शेतकरयांना लोखंडी तारांच्या कुंपनाकरीता दिले जात आहे ९० टक्के अनुदान – Farmer scheme Wire Fence Plan In Marathi
शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आज शेतकरी शेतात दिवसरात्र राबतो तेव्हा आपणास देशातील इतर लोकांना अन्न धान्य प्राप्त होते.
आपल्या देशातील शेतकऱ्यांना आपल्या ह्या कष्टाचे योग्य ते मोल दिले जावे यासाठी आपल्या देशाचे सरकार नेहमीच प्रयत्नशील असते.
यासाठी सरकार शेतकरयांना लाभदायक ठरतील अशा विविध योजना राबवित असते तार कुंपन योजना ही देखील अशाच काही लाभदायक योजनांपैकी एक आहे.
तार कुंपन योजनेअंतर्गत शासन शेतकऱ्यांना शेतात लोखंडी तारांचे कुंपन तयार करण्यासाठी ९० टक्के इतके अनुदान प्रदान करीत आहे.
लोखंडी तार कुंपन योजनेमुळे शेतकरयांचे शेत हे प्राण्यांपासून सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.म्हणजे शेतकरयांच्या शेतामध्ये जी मोकाट जनावरे अचानक दिवसाढवळया रात्री अपरात्री घुसुन येतात अणि शेतात लावलेल्या पिकांचे नुकसान करतात ह्या गोष्टीला कायमचा आळा बसणार आहे.
लोखंडी तार कुंपन बसवल्यामुळे शेतकरींना त्यांचे शेवटचे धरण कुठपर्यंत आहे हे समजण्यास मदत होणार आहे.याने शेतीमध्ये हददीवरून जे शेतकरी लोकांमध्ये आपापसात वादविवाद भांडणे होतात ते होणार नाहीत.
लोखंडी तार कुंपन योजनेअंतर्गत शेतकरींना उपकरणांची खरेदी केल्यावर ५० ते ८० टक्के अनुदान देखील दिले जाते.
हया योजनचा लाभ ओबीसी तसेच एससी एसटी कॅटॅगरी मधील शेतकरी वर्गाला मिळणार आहे.
लोखंडी तार कुंपन योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी पुढील महत्वाचे डाॅकयुमेंट लागतील.
जागतिक झोपेचा दिवस २०२३ महत्त्व : तो कधी सुरू झाला, थीम
● अर्जदाराला आपली ओळख पटवून देण्यासाठी आधार कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे लागतील.
● पॅन कार्ड
● बॅक पासबुक झेरॉक्स
● अॅडृ्रेस प्रुफ
● जात प्रमाणपत्र
● जमिनीची आवश्यक असलेली महत्वाची कागदपत्रे
● दोन पासपोर्ट साईज फोटो
● अर्जदाराचा संपर्क क्रमांक
Farmer Scheme Wire Fence Plan In Marathi
ह्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक असलेली अवजारे साहित्य विकत घेण्यासाठी ९० टक्के इतके अनुदान दिले जाते.
म्हणजे समजा शेतीमध्ये लागत असलेल्या एका यंत्राची किंमत १०० रूपये आहे.तर यात शेतकरी वर्गाला फक्त १० रूपये इतका खर्च आपल्या खिशातुन करावा लागेल बाकीचे ९० रूपये शासनाकडुन अनुदान म्हणून दिले जाते.
फक्त ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारया शेतकरींच्या जागेवर कुठलेही अतिक्रमण असु नये.तसेच शेतकरीने निवडलेले क्षेत्र वन्य प्राणी जनावरे यांच्या भ्रमण मार्गामध्ये येत नसावे.
शेतकरीला आपल्या शेतामध्ये वन्य प्राणी जनावरे यांच्या पासुन नुकसान होत आहे याचे प्रमाण द्यावे लागेल.
सदर योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकरयास विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक ते कागदपत्र जोडुन संबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांच्या कडे सादर करावा लागणार आहे.