फायनान्शिअल लिटरेसी म्हणजे काय? – Financial literacy meaning in Marathi
फायनान्शिअल लिटरेसीचा मराठीत आर्थिक साक्षरता असा अर्थ होत असतो.
आर्थिक साक्षरता म्हणजे आपल्या कमवलेल्या पैशाचा कुठे वापर करायचा?कसा वापर करायचा अणि किती वापर करायचा ते कुठे खर्च करायचे कुठे गुंतवायचे?अणि कुठे खर्च नाही करायचे याविषयीचे घेतलेले सखोल ज्ञान तसेच शिक्षण होय.
आपल्या कमवलेल्या पैशाचा योग्य पदधतीने वापर करण्याची त्याचे योग्यरीत्या व्यवस्थापन करण्याची समज म्हणजे आर्थिक साक्षरता होय.ही आर्थिक साक्षरतेची थोडक्यात अणि सोपी व्याख्या आपणास करता येईल.
आर्थिक साक्षर कोणाला म्हणता येईल?who is called financial literate person in Marathi
आपण अशा व्यक्तीला आत्ताच्या काळात आर्थिक साक्षर व्यक्ती म्हणु शकतो.
ज्याला ह्या गोष्टीचे उत्तम ज्ञान आहे की आपण आपल्या पैशाचा वापर कशा पदधतीने करायला हवा.कुठे करायला हवा?आपले कमवलेले पैसे कोणत्या ठिकाणी गुंतवायचे त्यांचे व्यवस्थापन कशा रीतीने करायचे?
आर्थिक साक्षरता का महत्वाची आहे?why financial literacy is important in Marathi
आपल्या अणि आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कमवलेल्या पैशाचे योग्य पदधतीने व्यवस्थापन करण्यासाठी,त्याचा सदुपयोग करण्यासाठी आपणास आर्थिक साक्षरता प्राप्त करणे फार आवश्यक आहे.
आर्थिक साक्षरता ह्यासाठी देखील महत्वाची आहे की आज पाहायला गेले तर आपणास असे दिसुन येते की गरीब व्यक्ती दिवसेंदिवस अजुन गरीब होत चालला आहे.अणि श्रीमंत व्यक्ती आधीपेक्षा अधिक श्रीमंत होत चालला आहे.
कारण गरीब व्यक्तीला आपल्या कमवलेल्या पैशांचे व्यवस्थापन कसे करायचे?हेच ज्ञान नसते.थोडक्यात आपल्या पैशात वाढ कशी करायची हेच त्यांना माहीत नसते.
ज्यामुळ गरीब व्यक्ती इतरांसमोर शो आँफ करण्यासाठी कुठेही कशाही पदधतीने आपले पैसे खर्च करतो?तसेच आपल्या खर्चावर देखील नियंत्रण ठेवत नही.ज्याचे परिणाम स्वरूप तो दिवसेंदिवस अजुन गरीब तसेच कर्जबाजारी होत जातो.त्याच्याजवळ भरपुर पगाराची नोकरी असुन देखील पैसे टिकत नसतात.
आपल्याला सर्वानाच माहीत आहे की आपल्या भारत देशातील 90 टक्के लोक हे नोकरदार व्यक्ती आहेत.
जे पैसा तर खुप कमवतात महिन्याला लाखात वेतन कमवतात पण तो पैसा कुठे अणि किती खर्च करायचा आपल्या एकुण गरजा किती आहेत अणि आपण किती निरर्थक खर्च करतो आहे याचे सखोल नाँलेज नसल्यामुळे नियोजन आखलेले नसल्यामुळे त्यांना लाखो रूपये देखील घर चालवण्यासाठी महिन्याला पुरत नसतात.
हे असे का होते?कारण ते कधीच आपल्या पैशाचे नीट व्यवस्थापन करीत नाही.आपण आपल्या पैशाचा कसा वापर करतो आहे याकडे लक्ष देत नही.
आज आपल्याला प्रत्येकालाच फायनान्शिअल फ्रिडम म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य हवे आहे.
पण आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी आधी आपल्याला आर्थिक साक्षरता प्राप्त करावी लागेल आपल्या पैशाचे योग्य रीत्या व्यवस्थापन करणे शिकावे लागेल तेव्हाच आपण आर्थिक समस्यांमधुन बाहेर पडुन लवकरात लवकर फायनान्शिअली फ्री होऊ शकतो.
फायनान्शिअल फ्रिडम म्हणजे काय Financial freedom meaning in Marathi
फायनान्शिअल फ्रिडम म्हणजे पैशांच्या चिंतेपासुन तंगीपासुन अडचणीपासुन कायमची मुक्ती प्राप्त करणे होय.
थोडक्यात सांगायचे म्हटले आपल्याकडे किमान इतका पैसा असावा ज्यात आपण आपल्या अणि आपल्या परिवाराच्या मूलभूत गरजा दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक खर्च भागवू शकतो.
आर्थिक साक्षरतेचे फायदे कोणकोणते आहेत?benefit of financial literacy in Marathi
● आर्थिक साक्षरता प्राप्त केल्याने आपल्याला आपल्या पैशांचे नीट व्यवस्थापन करता येते.याने आपल्याला दैनंदिन जीवनात पैशांची अडचण येत नही.घरात पैशांची तंगी येत नही.
● दैनंदिन जीवनातील अनावश्यक खर्च टाळता येतो.
● आपल्या पैशांचा योग्य तिथे वापर करता येतो.
● आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व खर्चाचा हिशोब ठेवता येतो.
● आर्थिक साक्षरता प्राप्त केल्याने आपणास आपल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन करून लवकरात लवकर कमी वयातच आर्थिक स्वातंत्र्य देखील प्राप्त करता येते.
● आर्थिक साक्षरता प्राप्त केल्याने दिर्घकालीन गुंतवणुक करून पैशाने पैसा कसा जमवायचा याचे आपणास नाँलेज प्राप्त होत असते.
फायनान्शिअल एज्युकेशन म्हणजे काय?Financial education meaning in Marathi
फायनान्शिअल एज्युकेशन म्हणजे आर्थिक शिक्षण.
पैशाचा योग्य पदधतीने वापर कसा करायचा त्याचे व्यवस्थापन कशा पदधतीने करायचे हे समजुन घेण्याची क्षमता तसेच हे समजावून सांगणारे शिक्षण म्हणजे आर्थिक शिक्षण होय.
फायनान्शिअल अव्हेरनेस म्हणजे काय?financial awareness meaning in Marathi
फायनान्शिअल अवेरनेस म्हणजे आर्थिक जागृकता आर्थिक सतर्कता होय.
आपल्या पैशाचा कुठे किती अणि कसा वापर करायचा आपले पैसे कुठे गुंतवायचे कुठे नाही गुंतवायचे याविषयीची जागृकता सतर्कता असणे म्हणजे फायनान्शिअल अवेरनेस होय.
फायनान्शिअल नाँलेज म्हणजे काय?financial knowledge meaning in Marathi
फायनान्शिअल नाँलेज म्हणजे आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार,पैशाचे व्यवस्थापन कसे करावे,पैशांची बचत गुंतवणुक कशी करावी पैशांचा वापर कसा करावा आपल्या पैशांची गुंतवणुक नेमकी कुठे करावी या सर्व आर्थिक बाबींची माहीती असणे ज्ञान असणे होय.