कोण आहेत कानपुरचे करोली बाबा त्यांचे नाव सध्या एवढ्या चर्चेत का आहे?
सध्या सोशल मिडिया वर एक नवीन नाव चर्चेत येताना दिसुन येत आहे जे आहे कानपुरचे करोली बाबा.
असे सांगितले जाते आहे की कानपुरच्या करोली बाबांचे स्वताचे करोंडोंचे साम्राज्य आहे.हे साम्राज्य त्यांनी अवघ्या तीन चार वर्षांत उभे केले आहे.पंधरा पेक्षा अधिक देशांमध्ये त्यांचे भक्तगण आहेत.
करोली बाबा हे वैदिक पद्धतीने कुठलाही गंभीर दुर्धर आजार बरा करण्यासाठी प्रसिद्ध आहे.करोली बाबा यांच्या आश्रमात येणारे लोक देखील याची प्रचिती आल्याचे सांगतात.
अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे बाबा कुठल्याही प्रकारचा औषधौपचार नव्हे तर मंत्रजाप पदधतीने चमत्कार करून कुठल्याही व्यक्तीच्या समस्येवर इलाज करायचे काम करतात.
करोली बाबा यांना नोएडा मधील एका सिद्धार्थ चौधरी नावाच्या डाॅक्टरने चमत्कार न करण्याचे आव्हान केले होते
अणि करोली बाबा यांनी त्यांना जो मंत्र जप करायला सांगितला त्याचा त्यांना कोणताही फायदा झाला नाही.अशी टिका देखील त्यांनी केली होती.
ज्यामुळे करोली बाबा यांच्या आजुबाजुच्या काही समर्थकांनी भक्तांनी त्या डाॅक्टरला बेदम मारहाण देखील केली असे सांगितले जाते आहे.याबाबद सिद्धार्थ चौधरी यांनी करोली बाबा यांच्या विरूद्ध पोलिस स्टेशन मध्ये तक्रार देखील केली आहे.
करोली बाबांनी एकेकाळी असा देखील दावा केला होता की रशिया युक्रेन मधील युदध थांबविण्यासाठी त्याला आळा घालण्यासाठी ते चमत्कार करून दोन्ही देशांच्या लोकांची स्मृती पुसुन टाकतील म्हणजेच त्यांना जुन्या कुठल्याही गोष्टींचे स्मरण राहणार नाही असा काही चमत्कार ते करतील जेणेकरून या दोघे देशांमधील युदध संपुष्टात येईल.
एका महिलेला तिची उंची वाढवायची होती ती महिला बाबांकडे गेली अणि म्हणाली बाबा मला माझी उंची वाढवायची आहे यावर बाबांनी काहीतरी मंत्रजाप केला अणि महिलेला देखील काही मंत्रजाप करायला लावतात थोडयाच वेळेत त्या महिलेला तिची उंची वाढते आहे असु जाणवु लागले.
हाच व्हिडिओ सोशल मिडिया वर खुप व्हायरल झाला अणि कानपुरचे करोली बाबा हे नाव चर्चेत येऊ लागले.ज्यांना करोली सरकार म्हणुन देखील ओळखले जाते.
चला तर मग आता जाणुन घेऊया करोली बाबा यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अधिक सविस्तरपणे.
कानपूरचे करोली बाबा हे याआधी शेतकरयांचे नेता होते.शेतकरयांचे प्रश्न तसेच समस्या मांडण्यासाठी करोली बाबा एकेकाळी अत्यंत प्रसिद्ध होते.
१९८९ मध्ये करोली बाबा हे शेतकरी संघटनेमध्ये समाविष्ट झाले होते यानंतर पुढे जाऊन ते शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देखील झाले होते.
शेतकरी नेता महेंद्रसिगं दिघे यांच्या संपर्कात आल्यावर करोली बाबा शेतकरी संघटनेचे सभासद बनले अणि शेतकर्यांचे प्रश्न समस्या मांडु लागले.त्याकाळी करोली बाबा यांच्यावर शेतकरयांची जमिनी हडप केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता.
राजकारणात फारसे यश प्राप्त न झाल्याने करोली बाबा यांनी आश्रम सुरू केले.
करोली बाबा यांचे मुळ नाव नाव संतोष सिंह भदोरीया असे आहे.करोली बाबा यांनी दिर्घकाळासाठी आयुर्वैदाचे डाॅक्टर म्हणून देखील काम केले आहे.केरळ मधुन थेरपी शिकुन ते आयुर्वेदिक क्लिनिक चालवत होते.
मागील तीन ते चार वर्षांपासून आता करोली बाबा कानपुर शहरामध्ये त्यांचे एक आश्रम चालवता आहे.बाबांचे आश्रम हे जवळपास चौदा एकर जमिनीवर बसविण्यात आले आहे.
कानपुर येथे करोली नावाच्या गावामध्ये बाबांचे हे आश्रम आहे ज्याला करोली सरकार धाम असे देखील म्हटले जाते.
करोली बाबा यांच्या आश्रमास रोज पाच ते सहा हजार भाविक रोज दर्शनासाठी भेट देतात.अणि अमावस्येला ही संख्या १५ हजार पेक्षा अधिक असलेली आपणास पाहावयास मिळते.
करोली बाबा यांच्या आश्रमामध्ये होम हवन चालते.या आश्रमात दोन मंदीर देखील आहे.राधा रमण मिश्र अणि कामागया देवी असे ह्या मंदिराचे नाव सांगितले जाते.
असे म्हटले जाते की करोली बाबा यांच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतातील कानाकोपऱ्यातून तसेच देशविदेशातील लोक देखील येतात.
बाबांच्या दरबारात प्रवेश प्राप्त करण्यासाठी भाविकांना शंभर दीडशे रूपयांची पावती देखील फाडावी लागते.ही देणगी विशेष पूजेसाठी भाविकांकडुन गोळा केली जाते असे म्हटले जाते.
करोली बाबा यांच्या आश्रमात दुरवरचे लोक आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील समस्या अडचणी घेऊन येतात करोली बाबा यांचे असे मत आहे की भगवान शंकराचे ऊॅ नम शिवाय नामस्मरण करून घेऊन सर्व भाविकांच्या अडचणी ते दुर करतात असे म्हटले जाते.
करोली बाबा यांच्या आश्रमात एक विशेष हवन देखील केले जाते ज्याचा एक विशेष खर्च असतो.ज्याची रक्कम एक लाख इतकी असते.
करोली बाबा यांचे आश्रम हे दिसायला एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणे आहे.येथील सुविधा देखील उच्च दर्जाच्या आहेत.
जिथे पैसे काढण्यासाठी एटीएम,लहान मुलांसाठी आईस्क्रीम पार्लर पासुन भाविकांना जेवण्यासाठी प्रशस्त हाॅटेल पूजेसाठी साहित्य घेण्यासाठी काउंटर,हाॅटेल तसेच फ्लाईट बुकिंग काउंटर अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आपल्या चमत्कारिक पद्धतीने लोकांना बरे करण्यासाठी करोली बाबा दीड ते दोन लाख इतकी रक्कम घेतात असे देखील ह्या बाबांविषयी सांगितले जाते आहे.