गुगलच्या ए आय पाॅवर मेडिकल चॅट बोट मेड पाल्म टु विषयी माहिती Google AI powered medical chatbot med -paLm 2 information in Marathi

गुगलच्या ए आय पाॅवर मेडिकल चॅट बोट मेड पाल्म टु विषयी माहिती Google AI powered medical chatbot med -paLm 2 information in Marathi

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन तसेच अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनी गुगल लवकरच आपले एक मेडिकल हेल्प एआय चॅटबोट लाॅच करणार आहे.ह्या चॅटबोटचे नाव med palm 2 असे ठेवण्यात आले आहे.

अदयाप गुगलने हे मेडिकल हेल्प एआय चॅटबोट लाॅच केले नाहीये कारण ह्या चॅटबोटचे परीक्षण म्हणजेच टेस्टिंग करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

गुगलचे हे ए आय चॅटबोट लाॅच झाल्यानंतर युझर्सला घरबसल्या एक्सपर्ट कडुन स्वास्थ संबंधित आरोग्य संबंधित सल्ला तसेच मेडिकल हेल्प प्राप्त करता येणार आहे.

गूगलचे हे नवीन ए आय चॅटबोट मेडिकलशी संबंधित आपल्या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे मेडीकल एक्सपर्ट प्रमाणे देण्यास सक्षम असेल.

गुगल कडुन लाॅच करण्यात येत असलेल्या हया मेडिकल हेल्प ए आय चॅटबोटला मेडिकल संबंधित आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देता यावी यासाठी ह्या ए आय चॅटबोटला मेडिकल तसेच हेल्थ एक्स्पर्टच्या मदतीने सर्वप्रथम प्रशिक्षण दिले जाणार आहे.

चॅटजीपीटी ह्या आर्टिफिशियल इंटलिजन्स वर आधारित ए आय चॅटबोटच्या साहाय्याने आतापर्यंत आपण कुठल्याही सामान्य विषयावर माहीती प्राप्त करू शकत होतो.

आपल्या रोजच्या कामात ब्लाँग वेबसाईट करीता आर्टिकल जनरेट करण्यासाठी तसेच इतर विविध कामांकरीता चॅटजीपीटी मुळे आपल्याला खुप मदत देखील होत होती पण आता गुगलच्या ह्या नवीन मेडिकल हेल्प एआय चॅटबोट मुळे आपण घरबसल्या मेडिकल हेल्प देखील घेऊ शकतो.

असे सांगितले जात आहे की गुगलचे हे नवीन मेडिकल हेल्प एआय चॅटबोट एखाद्या प्रोफेशनल हेल्थ मेडिकल एक्स्पर्टच्या प्रमाणे आपणास आरोग्य विषयक सल्ला देऊ शकते.

सध्या ह्या मेडीकल हेल्प ए आय चॅटबोटवर अमेरिकेतील मायो क्लिनिक रिसर्च सेंटर ह्या टेस्टिंग सेंटर मध्ये टेस्टिंग करणे चालु आहे.

See also  मन की बात ह्या कार्यक्रमाचे शंभर एपिसोड पुर्ण - Mann ki baat 100 episode complete in Marathi

हया ए आय चॅटबोटला युझरने विचारलेल्या सर्व मेडिकल संबंधित प्रश्नांची उत्तरे देता यावी यासाठी खासकरून ह्या मेडिकल हेल्प एआय चॅटबोटला ट्रेन करायला टेस्टिंगच्या प्रक्रियेदरम्यान मेडिकल

एक्स्पर्टच्या एका टीमची मदत घेतली जाणार आहे.

Google AI powered medical chatbot med -paLm
Google AI powered medical chatbot med -paLm

गुगलच्या ह्या मेड पाल्म टु मेडिकल हेल्प एआय चॅटबोटचे फायदे –

गुगलच्या ह्या मेडिकल हेल्प एआय चॅटबोटच्या माध्यमातून युझर्स घरबसल्या मेडिकल हेल्प प्राप्त करू शकतात.एमरजन्सी मध्ये कुठलीही मेडिकल हेल्प प्राप्त करण्यासाठी युझर्सला कुठल्याही दवाखान्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

गुगलचे हे नवीन मेडिकल हेल्प एआय चॅटबोट कुठल्याही आजारी रूग्णाला एखाद्या तज्ञ डाॅक्टर प्रमाणे आरोग्य विषयक सल्ला देण्यास सक्षम आहे.

म्हणजे जे रूग्ण एमरजन्सी मध्ये मेडिकल हेल्प प्राप्त करण्यासाठी दवाखान्यात डाॅक्टर कडे जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा मेडिकल हेल्प प्राप्त करण्याचा एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

गुगलच्या ह्या नवीन तंत्रज्ञानामुळे आपल्याला हदयविकाराचा झटका येऊ शकतो का हे ४८ तास अगोदर रूग्णांना ह्या मेडिकल हेल्प एआय चॅटबोटच्या माध्यमातून जाणुन घेता येईल.

हया नवीन ए आय चॅटबोटच्या माध्यमातून हार्ट अटॅक तसेच मधुमेह सारख्या आजारांची माहिती फक्त रुग्णाच्या डोळयांना स्कॅन करून प्राप्त करता येईल.

पुढील ४८ तासांमध्ये रूग्णाच्या जीवाला धोका संभवतो की नाही त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करावे लागु शकते का हे देखील ह्या ए आय चॅटबोटच्या साहाय्याने डोळे स्कॅन करून जाणुन घेता येईल.

चॅटजीपीटी बिंग बार्ड इत्यादी ए आय चॅटबोटच्या तुलनेत गुगलचे हे नवीन मेडिकल हेल्प एआय चॅटबोट मेडिकलशी संबंधित मदत प्राप्त करण्यास अधिक प्रभावी ठरेल.

गुगलच्या ह्या नवीन माॅडल मध्ये युझर्सच्या डेटा प्रायव्हेसीची विशेष काळजी घेण्यात येईल यात युझर्सचा सर्व डेटा इनक्रिप्टेड फाॅरमॅट मध्ये असेल ज्यामुळे कुठल्याही थर्ड पार्टी तथा हॅकरला ह्या डेटाला अॅक्सेस करता येणार नाही.