पी व्ही आरचा फुलफाँर्म काय होतो? Full Form Of PVR In Marathi

पी व्ही आरचा फुलफाँर्म काय होतो? Full Form Of PVR In Marathi

आज सिनेमा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायला आपणा सर्वानाच आवडत असते.यासाठी आपण आधीपासुनच तिकिट देखील बुक करून ठेवत असतो.जेणेकरून आपला शो मिस होणार नाही.

आणि मग आपल्या बुक केलेल्या तिकिटाच्या शोच्या वेळेला जाऊन आपण आपल्या लाईफ पार्टनरसोबत,गर्लफ्रेंड तसेच मित्र मैत्रीणींसोबत जाऊन शो चा आनंद उपभोगत असतो.

जेव्हा आपण कुठल्याही मुव्हीचे तिकिट बुक करत असतो तेव्हा एक शब्द असा आहे जो आपल्या कानावर आपणास नक्की ऐकु येत असतो.आणि तो शब्द म्हणजे पीव्हीआर.

आजकल आपण सर्वच जण साध्या थिएटरमध्ये सिनेमा न बघता पीव्हीआर थिएटरमध्ये सिनेमा बघण्याला अधिक प्राधान्य देत असतो.

कारण इथे आपणास पिक्चर काँलिटी देखील दर्जेदार प्राप्त असते.आणि कुठेतरी हे आपल्या हाय स्टेटससाठी देखील गरजेचे ठरत असते.

आपल्यातील खुप जण पीव्हीआर थिएटर मध्ये सिनेमा पाहायला जातात पण पीव्हीआर म्हणजे काय असते? याचा फुलफाँर्म काय असु शकतो?हे जाणुन देखील घेण्याचा प्रयत्न करत नसतात याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे पीव्हीआर म्हणजे काय?त्याचा फुलफाँर्म काय होतो हे आपणास माहीत देखील नसते.

पण आपल्यातील काही जण असे देखील असतात ज्यांना ह्या सर्व गोष्टींबाबद सविस्तरपणे जाणून घेण्याची उत्सुकता असते.

अशाच गरजूंसाठी तसेच ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा असलेल्या व्यक्तींकरीता आज आपण पीव्हीआर म्हणजे काय आहे?त्याचा फुल फाँर्म काय होतो?तसेच पीव्हीआर संबंधित इतर महत्वाच्या बाबींविषयी सविस्तर जाणुन घेणार आहोत.

See also  जागतिक तापीर दिवस का साजरा केला जातो, | World Tapir Day In Marathi

पी व्ही आरचा फुलफाँर्म काय होतो?(Full Form Of PVR In Marathi)

पीव्ही आरचा फुलफाँर्म Priya Village Roadshow असा होतो.

पीव्हीआर हे काय आहे?

पीव्हीआर ही एक थिएटर कंपनी आहे जी भारतातील सर्वात मोठी थिएटर कंपनी म्हणुन प्रचलित आहे.

भारतामध्ये एकुण किती पीव्हीआर सिनेमागृह आहेत?

आज भारतामध्ये पीव्हीआरचे तब्बल 70 पेक्षा जास्त शहरांमध्ये सिनेमा हाँल आणि जवजवळ 850 स्क्रीन देखील आहेत.भारतातील अनेक अशी प्रमुख शहरे जसे की मुंबई,दिल्ली,कोलकत्ता इथे पीव्हीआर हे उपलब्ध आहे.

पीव्ही आर नावामागचा मुख्य इतिहास काय आहे?

प्रिया व्हिलेज रोडशो हे नाव ऐकायला आणि बोलायला आपणास खुपच विचित्र आणि अवघडल्यासारखे वाटते.म्हणुन आपण सर्वच जण पीव्हीआर म्हणने अधिक पसंद करत असतो.

पण ह्या नावाची प्राप्ती ह्या सिनेमा कंपनीला दोन नामांकित कंपन्याचे एकत्रिकरण झाल्यानंतर झाली आहे.ज्यांचे नाव प्रिया एक्झीबिटर्स प्रायव्हेट लि. आणि व्हीलेज रोडशो लि.असे आहे.

ह्या वरील दोन्ही कंपन्यांनी एकत्रित येऊन 1995 मध्ये संयुक्तरीत्या ह्या थिएटर उद्योगास प्रारंभ केला.

ह्या कंपनीची निर्मिती करत असलेल्या दोघा कंपनींचे नाव यात समाविष्ट असायला हवे.यासाठी या नावात प्रिया एक्झीबिटर्स प्रायव्हेट लि. कंपनीचे प्रिया हे नाव आणि व्हीलेज रोडशो लि.कंपनीचे व्हीलेज रोड शो ही दोघे नावे सामायिक करून प्रिया व्हिलेज रोड शो असे नामकरण ह्या सिनेमा उद्योग समुहाचे करण्यात आले होते.

पीव्हीआर कंपनीचे ओनर कोण आहेत?

  • पीव्हीआर ह्या कंपनीचे ओनर अशोक बिजली आहेत.1978 मध्ये अशोक बिजली यांच्या वडिलांनी ह्या कंपनीची स्थापणा केली होती.
  • पीव्हीआर कंपनीची सुरूवात कशी आणि कोठे करण्यात आली होती?
  • पीव्हीआर ह्या कंपनीची सुरूवात ही दक्षिण दिल्ली मध्ये प्रिया सिनेमा ह्या नावाने सर्वप्रथम करण्यात आली होती.त्यानंतर मग काही कालांतराने अजय बिजली यांचे वडील वाहतुक कंपनीचे ओनर होते त्यांनी ही कंपनी 1978 च्या सुमारास विकत घेतली.
  • मग 1978 मध्ये अजय बिजली यांच्या वडिलांनी विकत घेतलेल्या ह्या कंपनीला अजय बिजली यांनी 8 ते 9 वर्षानंतर1988 मध्ये चालवण्यास प्रारंभ केला होता.आणि ह्यानंतरच पीव्हीआरची निर्मिती झाली.
See also  चीन - तैवान युदध प्रकरण विषयी माहीती - Taiwan China conflict

पीव्हीआर भारत देशा व्यतीरीक्त अजुन कुठे कुठे आहे?

पीव्हीआर भारत देशा व्यतीरीक्त आपल्या शेजारील देशात श्रीलंकेत देखील विस्तारलेला आपणास दिसुन येतो.