काशी – वाराणसी येथे नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम चे भूमिपूजन | International cricket stadium in Varanasi Information in Marathi

काशी – वाराणसी – International cricket stadium in Varanasi information in Marathi

आपल्या भारत देशा मध्ये क्रिकेट खेळ खूप प्रसिद्ध खेळ आहे आणि आपल्या देशामध्ये सर्वात लोकप्रिय असणाऱ्या खेळा पैकी एक क्रिकेट खेळ आहे.काही लोक क्रिकेट खेळाला देशातील एक धर्म म्हणून संबोधतात आणि क्रिकेट मधील भारत टीम कडून खेळणार्या सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानतात.

आपल्या देशात शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत क्रिकेट खेळ पाहिला जातो आणि आपल्या देशातील लहान मुले जास्तकरून क्रिकेट खेळ खेळतात.आपल्या सर्वांचे लहानपणीचे स्वप्न असते की,मोठ्या पणी आपण क्रिकेटर बनावे, परंतु यातील काहीच मुलांचे मोठ्यापणी क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पूर्ण होते.

५० ओवर चा क्रिकेट वर्ल्ड कप हा दर चार वर्षांनी आयोजित केला जातो.ह्या वर्षीचा ५० ओवर चा क्रिकेट वर्ल्ड कप चे नियोजन भारत देशाने केले आहे आणि या वर्षीच्या क्रिकेट वर्ल्ड कप च्या मॅचेस भारतामधील विविध राज्यातील स्टेडियम वरती खेळवल्या जाणार आहेत.


देशामध्ये अशाच वाढत्या क्रिकेट च्या क्रेझ मुळे, देशामध्ये बनत असणाऱ्या क्रिकेट स्टेडियम ची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.अशातच देशातील उत्तर प्रदेश राज्यामधील काशी – वाराणसी येथे सरकार नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधत आहे आणि त्याचे भूमिपूजन भारताच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

भगवान शंकरांच्या काशिमध्ये नवीन क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्टेडियम बनवायचे चालले आहे. वाराणसी मतदार संघाचे खासदार श्री नरेंद्र मोदी हे आहेत आणि हे स्टेडियम ३० एकर च्या एरिया मध्ये बांधले जाईल.

उत्तर प्रदेश मध्ये तयार होत असलेल्या या नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साठी ४५० करोड रुपये इतका खर्च होणार आहे ,असा रिपोर्ट आहे.या वाराणसी मध्ये बनत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम च्या भूमी पूजन साठी,जे की नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे, या भूमी पूजन कार्यक्रमासाठी १२१ करोड रुपये इतका खर्च झाला आहे.

See also  ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी - 69 National film award list in Marathi

वाराणसी येथे बनत असलेल्या नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साठी उत्तर प्रदेश चे सरकार १२० करोड इतकी रक्कम देणार आहेत,तर BCCI जे की आपल्या देशाचा क्रिकेट बोर्ड आहे, हा बोर्ड हे क्रिकेट स्टेडियम बनण्यासाठी ३५० करोड रुपये खर्च करणार आहेत.

वाराणसी येथे बनत असलेल्या या क्रिकेट स्टेडियम मध्ये क्रिकेट मॅच बघत असणाऱ्या प्रेक्षकांची संख्या ३०,००० इतकी असेल

आणि हे स्टेडियम बनण्यासाठी अत्याधुनिक सुविधांचा वापर करण्यात येणार आहे.प्रेक्षकांना बसण्यासाठी असणाऱ्या सीट ची डिझाइन काशी घाटा वरती असणाऱ्या पायाऱ्यांसारखी असेल आणि या

नवीन बनत असलेल्या क्रिकेट स्टेडियम ची मुख्य बिल्डिंग ची डिझाइन ही भगवान शंकरांच्या डमरू सारखी असेल.

वाराणसी येथे बनत असलेल्या या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ची थीम धार्मिक असणार आहे आणि देशात महादेवाच्या आणि डमरू ची डिझाइन असणारे हे एकमेव स्टेडियम असणार आहे.

वाराणसी येथे बनत असलेल्या या क्रिकेट स्टेडियम मध्ये अर्ध चंद्रकार चे छत ,त्रिशूळ आकाराचे फ्लडलाइट्स , काशी घाटा वरती असणाऱ्या पायऱ्या च्या डिझाइन सारख्या प्रेक्षकांना बसण्यासाठी ची व्यवस्था आणि स्टेडियम च्या पुडच्या भागामध्ये बेल पाना सारखी डिझाइन असणार आहे.

वाराणसी येथे बनत असलेल्या नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम च्या एन्ट्री गेट वरती भगवान शिव यांना अती प्रिय असणाऱ्या बेल पानाची थीम असणार आहे .

हे स्टेडियम २०२५ पर्यंत संपूर्ण बनून तयार होईल, अशी आशा आहे आणि कानपूर आणि लखनौ नंतर हे उत्तर प्रदेश मधील तिसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असेल.