एच पी सी एल मध्ये परमनंट भरती सुरू – HPCL recruitment 2023 in Marathi
हिंदुस्थान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड कंपनी मध्ये टेक्निशियन पदाच्या तब्बल 60 जागांसाठी भरती करण्यात येत आहे.
- या भरतीकरीता समस्त भारतातील कुठलाही पात्र अनुभवी किंवा फ्रेशर उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहे
- सदर भरती ही कायमस्वरूपी स्वरूपाची असणार आहे. भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज भरायचा आहे.भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी करायची संधी प्राप्त होणार आहे.
- कंपनीचे नाव – हिंदुस्थान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड
- हिंदुस्थान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड आॅफिशिअल वेबसाईट –
- हिंदुस्थान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड कंपनीची आॅफिशिअल वेबसाईट www.hindustanpetroleum.com ही आहे.
HPCL recruitment भरती केल्या जात असलेल्या पदाचे नाव –
1)असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन एकुण 30 पदे
2) असिस्टंट बाॅयलर टेक्निशियन एकुण 7 पदे
3) असिस्टंट फायर अॅण्ड सेफ्टी आॅपरेटर एकुण 18 पदे
4) असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन एकुण 5 पदे
एकूण जागा – 60 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरूवात –
वरील जागांसाठी अर्ज करायला १ फेब्रुवारी २०२३ पासुन सूरूवात झाली आहे.
HPCL recruitmentअर्ज करण्याची शेवटची तारीख –
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२३ असणार आहे.
वयोमर्यादा – भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
ओबीसी कॅटॅगरी मधील उमेदवारांना तीन वर्षे अणि एस सी एस टी कॅटॅगरी मधील उमेदवारांना पाच वर्षे इतकी वयात सुट देण्यात आली आहे.
HPCL recruitment अर्ज फी –
जे उमेदवार माजी सैनिक आहेत तसेच ओपन ओबीसी ईडबलयुएस कॅटॅगरी मधील आहेत त्यांना ५९० रूपये इतकी फी आकारण्यात येणार आहे.
मागासवर्गीय संवर्गातील उमेदवारांना कुठलीही फी आकारली जाणार नाही.
वेतन – ज्या उमेदवारांची भरती दरम्यान निवड करण्यात येईल त्यांना 270हजार 500 ते 1,00,000 इतके वेतन दिले जाणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
टेक्निशियन पदाच्या या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांनी 25 फेब्रुवारी 2023 च्या आत आपला अर्ज आॅनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
HPCL recruitment निवड प्रक्रिया –
संगणक आधारीत परीक्षेद्वारे सर्व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
HPCL recruitment पदानुसार शैक्षणिक पात्रतेच्या अटी –
१) असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन –
या पदाच्या भरतीसाठी उमेदवाराने ६० टक्के गुण मिळवून केमिस्ट्री विषयात पदवी/केमिकल पेट्रो केमिकल विषयात पदवी/फर्टिलायजर/प्लास्टिक अणि पाॅलीमर/शुगर टेक्नाँलॉजी रीफायनरी पेट्रोकेमिकल केमिकल आॅईल टेक्नोलॉजी केमिकल पाॅलीमर टेक्नाँलॉजी इत्यादी विषयामध्ये इंजिनिअरींग डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.
२) असिस्टंट बाॅयलर टेक्निशियन –
साठ टक्के गुण मिळवून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच साठ टक्के गुण मिळवून बाॅयलर टेक्निशियन विषयात आयटी आय झालेला असावा तसेच उमेदवाराकडे प्रथम श्रेणी बाॅयलर अटेडेंट सर्टिफिकेट देखील असायला हवे.
३) असिस्टंट फायर अॅण्ड सेफ्टी आॅपरेटर –
साठ टक्के गुण मिळवून बारावी सायन्स घेऊन उत्तीर्ण असायला हवे.तसेच राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र यांनी दिलेले फायरमन अग्नीशमन सर्टिफिकेट जवळ असायला हवे.
नागपुर फायर काॅलेज कडुन सब आॅफिसर कोर्स किंवा फायर सेफ्टी विषयात साठ टक्के गुण मिळवून डिप्लोमा झालेला असावा.
जड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.
४) असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन –
उमेदवाराचा साठ टक्के गुण मिळवून इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक विषयात इनजिनिअरींग डिप्लोमा झालेला असावा.
सर्व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी भरतीचे नोटीफिकेशन एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे.मग पात्रतेनुसार कुठल्याही जागेसाठी अर्ज करायचा आहे.