गौतम बुद्ध यांच्या विषयी काही रोचक तथ्ये – Life and Teachings of Gautam Buddha in Marathi
गौतम बुद्ध यांच्या आईचा मायादेवीचा मृत्यू गौतम बुद्ध यांच्या जन्मानंतर सात दिवसांनी झाला होता.मग यानंतर गौतम बुद्ध यांचे पालन पोषण त्यांच्या सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केले होते.जी महामायाची लहान बहिण अणि सुशोधनची पत्नी होती.
गौतम बुद्ध यांचा विवाह वयोवर्ष सोळा असताना यशोधरा नावाच्या मुलीशी झाला होता.असे सांगितले जाते की यशोधरा ही त्यांच्या मामाची मुलगी होती.
गौतम बुद्ध यांनी त्यांचा सर्वात मोठा उपदेश सारनाथ येथे दिला होता.यालाच बौदध धर्मातील ग्रंथात धर्म चक्र असे म्हटले गेले आहे.
गौतम बुद्ध यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराला आठ भागांत विभाजन करून त्याचे आठ स्तंभ तयार करण्यात आले होते.
गौतम बुद्ध यांचा मृत्यू ८० वय असताना उत्तर प्रदेश मध्ये देवरीया हया ठिकाणी झाला होता.ज्याला महापरिनिर्वाण दिन असे म्हटले जाते.
काहीही न खाता पिता गौतम बुद्ध यांने सहा वर्ष कठोर तपश्चर्या केली होती.ज्याचे फलस्वरूप अवघ्या ३५ वर्षाचे असताना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी रात्री भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती.
असे सांगितले जाते की ज्या रात्री महामायेने गौतम बुद्ध यांना तिच्या गर्भात ग्रहण केले त्यारात्री महामायेला स्वप्र पडले होते की एक सफेद हत्ती सोंडीत कमळ घेऊन तिच्या गर्भात प्रवेश करत आहे.
पौराणिक कथेत सांगितल्या नुसार गौतम बुद्ध यांचा जन्म त्यांच्या आईवडिलांच्या विवाहाच्या २० वर्ष नंतर झाला होता.
गौतम बुद्ध यांना कुठल्याही प्रकारच्या दुखाची जाणीव होऊ नये याची विशेष काळजी त्यांचे वडील गौतम बुद्धांच्या बालपणी घ्यायचे.कुठल्याही हंगामाचा त्रतुचा बुदधांना त्रास होऊ नये म्हणून प्रत्येकी तिन्ही हंगामासाठी त्यांनी महल तयार केले होते.
सन ३२९ मध्ये सम्राट अशोक याने गौतम बुद्ध यांच्या जनमस्थळी एक स्तंभ तयार केला होता अणि त्यावर इदा भगवान जयती असे लिहिले होते ज्याचा अर्थ असा होतो की भगवान बुद्ध यांचा जन्म इथे झाला होता.
चीन व्हिएतनाम थायलंड मध्ये गौतम बुद्ध यांचे अनेक वर्ष जुने स्टॅचयु उपलब्ध आहेत.जे सोन्यापासुन अणि महागड्या दगडांपासुन बनवण्यात आले आहेत.
इतिहासकारांनी असे म्हटले आहे की गौतम बुद्ध यांनी निर्वाण प्राप्त केल्यानंतर त्यांचे सर्व अनुयायी राजे इथे आले अणि सर्व राजांमध्ये भगवान बुद्ध यांच्या अस्थी घेऊन जाणयावरून वादविवाद होऊ लागला तेव्हा भगवान बुद्ध यांच्या अस्थी चे आठ भाग करून सर्वांना एक एक भाग देण्यात आला होता.