हॉटस्पॉट म्हणजे काय
तुमच्या सर्वांच्या मोबाईल फोन मध्ये हॉटस्पॉट हे फिचर नक्की असणार.त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल थोडी फार माहिती माहीत असेल,आपण या लेखात हॉटस्पॉट बदल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.समजा जेव्हा आपला इंटरनेट डेटा पॅक संपतो,तेव्हा आपली इंटरनेट वरची कामे करण्यासाठी आपण दुसऱ्या व्यक्तीचा हॉटस्पॉट नेटवर्क घेतो.
काहीजण स्वतःचा वायफाय हॉटस्पॉट (airtel hotspot )विकत घेतात,जेणेकरून त्यांना काम करताना काही अडचणी येऊ नये.आजकाल तर सर्व कॉलेजेस,मॉल्स ,डीमार्ट, काही रेल्वे स्टेशन , बगीचे ह्यामध्ये वायफाय हॉटस्पॉट बसवले आहेत.एका सर्व्हे नुसार संपूर्ण जगात 36 कोटी पेक्षा जास्त सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट असतील असा कयास आहे .
What is Hotspot ? हॉटस्पॉट म्हणजे काय ?
हॉटस्पॉट म्हणजे एक असे ठिकाण जिथून इंटरनेट सेवा Wireless Lic Area Internet (WLAN= )प्रदान होईल.एक नेटवर्क जे की हॉटस्पॉट असते त्याच्यामध्ये मॉडर्न आणि वायरलेस रौटर ह्या दोन गोष्टी असतात.जसे जसे तुम्ही हॉटस्पॉट पासून दूर जाल जाल तसे तसे तुम्हाला हॉटस्पॉट ची रेंज येणे कमी होईल.
हॉटस्पॉट कशा पद्धतीने काम करतात ?
वाय फाय हॉटस्पॉट वायफाय सारखे काम करते.एक वायरलेस अकॅसेस पॉईंट दुसऱ्या कॉम्पुटर किंवा वायफाय डिव्हाईसशी संभाषण करण्यासाठी रेडिओ सिग्नल चा वालर करतात.हे वायफाय अकॅसेस पॉईंट इंटरनेट बरोबर जोडलेले असते.सिग्नल ना सेंड किंवा रिसिव्ह मध्ये प्रमाणित करण्यासाठी 80211 स्टॅण्डर्ड्स चा वापर केला जातो.ज्याला इन्स्टिट्यूट ओफ इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स द्वारे बनवले जाते.
हॉटस्पॉट चे प्रकार – Hotspot information Marathi
हॉटस्पॉट चे मुख्य दोन प्रकार पडतात.
1)फ्री वायफाय हॉटस्पॉट – ह्यामध्ये डिव्हाईस ला हॉटस्पॉट कनेक्ट करण्यासाठी कोणत्याही पासवर्ड ची आवश्यक्यता नसते.आपला हॉटस्पॉट चालू असला तर आपण त्याला विना पासवर्ड चे कनेक्ट करू शकतो.
2) व्यावसायिक हॉटस्पॉट- ह्या प्रकारच्या वायफाय एक्सेस वायरलेस कव्हरेज प्राप्त करण्यासाठी एक ठराविक फिज द्यावी लागते.समजा जर आपण व्यावसायिक हॉटस्पॉट ला कनेक्ट करण्यासाठी क्लिक केले तर मोबाईल डायरेक्ट आपल्याला पेयमेंट पेजवर न्हेते.व्यावसायिक हॉटस्पॉट मध्ये आपण पेयमेंट केले तरच आपण इंटरनेट चा वापर करू शकतो.
हॉटस्पॉट आणि मोबाइल हॉटस्पॉट मध्ये काय फरक आहे ??
- हॉटस्पॉट- हॉटस्पॉट म्हणजे अशे एक ठिकाण असते जिथून मर्यदित रेंज पर्यंत इंटरनेट कनेक्शन पोहचते.हॉटस्पॉट आशा जागी असतो जिथून वालरकर्त्याला योग्य रेंज येईल.हॉटस्पॉट मध्येही दोन भाग असतात.पहिला म्हणजे पब्लिक हॉटस्पॉट, पब्लिक हॉटस्पॉट मध्ये हॉटस्पॉट कनेक्ट करण्यासाठी कोणतेही फिज द्यावी लागत नाही आणि दुसरा म्हणजे प्रायव्हेट हॉटस्पॉट, प्रायव्हेट हॉटस्पॉट मध्ये तुम्हाला इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी फिज द्यावी लागते.
- मोबाईल हॉटस्पॉट – मोबाईल हॉटस्पॉट ज्याला की पोर्टेबल हॉटस्पॉट देखील म्हणले जाते.मोबाईल हॉटस्पॉट हा मोबाईल मध्ये असतो,पण हॉटस्पॉट सारखा तो एका जागेवरती नसतो, आपण मोबाईल ला जिथे जिथे न्हेतो, तिथे तिथे मोबाईल हॉटस्पॉट ची रेंज पोहोचते.मोबाईल हॉटस्पॉट चा वापर करून तुम्ही मोबाईल फोन ला किंवा लॅपटॉप ला इंटरनेट कनेक्शन देऊ शकता.
हॉटस्पॉट मध्ये वापरल्या जाणाऱ्या टर्म्स –
- अकॅसेस पॉईंट (वायरलेस अकॅसेस पॉईंट)- वायरलेस अकॅसेस पॉईंट एक प्रकारचे नेटवर्किंग डिव्हिएस असते.जे की वायरलेस नेटवर्क ला कनेक्ट करण्यासाठी वायफाय कॉम्प्लिमेंट डिव्हिएस ला अनुमती देते.एक wap हॉटस्पॉट नसते,तर ते एक ठिकाण असते जिथे की Wlan उपलब्ध असते.
- वायफाय- वायफाय अशी सुविधा आहे की जिथे इंटरनेट एक्सेस वायरलेस इंटरनेट च्या माध्यमातून मोबाईल किंवा कॉम्पुटर ला अलोव करते.वायफाय डेटा ला सेंड आणि रिसिव्ह करण्याचे काम करते.
- SSID – SSID म्हणजे service set identifier.हे एक वायरलेस नेटवर्क आहे.
हॉटस्पॉट चे फायदे
- ह्या कोरोना काळात खूप लोक घरून संगणकावर काम करतात.त्यांच्यासाठी हॉटस्पॉट फायद्याचा आहे.हॉटस्पॉट मुळे त्यांच्या कामात इंटरनेट कनेक्शन मुळे अडथळा येणार नाही.
- समजा आपलं सिम वरती इंटरनेट चालू आहे आणि तेवढ्यात आपल्याला कॉल आला,तर आपले इंटरनेट कनेक्शन बंद होते.पण हॉटस्पॉट मध्ये आपल्याला कितीही कॉल आले तरीही आपले इंटरनेट कनेक्शन बंद होत नाही.व आपल्या कामात अडथळा येत नाही.
Comments are closed.