IDV म्हणजे काय? महत्व आणि कॅलक्युलेशन – Insured Declared Value information in Marathi

IDV म्हणजे काय ? – Insured Declared Value information in Marathi

जेव्हा आपले एखादे वाहन चोरीला जात असते किंवा अपघातात त्या वाहनाचे नुकसान होत असते.तेव्हा विमा कंपनीकडुन आपल्याला खर्च दिला जात असतो.

फक्त यासाठी आपण त्या कारचा वाहनाचा Comprehensive Insurance काढलेला असणे आवश्यक असते.

आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्या कारच्या इंशुरन्सवर जे अमाऊंट आपणास प्राप्त होत असते ते त्याच्या IDV वरून निश्चित केले जात असते.

म्हणुन आपल्याला आयडीवी म्हणजे काय असते?त्याची गणना कशा प्रकारे केली जाते?इत्यादी बाबींविषयी सविस्तर माहीती असणे फार गरजेचे असते.

याचसाठी आजच्या लेखात आपण आयडीवी विषयी संपुर्ण माहीती जाणुन घेणार आहोत.

IDV चा फुल फाँर्म काय आहे?

आयडीवीचा फुल फाँर्म Insured Declared Value असा होत असतो.ज्याला मराठीत विमा केलेल्या वाहनाचे घोषित मुल्य असे म्हणतात.

Car Insurance मध्ये IDV म्हणजे काय ?

जेव्हा आपल्या वाहनाचा अकस्मातरीत्या अपघात होतो किंवा वाहन चोरीला जाते तेव्हा त्या वाहनाची जी जास्तीजास्त नुकसान भरपाई रक्कम आपल्याला इंशुरन्स कंपनीकडुन दिली जात असते. त्या रकमेला Insured Declared Value असे म्हणतात.

IDV ही त्या वाहनाची बाजारातील ती किंमत असते जी तिचा विमा करत असताना निश्चित ठरवली जात असते.

यात आपण शोरूममधुन खरेदी केलेले वाहन जर दोन तीन वर्ष जुने झाले असेल तर त्याची बाजारातील किंमत देखील कमी कमी होत जाते.

See also  लार्ज कॅप,मिडकॅप अणि स्माॅल कॅप शेअर्स म्हणजे काय? LARGE CAP,MID CAP AND SMALL CAP SHARE IN MARATH

ज्याचे परिणाम स्वरूप प्रत्येक वर्षी त्या वाहनाचा IDV देखील कमी कमी होत जात असतो.

माहिती करता खाली क्लिक करा

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीतील सर्व शब्दांचे मराठी अर्थ – Health Insurance Glossary Marathi

वाहनाचा IDV कसा Calculate केला जातो?

जर आपल्याला कुठल्याही नवीन टु व्हिलर तसेच फोर व्हिलरचा IDV Calculate करायचा असेल तर आपण गुगलच्या सर्च इंजिनवर जाऊन Search Bar मध्ये IDV Calculator असे टाईप करावे.(किंवा आपण Idv.Gicouncil.In असे देखील डायरेक्ट टाईप करू शकतो)

ज्यात वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला पुढील सर्व माहीती भरावी लागते :

● Vehicle Type (वाहन कोणत्या प्रकारचे आहे)

● Select State (कोणत्या राज्यात हे रेजिस्टर आहे

● Select Year (कोणत्या वर्षी त्याचे रजिस्ट्रेशन करण्यात आले)

● Select Month (कोणत्या महिन्यात त्याचे रजिस्ट्रेशन करण्यात आले)

● Select Make (सदर वाहन कुठल्या कंपनीचे आहे)

● Select Model (कोणते माँडल आहे)

● Select Variant (कोणत्या माँडेलचे कुठले व्हरझन आहे)

वरील सर्व आँप्शनमध्ये योग्य ती माहीती भरून झाल्यावर आपण खाली दिलेल्या Show Price Button वर ओके करावे,आपल्याला त्या वाहनाचा Indicative IDV प्राप्त होऊन जात असतो.

कुठल्याही वाहनाच्या IDV मध्ये प्रत्येक वर्षाला ठाराविक टक्केवारीने घट होत असते.आणि ही घट खाली दिलेल्या मुददयांवर आधारीत Calculate केली जात असते:

वाहनाचे आयु (Age Of Vehicle),वाहनाच्या किंमतीमधील घसरणीची टक्केवारी (Depreciation Percent), वाहनाची बाजारातील किंमत किंवा त्याचा (Idv)

● जर आपले वाहन सहा महिने जुने असेल तर त्याचे Depreciation Percent 5 असते आणि त्याचा IDV एक्स शोरूम प्राईजच्या 95 टक्के इतका निश्चित केला जातो.

● आणि समजा जर आपले वाहन सहा महिने ते एक वर्षाच्या आतील जुने वाहन आहे तर त्याचे Depreciation Percent 15 असते आणि त्याचा IDV एक्स शोरूम प्राईजच्या 85 टक्के इतका निश्चित केला जातो.

See also  Portfolio विषयी माहीती - Share market portfolio information in Marathi

● आपले वाहन खरेदी करून एक वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असेल तर त्याचे Depreciation Percent 20 असते आणि त्याचा IDV एक्स शोरूम प्राईजच्या 80 टक्के इतका निश्चित केला जातो.

