आयसी एस आय उपचार- ICSI treatment information in Marathi
आयसी एस आय चा फुलफाँर्म काय होतो? ICSI full form in Marathi
आयसी एस आयचा फुलफाँर्म Intracytoplasmic sperm injection असा होतो.
आयसी एस आय काय आहे?ICSI meaning in Marathi
आयसी एस आय ही एक नवीन उपचार पदधत आहे.जिच्या साहाय्याने ज्यांना मुलबाळ होत नाहीये जे आई वडील होण्याच्या सुखापासुन वंचित आहे असे दांपत्य संतान प्राप्तीचे सुख मिळवू शकता.
आयसी एस आय ही एक अशी नवीन उपचार पदधत आहे जिचा उपयोग पुरूषांमध्ये असलेल्या वंध्यत्वाच्या समस्येवर उपचार करण्यासाठी तसेच महिलांना संतानसुख प्राप्त होण्यासाठी विशेषकरून केला जात असतो.
जर एखाद्या पुरूषाला शुक्राणुंची संख्या कमी असणे, वीर्य हे शुक्राणूमध्ये शुक्राणुजन्य नसणे,
शुक्राणुंशी संबंधित,शुक्राणुंच्या गुणवत्ते तसेच आकारा संबंधित,गतिशीलते संबंधित कुठलीही समस्या असेल तर तो पुरूष आयसी एस आय ह्या उपचाराचा लाभ घेऊन बाप होण्याचे सुख प्राप्त करू शकतो.
आयसी एस आय अणि आयव्ही एफ या दोघा उपचार पदधती मधील फरक Difference between ICSI and Ivf in Marathi
आयसी एस आय ट्रिटमेंट एकदम आयव्ही एफ ट्रिटमेंट सारखीच असते.फक्त आयव्ही एफ उपचार पदधती मध्ये अंडी अणि शुक्राणुंना गर्भधानाकरीता पेट्री डिशमध्ये सोडले जात असते.
पण आयसी एस आय मध्ये फक्त एक चांगला अणि निरोगी शुक्राणु स्त्रीच्या अंडयामध्ये टोचला जात असतो.
म्हणजे दोघांमध्ये शुक्राणुंना अंडयामध्ये फलित करण्याच्या बाबतीत फरक आहे.
आयसी एस आय उपचाराची संपूर्ण प्रक्रिया ICSI treatment all process in Marathi
● आयसी एस आय उपचार पदधती मध्ये सर्वप्रथम पुरूषाचे वीर्य घेण्यात येत असते.
● यानंतर पुरूषाच्या घेतलेल्या ह्या वीर्याला 196 अंश द्रव नायट्रोजनमध्ये व्यवस्थित गोठवून घेतले जात असते.
● ह्या पुरूषाच्या घेतलेल्या विर्याचे फ्रिझिंग देखील करण्यात येत असते.जेणेकरून ज्या पुरूषाचे शुक्राणुंची संख्या खुप कमी असते त्यांच्याकडुन पुन्हा वीर्य घेत असताना कुठलाही त्रास होऊ नये समस्या उत्पन्न होऊ नये.
● मग ते घेतलेल्या विर्याची टेस्ट केली जात असते म्हणजेच पुरूषाचे घेतलेले विर्य टेस्टसाठी टेस्टिंग लँबमध्ये पाठविले जात असते.टेस्ट करत असताना ते वीर्य मशिनच्या साहाय्याने धूवून घेतले जाते.
● मग चांगल्या,सक्रिय म्हणजेच सक्रीय शुक्राणुंना अणि निष्क्रीय निरूपयोगी शुक्राणुंना एकमेकांपासुन वेगवेगळे केले जात असते.
● मग यानंतर जे शुक्राणु सक्रिय म्हणजेच चांगले आहेत त्यामधुन सर्वोत्तम शुक्राणुंची निवड केली जात असते.
● यानंतर मग जे महिलेचे अंड पेटी डिशमध्ये बाहेर काढले गेले आहे.त्यात इंजेक्शनच्या मदतीने पुरूषाच्या निवडलेल्या शुक्राणुंना इंजेक्ट करावे लागत असते.
● वरील सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडली की अंडयांना निरीक्षणा करीता ठेवले जात असते.अणि जो पर्यत गर्भ तयार होत नाही तोपर्यत वाट बघितली जात असते.हा गर्भ तयार होण्यास सुमारे तीन दिवस इतका कालावधी लागत असतो.
