फिश ऑईल चे फायदे –Fish oil benefit in Marathi
आजकालच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असा पोषक आहार आणि नियमित व्यायाम करत नाही.असे न करता आपण कितीही कामात व्यस्त असलो तरी त्याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर होऊ नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.
आपण नियमित व्यायाम केला पाहिजे आणि शरीराला पोषक अशा डाएट चे सेवन आपण केले पाहिजे.
आपण या लेखामध्ये अशाच आरोग्याला चांगल्या असणाऱ्या फिश ऑईल म्हणजे मास्याच्या तेला बद्दल माहिती पाहणार आहोत.
काही लोकांना मांसाहारी पदार्थ आवडतात .काही मांसाहारी पदार्थ शरीरासाठी चांगले असतात ,यातच फिश ऑईल येते.हे फिश ऑईल त्यांच्या साठी देखील फायद्याचे ठरते ज्याच्या शरीरामध्ये ओमेगा ३ एसिड से प्रमाण कमी आहे आणि ते मासे खात नाहीत अशा.
फिश ऑईल म्हणजे काय
मास्यांच्या tissue पासून तयार होणाऱ्या तेलास फिश ऑईल म्हणले जाते.फिश ऑईल हे vitamin A आणि vitamin D से प्रमुख स्त्रोत आहे.बाकीच्या पदार्थ मधून मिळणाऱ्या ओमेगा ३ एसिड च्या तुलनेत फिश ऑईल पासून मिळणारे ओमेगा ३ एसिड शरीरासाठी चांगले असते.ओमेगा ३ हे फॅटी एसिड आहे आणि त्याचे तीन प्रकार पडतात.
फिश ऑईल खाण्याचे दहा प्रमुख फायदे :
१) आजच्या युगामध्ये अशी भरपूर लोक आहेत जे की हृदय संबंधी आजारापासून ग्रस्त आहेत.अशा माणसांना फिश ऑईल हे वरदान आहे.फिश ऑईल खाल्याने हृदय संबंधी आजार बरे होण्यास मदत होते.फिश ऑईल शरीरातील चांगल्या कॉलेस्ट्रॉल ला वाढवते आणि ब्लड प्रेशर ला नियंत्रित करते.
२) फिश ऑईल मेंदूसाठी देखील फायद्याचे आहे.ज्या लोकांच्या कामामध्ये त्यांना जास्त बुध्दीचा वापर करावा लागतो,अशा लोकांनी फिश ऑईल चे सेवन केले पाहिजे.आपल्या मेंदूला निरोगी ठेवनाऱ्या हार्मोन साठी फिश ऑईल फायदेशीर ठरते.
३) वाढत्या वया सोबत माणसांची ताकद कमी कमी होत जाते आणि हाडे देखील कमकुवत होत जातात.ओमेगा ३ एसिड हाडांना मजबूत बनवण्यामधे शरीराची मदत करते त्यामुळे आपण फिश ऑईल चे सेवन केले पाहिजे,जेणेकरून आपली हाडे मजबूत राहतील.
४) फिश ऑईल चे सेवन पुरुषांसाठी चांगले असते.हे पुरुषांच्या शरीरातील स्पर्म ची संख्या वाढवते.रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फिश ऑईल फायदेशीर ठरते.हे पुरुषा तील प्रोटेस्त कॅन्सर ला रोखते.
५) पुरुषा बरोबर स्त्री साठी देखील फिश ऑईल फायद्याचे ठरते.स्त्री जेव्हा गरोदर असते तेव्हा तिच्या शरीराला पोषक तत्वांची आवश्यकता असते.फिश ऑईल हे पोषक तत्व पुरवण्यासाठी मदत करते.
६) लहान मुलांसाठी देखील फिश ऑईल फायद्याचे ठरते.जर मुलांना लहान वयातच योग्य तो पोषक आहार पुरवला तर संपूर्ण आयुष्य ते स्वस्थ राहतात.जी लहान मुले कमजोर आहेत,त्यांच्यासाठी देखील फिश ऑईल फायद्याचे ठरते.फिश ऑईल ची मालिश लहान मुलांना केली तर त्यांची हाडे मजबूत होतात.
७) वाढत्या वया बरोबर तरुण आणि तरुणींच्या चेहऱ्यावर काळे डाग पडू लागतात. काळ्या डागांपासून वाचण्यासाठी फिश ऑईल फायद्याचे ठरते.फिश ऑईल ने जर आपण आपल्या शरीराची मालिश केलं तर आपली हाडे मजबूत होतात आणि त्वचा गोरी उठते.
८) वाढत्या वया सोबत आपल्या सर्वांना पांढरी केस आणि गळणारी केसे यांचं सामना करावा लागतो.आपण फिश ऑईल चे सेवन करून केस गळती आणि त्यांना पांढरे होण्यापासून वाचवू शकतो.आपण फिश ऑईल चे सेवन करण्या बरोबर ते केसांवरती लावू देखील शकतो.
९) रिपोर्ट नुसार शरीरात असणाऱ्या ओमेगा ३ फॅटी एसिड च्या कमतरतेमुळे आपल्या मनात नकारात्मक विचार येतात.शरीरातील ओमेगा ३ फॅटी एसिड ची संख्या वाढवण्यामध्ये फिश ऑईल मदत करते.
१०) ज्या लोकांचे वजन जास्त आहे आणि त्यांना त्यांचे वजन कमी करायचे आहे,अशा लोकांसाठी देखील फिश ऑईल फायद्याचे ठरते.फिश ऑईल आपल्या शरीरातील अनावश्यक फॅट कमी करण्यासाठी शरीराची मदत करते.
फिश ऑईल खाण्याचे काही नुकसान खालीलप्रमाणे:
१) सामान्यतः फिश ऑईल खाण्याचे काही नुकसान नसते,परंतु याचे जर जास्त प्रमाणात सेवन आपण केले तर त्याचे नुकसान आपल्याला भोगावे लागतील.
२) जर तुम्हाला मास्यांपासून एल्र्जी असेल तर तुम्ही फिश ऑईल चे सेवन केले नाही पाहिजे.
३) जर तुम्ही अगोदरच कोणत्यातरी मोठ्या आजारापासून ग्रस्त असाल तर तुम्ही डॉक्टर च्या सल्ल्या नंतरच फिश ऑईल चे सेवन केले पाहिजे.
४) ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी देखील डॉक्टर च्या सल्ला नंतरच फिश ऑईल चे सेवन केले पाहिजे.
५) जर तुम्ही एका दिवसात ३ ग्राम पेक्षा जास्त फिश ऑईल चे सेवन केले तर तुम्हाला ब्लिडींग चा त्रास होऊ शकतो.
फिश ऑईल कोणत्या ठिकाणाहून खरेदी करावे ?
तुम्ही कोणत्याही मेडिकल मधून फिश ऑईल खरेदी करू शकता.परंतु तुम्ही चांगल्या ब्रँड च्या फिश ऑईलची खरेदी केली पाहिजे आणि त्याचे सेवन केले पाहिजे.