तरूणांमध्ये वाढतेय हाय सॅलरीची क्रेझ ह्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थी आय आयटी सोडायला देखील तयार आहेत
जाॅईट सीट अलोकेशन आॅथरीटीने शेअर केलेल्या एका आकडेवारीनुसार जेईई अॅडव्हान्सड मधील टाॅप शंभर रॅकर्सपैकी ९७ विद्यार्थ्यांनी कंप्युटर सायन्स हा कोर्स निवडला आहे.
असे सांगितले जात आहे की सर्व टाॅप रॅकर्स विद्यार्थ्यांचा कल कंप्युटर सायन्स अणि कंप्युटर सायन्स संबंधित इंजिनिअरींग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकडे अधिक वाढताना दिसुन येत आहे.
सध्या विद्यार्थी वर्गात कंप्युटर सायन्स इंजिनिअरींग क्षेत्राविषयीची क्रेझ इतकी वाढते आहे की विद्यार्थी आय आयटीला प्रवेश न घेता कंप्युटर सायन्स संबंधित अभ्यासक्रमासाठी अधिक प्रवेश घेताना दिसुन येत आहे.
याला देखील एक कारण आहे ज्या विद्यार्थ्यांनी आय आयटीचा पर्याय सोडुन कंप्युटर सायन्स कडे वळत आहेत त्यांना जेईई अॅडव्हान्सड रॅकच्या आधारावर आय आयटी क्षेत्रात कंप्युटर सायन्स ह्या कोर्ससाठी प्रवेश दिला जात नाहीये.
म्हणून असे विद्यार्थी आय आयटी सोडत आहेत अणि एन आयटी,ट्रीपल आयटी,बीआयटी इत्यादी उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेत आहेत.
कारण ह्या अशा उच्च शैक्षणिक संस्था आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कंप्युटर सायन्स इंजिनिअरींग अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो
मुख्य अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आयटी क्षेत्रात नोकरी करावयाची इच्छा असते कारण ह्या क्षेत्रात भरघोस वेतन दिले जाते.
शिक्षणतज्ज्ञांकडुन हा ट्रेंड चुकीचा असल्याचे सांगितले जात आहे.याबाबत शिक्षणतज्ज्ञांकडुन असे मत व्यक्त केले जात आहे की ह्या वाढत्या ट्रेंडमुळे मुख्य अभियांत्रिकी भुमिकांचे महत्व कुठेतरी कमी होत आहे.
विद्यार्थी अणि त्यांचा पालक वर्ग देखील याबाबत अधिक विचार न करता निर्णय घेताना दिसुन येत आहे अनेक खाजगी महाविद्यालये देखील कुठलाही विचार न करता विद्यार्थ्यांना कंप्युटर सायन्स इंजिनिअरींगच्या विविध क्षेत्रात प्रवेश देत आहेत.
याबाबत कायदा निर्माते,नियामक संस्था,उद्योग देखील कुठलीही समाधानकारक भुमिका घेताना दिसुन येत नाहीये
आज सर्व जगावर अन्न उत्पादन,हवामान,वाहतूक,उर्जा आरोग्य विषयक सेवा, रसद साहित्य इत्यादी सर्व संकटे आहेत.
ह्या सर्व समस्यांवर संकटांवर उपाययोजना करण्यासाठी ह्या समस्यांतुन बाहेर पडण्यासाठी सिव्हिल,मॅकेनिकल, इलेक्ट्रीकल इलेक्ट्रॉनिक केमिकल इत्यादी मुख्य अभियांत्रिकी क्षेत्रांची आपणास आज आवश्यकता आहे.कारण ह्या क्षेत्रांतुनच ह्या सर्व समस्यांवर उपाय योजना करता येणार आहे.