Influenza A H3n2 virus information in Marathi
मित्रांनो सध्या आपल्या भारत देशात गेल्या काही दिवसांपासून h3n2 नावाच्या एका नवीन व्हायरसने थैमान घातले आहे.हा व्हायरस इंफलुनजा ए व्हायरस याचा सबटाईप आहे.
सर्दी खोकला ताप आल्यावर खुप जणांनी औषधोपचार केले पण औषधोपचार करून देखील त्यांना काहीच गुण प्राप्त होत नाहीये.
खर पाहायला गेले तर बदलत्या हवामानामुळे काही दिवस आजारी पडुन सर्दी खोकला ताप येणे ही साहजिकच बाब आहे.
पण हा सर्दी खोकला ताप जर आपणास प्रदीर्घ काळापासून असेल तर ही आपल्यासाठी एक खुप मोठी चिंतेची बाब ठरू शकते.
कारण ही लक्षणे h3n2 ची लक्षणे असण्याची दाट शक्यता आहे.वातावरणात एक नवीन विषाणु पसरला आहे ज्याच्यामुळे लोकांना सर्दी खोकला अणि तापाची लागण होताना दिसुन येत आहे.
भारतातील सर्वात मोठी वैद्यकीय संशोधन संस्था आय सी एम आर कडुन देखील स्पष्टपणे सांगितले गेले आहे की गेल्या काही दिवसांपासून भारतात लोकांना जो सर्दी खोकला ताप येणे सुरु आहे.हे सर्व इंफलुनजा व्हायरस मुळे होत आहे.
काय सांगतो आयसी एम आरचा रिपोर्ट –
आयसी एम आरकडुन करण्यात आलेल्या निरीक्षणाच्या रिपोर्ट नुसार जेवढेही h3n2 ने ग्रस्त असलेले रूग्ण आतापर्यंत दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले आहेत त्यांच्यापैकी 92 टक्के रूग्णांना ताप तर 86 टक्के इतक्या रूग्णांना खोकला असल्याचे निदर्शनास आले आहे.
बाकीच्या 27 टक्के रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच 16 टक्के रूग्णांना अस्वस्थ जाणवत होते.तसेच अशा रूग्णांना मध्ये 16 टक्के असेही रूग्ण आढळून आले आहे ज्यांना न्युमोनिया झाला आहे अणि 6 टक्के रूग्णांना अस्वस्थता जाणवत श्वसनास त्रास होत आहे.
H3n2 जे गंभीर रूग्ण आहेत त्यांच्यापैकी 10 टक्के रूग्णांना आॅक्सिजनची आवश्यकता भासते आहे.अणि उर्वरित सात टक्के रूग्णांना उपचारासाठी आयसीयु मध्ये दाखल करावे लागत आहे.
H3n2 ची मुख्य लक्षणे काय आहेत?
आय सी एम आरने सांगितल्या नुसार h3n2 ने ग्रस्त असलेल्या रूग्णांमध्ये पुढील काही प्रमुख लक्षणे दिसतात –
- अशा रूग्णास तीव्र स्वरुपाचा ताप येतो किमान पाच ते सात दिवस हा ताप राहतो.
- खोकला येतो तीन हप्त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी हा खोकला असु शकतो.
- श्वास घ्यायला त्रास होतो.अस्वस्थ जाणवते.
H3n2 ची काही इतर लक्षणे –
- वांत्या ओकारी होऊ वाटणे
- घसा खवखव करतो.
- अंग दुखते
- चक्कर येतात
- गळा दुखणे
- डायरीया होणे(सामान्य लक्षण)
- थकवा येतो
- नाक वाहते
ही सर्व h3n2 ची काही प्रमुख लक्षणे आहेत.
H3n2 पासुन आपला बचाव करण्यासाठी आपणास काय करावे लागेल?icmr guideline for h3n2 virus protection in Marathi
आयसी एम आरने आपल्या आॅफिशिअल टविटर अकाऊंट वरून ह्या आजारापासून व्हायरस पासुन आपला बचाव करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.तसेच मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत ज्याचे आपण सर्वांनी पालन करायला हवे.
- बाहेरून आल्यावर आपले हात अणि पाय आधी साबणाने स्वच्छ धुवावे.
- गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा
- हात न धुता आपल्या हाताचा स्पर्श नाकाला तसेच डोळयाला करु नये.
- शिंकत असताना खोकत असताना नाकावर रूमाल धरावा.
- हायड्रेट राहण्यासाठी भरपुर पाण्याचे सेवन करावे.
- जास्त ताप असल्यास अणि अंग दुखत असल्यास लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- जास्त खोकला असेल तर घरगुती काढा घ्यावा
- आपण ह्या व्हायरसच्या संपर्कात आलो आहे असे आपल्या निदर्शनास आल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये घरातच राहावे कारण बाहेर गेल्याने आपल्या मुळे हा व्हायरस इतरांना देखील जडु शकतो.
- जो पर्यंत आपली तब्येत पुर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत बाहेरचे उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे टाळावे.जास्त सर्दी असलेल्या व्यक्तींनी व्हीक्सची वाफ घ्यावी.