पांढरया रक्तपेशी वाढवण्यासाठी काय करायला हवे? how to increase WBC count

आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशी वाढवण्यासाठी काय करायला हवे? how to increase WBC count

जेव्हा आपल्या देशावर शत्रुकडुन अचानक हल्ला केला जातो तेव्हा आपल्या देशातील सरकार येथील जनतेच्या सुरक्षेसाठी सीमेवर सैनिक तैनात करत असते.अणि जेणेकरून येथील नागरिक सुरक्षित राहतील.

एकदम त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या शरीरावर बॅकटेरिया जंतु नावाचे शत्रु हल्ला करीत असतात.

तेव्हा आपल्या शरीरातील सैनिक म्हणजे पांढरया रक्तपेशी आपल्या शरीराचे ह्या विविध जंतु बॅकटेरिया व्हायरस तसेच आजारांपासून संरक्षण करीत असतात.

कुठल्याही आजारापासून आपले संरक्षण करण्याचे प्रमुख कार्य आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशी करीत असतात.

आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशीचे प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होत असते.ज्याने विविध आजार आपणास सहजरीत्या जडु शकतात.

म्हणून आपण आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशी वाढवण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे.

आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशीत वाढ होण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करू शकतो.

आजच्या लेखात आपण आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशी वाढवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करायला हवे हेच थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

how to increase WBC count
how to increase WBC count

१)तीळ –

रात्री झोपताना आपल्याला दोन चमचे तीळ हे पाण्यात दीड ते दोन तासांसाठी भिजत घालून ठेवायच्या आहेत.

नंतर ते तीळ गाळुन त्यातील पाणी काढुन घ्यायचे अणि रात्रभर भिजत ठेवलेल्या तिळाची पेस्ट तयार करून त्यात तेवढ्या प्रमाणात थोडेफार मध देखील मिक्स करायचे आहे अणि मग दिवसभरात किमान दोन वेळा त्याचे रोज सेवन करायचे आहे.

See also  व्हिटॅमिन बी 6 विषयी माहीती - Vitamin B6 Information In Marathi

असे रोज केल्याने आपणास थोड्याच दिवसांत आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशी वाढताना दिसुन येतील.

२) टोमॅटो –

टोमॅटो खाणे हे शरीरातील रक्त वाढण्यासाठी खुप चांगले असते.टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन सी देखील विपुल प्रमाणात असते.

३) पालकाची पाने

पालकाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन के हे भरपूर प्रमाणात असते.त्यामुळे आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशी वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारात पालकाचा समावेश नक्की करायला हवा.

४) पपईची पाने –

पपईच्या पानांमध्ये काही असे महत्वाचे गुणधर्म असतात ज्याने आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशीत वाढ देखील होते.अणि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील अधिक जास्त मजबूत होते.

५) दही –

आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशी वाढवण्यासाठी दही देखील खुप फायदेशीर ठरते.

६) आवळा अणि ओली हळद –

एका पिकलेल्या आवळ्याच्या मधील बी काढुन घ्यायची आहे अणि त्या आवळयाचे छोटे छोटे तुकडे करुन घ्यायचे आहे.

अणि एक सेंटिमीटर इतकी ओली हळद घेऊन त्याचे देखील छोटेछोटे तुकडे करून घ्यायचे आहे.अणि आवळा अणि हळद यावर चिमुटभर सैंधवा मीठ टाकुन त्या मिश्रणाचे रोज सकाळी सेवण करायचे आहे.

याचसोबत आपल्या रोजच्या आहारात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए असलेल्या अन्नपदार्थाचा समावेश करायला हवा.

रोजच्या आहारात लसणाचा अणि किवीचे फळाचा देखील समावेश करायला हवा.

शरीरातील पांढरया रक्तपेशींची संख्या साधारणतःकिती असायला हवे? WBC count normal range

आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशींची संख्या साधारणतः ४ हजार ते ११ हजार इतके असणे आवश्यक असते.यापेक्षा पांढरया रक्तपेशी कमी झाल्यास आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता कमी होते अणि आपल्याला सहजरीत्या विविध आजार रोग जडण्याची शक्यता असते.

पांढरया रक्तपेशीचे मुख्य कार्य काय असते?

आपल्या शरीराचे वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण करणे शरीराला कुठलेही इन्स्पेक्शन होऊ न देणे हे आहे.

शरीरातील पांढरया रक्तपेशी कमी होण्याचे कारण काय असते?low wbc causes

पुढील काही परिस्थितीत आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशी कमी होत असतात.

See also  आंब्याचे औषधी गुणधर्म - Mango Health Benefits Marathi

१)एच आयव्ही एडस

२) आॅटो इमयुन डिसीज

३) लाईंमफोमा

४) सिव्हीअर इंन्स्पेक्शन

५) रेडिओ लाॅजी थेरपी

६) लिव्हर स्पिलीन डिसीज

७) काही औषधे-

आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशी वाढण्याचे कारण काय असते? यासाठी काय उपचार करायला हवे?high WBC count causes and treatment

जसे आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशी कमी होणे आपल्यासाठी नुकसान दायी ठरते तसेच त्यात प्रमाणापेक्षा अधिक वाढ होणे देखील आपल्यासाठी नुकसान दायी ठरते.

म्हणुन आपण आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशींची संख्या प्रमाणात ठेवणे गरजेचे असते.

शरीरातील पांढरया रक्तपेशी वाढवण्याची काही प्रमुख कारणे –

खालील काही परिस्थितीत आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशी आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा अधिक वाढत असतात.

१) अति धुम्रपान करणे

२) टिबी झालेला असणे

३) अस्थी मज्जा मध्ये टयुमर असणे

४) लयुकेमिया कॅन्सर असणे

५) संधिवात असणे

६) आंत्र रोग असणे

७) शारीरिक आणि मानसिक ताणतणाव

८) अस्थमा असणे

९) एखादी अॅलर्जी असणे

१०) अधिक कसरत व्यायाम करणे

११) शरीरातील एखाद्या उतींचे नुकसान झालेले असणे

शरीरातील पांढरया रक्तपेशी वाढल्यावर करावयाचे उपाय –

वरील दिलेल्या कारणांपैकी ज्या कारणामुळे आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशी प्रमाणापेक्षा अधिक वाढल्या आहेत ते कारण आपल्याला सर्वप्रथम नाहीसे करणे आवश्यक आहे.

म्हणजे ज्या कारणामुळे आपल्या शरीरातील पांढरया रक्तपेशी प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात वाढल्या आहेत त्यावर उपचार आपण करायला हवा.

मग ते कारण काहीही असु शकते अति धुम्रपान करणे,टिबी झालेला असणे,अस्थी मज्जा मध्ये टयुमर असणे,लयुकेमिया कॅन्सर असणे,संधिवात असणे,आंत्र रोग असणे,शारीरिक आणि मानसिक ताणतणाव,अस्थमा असणे,एखादी अॅलर्जी असणे,अधिक कसरत व्यायाम करणे,शरीरातील उतींचे नुकसान झाले असणे इत्यादी.

उपचार सुरू केल्यावर जसजसा आपला आजार कमी होत जाईल तसतसे त्यामुळे वाढलेल्या आपल्या पांढरया रक्तपेशी देखील कमी होऊन नाॅरमल रेंजवर येऊ लागतील.