पॅन कार्ड मध्ये टीडीएसची रक्कम कशी तपासायची? How to check tds amount in pan card

पॅन कार्ड मध्ये टीडीएसची रक्कम कशी तपासायची?How to check tds amount in pan card

आपल्याला जर आपल्या पॅन कार्ड मधुन किती टीडीएस कापला गेला आहे हे ऑनलाईन चेक करायचे असेल तर आपण पुढील स्टेप्स फाॅलो कराव्यात.

सर्वप्रथम आपणास incometax.gov.in ह्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जायचे आहे.

यानंतर वेबसाईटच्या होम पेज वर गेल्यावर आपणास log in नावाचे ऑप्शनदिसुन येईल इथे आपणास आपला पॅन नंबर टाकुन खाली दिलेल्या कंटिन्यु हया ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.अणि लाॅग इन करून घ्यायचे आहे.

जर आपण याधी रेजिस्टर केलेले असेल तर डायरेक्ट लाॅग इन करू शकता किंवा वर दिलेल्या रेजिस्टर आॅप्शनवर जाऊन त्यावर क्लिक करून आवश्यक ती विचारलेली माहीती आपले नाव,जन्मतारीख ईमेल आयडी भरून नव्याने रेजिस्ट्रेशन करू शकतात.

  1. पॅन नंबर टाकुन व्हॅलिडेट वर क्लिक करून लाॅग इन केल्यावर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल इथे आपणास वर दिलेल्या e file हया आॅप्शनवर क्लिक करायचे आहे.
  2. यानंतर income tax return मध्ये आपणास view form 26 वर क्लिक करायचे आहे.यानंतर आपल्यासमोर डिस्क्लेमर येईल खाली दिलेल्या कन्फर्म बटणावर क्लिक करून ते कन्फर्म करून घ्यायचे आहे.
  3. यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल इथे दिलेल्या चेक बाॅक्स वर टिक करून proceed बटणावर क्लिक करायचे आहे.
  4. यानंतर वर आपणास view/View tax credit नावाचे सेक्शन दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.
  5. यानंतर आपणास view/verify tax credit असे सेक्शन दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे अणि त्यात view form 26as/annual tax statement वर आपणास क्लिक करायचे आहे.
  6. यानंतर form 26as statement नावाने काही डिटेल्स आपल्यासमोर येईल त्यात आपणास assessment year 2023-2024 असे सिलेक्ट करून घ्यायचे आहे.
  7. खाली दिलेल्या View as मध्ये html करून घ्यायचे आहे.
  8. खाली दिलेल्या view and download वर क्लिक करून डाऊनलोड करून घ्यायचे आहे.किंवा आपण export as pdf पर्याय देखील वापरू शकता.याने आपल्याला आपल्या मोबाईल कंप्युटर मध्ये याची पीडीएफ फाईल मिळुन जाईल
  9. यानंतर आपण स्क्रोल करून खाली यायचे खाली आपणास name of deductor मध्ये ज्या कंपनीने आपला टीडीएस कट केला आहे तिचे नाव तसेच इतर माहीती दिसुन जाईल.
  10. खाली दिलेल्या+ वर क्लिक केल्यावर टीडीएस कोणी कट केला आहे/किती कट केला आहे हे सर्व यात डिटेल दिलेले असेल.
See also  कमी वेतन असताना देखील जास्तीत जास्त पैशांची बचत कशी करावी? -How To Save More Money With Low Income  

कंपनीकडुन आपल्याला इनव्हाॅइस पाठविण्यात आला असेल तर त्यात दिलेली माहिती अणि इथे दिलेली माहिती सारखी आहे का हे आपणास चेक देखील करता येईल.