महाराष्ट्राच्या सुपुत्राला आले वीरमरण
नुकतीच एक दुखाची बातमी समोर आली आहे सिक्कीम येथे प्रतिकुल परिस्थिती मध्ये भारत अणि चीन या दोन्ही देशांच्या सीमेवर महत्वाच्या रस्त्यांची बांधणी करत असलेल्या एका महाराष्ट्र राज्यातील जवानाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की अजय शांताराम ढगळे हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावातील रहिवासी असलेला शहीद शुभेदार जवान.
आपल्या साथीदारांसमवेत भारत अणि चीनच्या सिमेवर काही महत्वपूर्ण रस्त्यांची बांधणी करत होता.पण ह्या विभागात सतत पाऊस पडत असल्याने भुस्खलन झाले.
अणि रस्त्यांच्या बांधणीचे बनवण्याचे काम करत असताना अचानक अंगावर डोंगरेचा कडा दरड कोसळल्याने महाराष्ट्राचा हा सुपुत्र मृत्यु मुखी पडला आहे.अजय यांच्या सोबत ह्या दुर्घटनेत अजुन चार सैनिक शहीद झाल्याचे सांगितले जात आहे.
असे सांगितले जाते की सिक्कीम मध्ये भारत अणि चीनची एक सीमा आहे.हा भाग पुर्णतः डोंगर अणि दरी यांनी व्यापलेला भाग आहे.भारतीय लष्कराला ह्या भागात आपली हालचाल करता यावी यासाठी इथे रस्ते बांधण्याचे काम सुरु होते.हे काम भारतीय सैनिकच करीत होते.
पण हे रस्ते बांधण्याचे काम चालु असताना भारतीय सैन्यातील अजय ढगळे ह्या जवानाच्या अणि त्यांच्या काही साथीदारांच्या अंगावर अचानक डोंगरेची दरड कोसळली ह्या दरडेच्या ढिगारयात अजय अणि त्याचे साथीदार पुर्णतः दाबले गेले.
दरड कोसळल्याने बर्फ अणि मातीमधील ढिगारयाखाली हे सर्व जण पुर्णपणे दाबले गेल्याने ह्या भारतीय जवानांचे दुःखद निधन झाले आहे.
याबाबत माहीती प्राप्त होताच भारतीय सेनेकडुन यांचा तत्काळ शोध घेण्यात आला अणि शोधादरम्यान एका मातीच्या ढिगारयाखाली अजय अणि त्यांच्या साथीदारांचे शव सापडले.भारतीय जवानांनी ह्या सर्वांना मातीच्या ढिगारयाखालुन बाहेर काढले.
पण अंगावर दरड कोसळुन बर्फ अणि मातीच्या ढिगारयात दाबले गेल्याने जीव गुदमरून हे सर्व जण मरण पावले होते.
शहीद अजय यांचे पार्थिव एका विमानातुन काल ३ एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्ह्यात आणले गेले.जिथे त्यांच्या पार्थिवास मानवंदना देण्यात आली.
मानवंदना प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी सर्व उपस्थित होते.
आज ४ एप्रिल रोजी अजय यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांचे घरी चिपळुण तालुक्यातील मोरवणे ह्या त्यांच्या गावात आणले जाणार आहे अणि गावातुनच अजय यांची अंत्ययात्रा काढली जाणार आहे.
चिपळुण ते मोरवणे गावापर्यंत ही अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.