गोवा बनले मोफत आयव्ही एफ सुविधा देणारे देशातील पहिले राज्य
देशात आता असे एक मोफत सरकारी रुग्णालय सुरू करण्यात आले आहे जिथे रूग्णांवर मोफत मध्ये आयव्ही एफ ट्रिटमेंट केली जाणार आहे.जिथे रूग्णांकडुन उपचारासाठी कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही.
रूग्णांवर केल्या जात असलेल्या उपचाराचा खर्च सीएस आरच्या माध्यमातून केला जाणार आहे.
अणि रूग्णांना असे मोफत आयव्ही एफ ट्रिटमेंट सुविधा प्रदान करणारे गोवा हे आपल्या भारत देशातील पहिले राज्य ठरले आहे.
गोवा राज्यात सुरु केलेली ही मोफत आय व्हीएफ उपचार सुविधेमुळे अशा दांपत्याना मुलबाळ प्राप्त होईल ज्यांना आईवडील होता येत नाहीये.जे निसंतान आहेत.
आयव्ही एफ ही एक उपचार पद्धती आहे जिच्यामुळे ज्या दांपत्याना मुलबाळ होत नाही त्यांना देखील माता पिता होण्याचे सुख प्राप्त होते.
पण ही उपचार पदधत थोडी खर्चिक असल्याने सर्वसामान्य गरीब व्यक्तीला हा खर्च करणे पेलवत नाही.पण राज्य शासनाने आता ही ट्रीटमेंट रूग्णांना फ्री मध्ये देण्याचे ठरवले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा मेडिकल कॉलेज असिस्टंट रिप्रोडक्टिव्ह टेक्नाॅलाजी अणि आययु आय ह्या सुविधेची सुरूवात केली आहे.
ह्या गोवा मेडिकल कॉलेज मध्ये सुपरस्पेशालिस्ट ब्लाॅक मध्ये १०० मातापित्यांनी ह्या मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी रेजिस्ट्रेशन देखील केले असल्याचे सांगितले जात आहे.
आरोग्यमंत्र्यांचे असे म्हणने आहे की सीएस आर ह्या फंडमधुन रूग्णालयाला आतापर्यंत कोट्यावधीचा निधी प्राप्त झाला आहे.
ह्या सर्व सीएस आर फंडचा उपयोग रूग्णालयात लागत असलेले आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच रूग्णांवर उत्तम उपचार करण्यासाठी खर्च केला जाणार आहे.
गोवा सरकारकडून देण्यात आलेल्या ह्या सुविधेमुळे जे दांपत्य निसंतान आहेत त्यांना तांत्रिक पदधतीचा वापर करून आईवडील होता येणार आहे.
शासनाच्या ह्या योजनेमुळे जे दांपत्य संतान प्राप्त करण्यासाठी दुसरया राज्यात उपचार करण्यासाठी जातात अशा सर्व निपुत्रिक माता पित्यांना ह्या सुविधेचा लाभ प्राप्त होणार आहे.
त्यांना आयव्ही एफ उपचारासाठी दुसरया राज्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.