● अणि मग गर्भ तयार झाला की त्याला लवचिक नळीप्रमाणे दिसत असलेल्या एका कँथेटरच्या मदतीने स्त्रीच्या गर्भाशयात ठेवण्यात येते.
आयसी एस आय तसेच आयव्हीएफ उपचार पदधतीस सुमारे किती दिवस लागतात?
आयसी एस आय तसेच आयव्हीएफ उपचार पदधतीच्या संपुर्ण प्रक्रियेस सुमारे अडीच ते तीन आठवडे इतका कालावधी लागुन जात असतो.
आयसी एस आय उपचार पदधतीचे फायदे कोणकोणते आहेत?ICSI treatment benefit in Marathi
● आयसी एस आय ट्रिटममेंटदवारे ज्या महिलांना वंध्यत्वामुळे तसेच काही इतर कारणास्तव आई होता येत नाहीये अशा महिलांना आई होण्याचे सुख प्राप्त करता येत असते.
● ज्या पुरूषांमध्ये वंधयत्वाची शुक्राणुंच्या कमतरतेची वगैरे समस्या असेल अशा पुरूषांना आयसी एस आय दवारे पिता होण्याचे सुख प्राप्त करता येत असते.
आयसी एस आय उपचारा बाबतची ऐकण्यात आलेली यशोगाथा ICSI treatment success story in Marathi
एक जोडपे होते ज्यांना लग्न होऊन सहा ते सात वर्ष झाली होती तरीही अजिबात त्यांना मुलबाळ होत नव्हते.
मग त्या जोडप्यास डाँक्टरांच्या सल्ल्याने आयव्हीएफची ट्रीटमेंट केली पण तरी देखील त्यांना यश आले नाही.मग कुठुन तरी त्या जोडप्याला आयसी एस आय ट्रिटमेंट विषयी माहीती मिळाली.
मग ते जोडपे डाँक्टरांकडे पुन्हा गेले ज्यात त्यांच्या काही टेस्ट करण्यात आल्या अणि टेस्टचा अंतिम रिपोर्ट आल्यावर डाँक्टरांनी त्या जोडप्यास शेवटी आयसी एस आय करायचा सल्ला दिला.
मग त्या जोडप्याने आयसी एस आय ची ट्रिटमेंट सुरू केली.अणि काही दिवसातच त्यांना गर्भधारणा झाली मुल बाळ झाले.
आयसी एस आय उपचार पदधतीत नवीन तसेच आधुनिक उपकरणांचा वापर करून संपुर्ण टेस्ट केली जात असते.
काही फर्टिलिटी सेंटरमध्ये आर आय व्हिटनेसचा वापर केला जात असतो.आर आय व्हीटनेस हे आयव्हीएफ लँब मध्ये ज्या चुका होण्याची संभावना असते अशा चुका टाळण्याचे काम करते.यात हे सुनिश्चित केले जाते की आपला स्वताचाच अंडी शुक्राणुंचा नमुना हा गर्भासाठी वापरण्यात येत आहे का नाही?
ह्या सर्व प्रक्रिया दरम्यान आपली सर्व माहीती गुप्त ठेवली जात असते.
आयसी एस आय उपचारा दरम्यान काही वेदना तसेच त्रास होत असतो का?
आयसी एस आय उपचारा दरम्यान पेशंटला बेशुदध करण्यात येत असते म्हणुन यात पेशंटला उपचारा दरम्यान कुठलीही वेदना जाणवत नाही.पण नंतरून थोडा फार त्रास जाणवू शकतो.
आयसी एस आय उपचाराचा एकुण खर्च किती येतो?ICSI treatment cost in Marathi
आयसी एस आय उपचार पदधती दरम्यान विविध आधुनिक उपचार पदधती तसेच महागडया आधुनिक उपकरणांचा वापर केला जात असतो.
म्हणुन ह्या प्रक्रियेसाठी भारतामध्ये सुमारे दीड ते दोन लाखापर्यतचा खर्च आपणास येऊ शकतो.
आयसी एस आय ट्रिटमेंट प्रोसेसचा खर्च,प्रोसेस दरम्यान केल्या जाणारया टेस्टचा स्कँनिंग वगैरेचा खर्च,देखील यात समाविष्ट असतो.
फक्त गोळया औषधांचा खर्च आपणास वेगळा करावा लागु शकतो.जर उपचारा दरम्यान एखादे स्पेशल मेडिसिन घेतले तर त्याचा अतिरीक्त खर्च लागण्याची पण शक्यता असते.