवाहसोहळा शिष्टाचार –
लग्न ही प्रत्येकच्या आयुष्यातील एक महत्वाचा प्रसंग असतो, अश्या ठिकाणी सर्वांनी अतिशय संवेदनशील वागणं अपेक्षित असते. उशिरा जाणे किंवा उधळपट्टी टाळली गेली पाहिजे.
मीटिंग शिष्टाचार –
यात एकाद्याने , कार्यालयीन बैठका, सेमिनार मध्ये कसे वागावे यावर भर देते.मिटिंग मध्ये कोण काय बोलतेय यावर लक्ष पूर्वक ऐकलं पाहिजे. सोबत नोट्स घेण्यासाठी आवश्यक पेन, वही सोबत ठेवली पाहिजे. आवश्यक त्या ठळक व महत्त्वाच्या बाबी त्यात नमूद केल्या गेल्या पाहिजेत.
फोन संभाषण शिष्टाचार –
फोन वर बोलताना समोरील व्यक्तीशी कसा संवाद साधावा हे महत्त्वाचे असते. फोन वर समोरच्या ला ताटकळत न ठेवणे , बोलणं सुरू होण्या आधी आदरार्थी संबोधने. आवाजात नम्रता ठेवणे.इत्यादी बाबी यात समाविष्ट होतात.
जेवतांना पाळावयाचे शिष्टयाचार- सार्वजनिक ठिकणी जेवताना योग्य वर्तुणूक असली पाहिजे. गोंधळ गडबड न करणे. सुरवात करताना आणि शेवट होण्या पर्यंत इतरांची वाट पाहणं यात समावेश होतो.
व्यावसायिक शिष्टाचार –
आपल्याकडे म्हटलं ज जातं की ग्राहक की भगवान है ,तसेच व्यवसायात ग्राहकांची फसवणुक होणार नाही याची काळजी घेणं, नितीमत्तेला अनुसरून व्यवसाय करणे, अनैतिक पध्दती टाळण् याचा यात समावेश होतो.
शिष्टाचार -दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे – Examples of Etiquette
1) चुकल्यास ,समोरच्याची माफी मागणे.
2) वडीलधारी लोकांशी आपुलकी आणि आदराने संबोधने
3) समोरासमोर बोलत असताना फोन,लॅपटॉप चा अनावश्यक वापर टाळणे
4) बोलताना डोळ्यास डोळा मिळवून बोलणे. उगाच भलतीकडे पाहत बोलू नये.
5) उत्तम काम केल्यास कौतुक, अभिनंदन करणे
6) दिलेल्या वेळा पाळणे
7) चुका स्वीकारणे
8) बस ,रेल्वेत , वयस्कर किंवा गरजू व्यक्तींना तसेच स्रियांना जागा मिळवून देणे
9) लिफ्ट मध्ये जाताना समोरून येणाऱ्या व्यक्ती करता 5-10सेकंद वाट पाहणे
10) समोरचा काय सांगतोय ते लक्ष पुर्वक ऐकून मगच मत मांडणे
11) रांगेत च उभे राहणे
12) उधार घेतलेले पैसे वेळेवर परत करणे
13) उगाच च अनाहूत सल्ला न देणे
14) कनिष्ठ सहकारीशी आदराने वागणे
15) एकाद्या च्या खाजगी गोष्टीच भान ठेवणे.
16) मर्यादा, नियमावली व मार्गदर्शक तत्वां चा अनुसरून करणे, पाळणे.