● आपले वाहन जर दोन वर्षापेक्षा अधिक जुने असेल आणि तीन वर्षापेक्षा कमी जुने असेल तर तर त्याचे Depreciation Percent 30 असते आणि त्याचा IDV एक्स शोरूम प्राईजच्या 70 टक्के इतका निश्चित केला जातो.

● आपले वाहन तीन वर्षापेक्षा अधिक आणि चार वर्षापेक्षा कमी जुने असेल तर तर त्याचे Depreciation Percent 40 असते आणि त्याचा IDV एक्स शोरूम प्राईजच्या 60 टक्के इतका निश्चित केला जातो.

● आपले वाहन चार वर्षापेक्षा अधिक आणि पाच वर्षापेक्षा कमी जुने असेल तर तर त्याचे Depreciation Percent 50 असते आणि त्याचा IDV एक्स शोरूम प्राईजच्या 50 टक्के इतका निश्चित केला जातो.

वाहनाचा IDV ठरवताना कोणत्या गोष्टी पाहिल्या जात असतात?

जेव्हा अलग अलग कंपनीच्या वेगवेगळया माँडेलच्या कारचा आयडीवी ठरवला जात असतो तेव्हा तीन गोष्टी पाहिल्या जात असतात.

● वाहन जेव्हा शोरूममधुन खरेदी करण्यात आले तेव्हा त्याची किंमत काय होती

● आता ते वाहन किती वर्ष जुने झाले आहे

● त्याच्या बाजार किंमतीत म्हणजेच आयडीवीमध्ये किती घट झाली आहे.

कुठल्याही वाहनाच्या IDV ची आवश्यकता का असते?

  • जेव्हा आपण खरेदी केलेल्या वाहनाचा अपघात होत असतो आणि त्याची दुरूस्ती होने देखील शक्य नसते किंवा ते चोरीला जात असते अशा परिस्थितीत आपल्याला त्या वाहनाच्या बदले किती Compensation मिळायला हवे हे ठरवायला एक फाँरमुला असणे गरजेचे आहे.
  • नाहीतर कस्टमर ठरलेल्या किंमतीपेक्षा जास्त Compensation देखील मागु शकतो किंवा कंपनीकडुन त्याला कमी Compensation दिले जाऊ शकते.ज्याने कस्टमर आणि इंशूरन्स कंपनीत वादविवादाचा प्रसंग उदभवू शकतो.
  • पण याच ठिकाणी त्या वाहनाची आधीपासुन विमा पाँलिसी काढली असेल तर हा सर्व वाद टळत असतो कारण कुठल्याही वाहनाची आयडीवी व्हँल्युह ही विमा पाँलिसी घेतानाच निश्चित केली जात असते आणि ही आयडीवी व्हँल्युह मार्केट प्राईजनुसार निश्चित केली जात असते.
See also  Webinar म्हणजे काय ? What is a webinar information in Marathi

याने कस्टमरला Compensation दिले जावे हे ठरवण्यास सोपे जात असते.

Insurance Premium वर IDV चा कोणता Effect पडतो?

आयडीवीचा इंशुरन्स प्रिमियमवर देखील प्रभाव फडत असतो.कारण कुठल्याही वाहनाचा प्रिमियम हा त्याच्या आयडीवी वरूनच निश्चित केला जातो.आणि आयडीवी हे आपले Compensation असते जे आपल्याला कार इंशूरन्सवर प्राप्त होत असते.

म्हणुन जर आपण खरेदी केलेल्या वाहनाची बाजारातील किंमत म्हणजेच आयडीवी अधिक असेल तर त्याचा प्रिमियम देखील आपल्याला जास्त भरावा लागत असतो.

पण त्याच ठिकाणी आपल्याला आयडीवी कमी प्राप्त होत असेल तर त्यावर प्रिमियम देखील आपल्याला कमीच लागतो.

म्हणुन आपण आयडीवी आणि प्रिमियम इंशुरन्सकडे देखील लक्ष केंद्रित करायला हवे.कारण काही इंशुरन्स कंपनी प्रिमियमची किंमत कमी करण्यासाठी आयडीवी देखील कमी करत असतात.

5 वर्षे जुन्या वाहनाचा IDV निश्चित केला जाऊ शकतो का?

पाच वर्षे जून्या वाहनाचा आयडीवी त्याच्या सर्विसिंग कंडिशनवर आणि फिजिकल पार्टच्या कंडिशनवर अवलंबुन असतो.

वेगवेगळया सामग्रीपासुन बनवलेल्या वस्तुंची सरासरी किंमत लावून आयडीवी निश्चित केला जातो.
अनेक वेळेस आयडीवी हा विमा कंपनी आणि विमा कस्टमर यांच्या परस्पर संमतीच्या आधारे काढला जात असतो.

काही कंपन्या त्यांचा आयडीवी ठरवायला त्यांच्या सर्वेक्षकाला पाठवत असतात.आणि ही सर्वेक्षकाची किंमत विमाधारक व्यक्तीस भरावी लागत असते.

यात वाहनाचा आयडीवी ठरवत असताना यात त्याचे रेजिस्ट्रेशन आणि विमा प्राईज जोडली जात नसते.वाहनाच्या डेकोरेशनमध्ये कंपनीने स्थापित केलेल्या अँक्सेसरीजची किंमत देखील अँड केली जाते.

यात बाहेरून स्थापित करण्यात आलेल्या अँक्सेसरीजची किंमत अलग जोडली जात असते.आणि विम्यात त्याचा समावेश केला की प्रिमियम वाढत असतो.