राज्यातील तरूणांसाठी आनंदाची बातमी !!
-Maharashtra Police Bharti Online Application from 9th November 2022
पोलीस भरतीमधील अडथळा अखेरीस झाला दुर राज्यात होईल सुमारे 18 हजार पदांची भरती
राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र पोलिस भरती 2021-2022 विषयी काही महत्वपूर्ण सुचना देण्यात आल्या आहेत.
काही दिवसांपुर्वी राज्य सरकारने पोलिस भरतीची घोषणा केली होती.पण काही कारणामुळे ही भरती थांबवण्यात आली होती.
पण आता ही पोलिस भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे.9 नोव्हेंबर पासुन या भरतीसाठी सर्व तरूणांना अर्ज करता येईल.
30 नोव्हेंबर पर्यत सर्व उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे.यानंतर उमेदवाराला शारीरीक चाचणी मेडिकल टेस्ट अणि लेखी परीक्षा कँरेक्टर सर्टिफिकेट देऊन त्यात उत्तीर्ण व्हावे लागणार आहे.कारण याच आधारावर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
या भरतीविषयी विविध वृतपत्रांमध्ये,प्रसारमाध्यमांमध्ये अँड देखील देण्यात आल्या आहेत.
सुमारे 18 ते 20 हजार पदांकरीता ही भरती केली जाणार आहे असे राज्य सरकारने सुचित केले आहे.
कोरोना महामारीच्या काळात ज्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केला होता.अणि आता त्यांची वयोमर्यादा संपली आहे अशा उमेदवारांना सुदधा पोलिस भरतीची संधी दिली जाईल असे राज्य सरकार कडुन कळविण्यात आले आहे.
चला आता जाणुन घेऊया यासाठी शिक्षणाची अणि वयाची अट काय असणार आहे.कोणकोणती पदे यात भरली जाणार आहे.
12 वी पास उमेदवारांला ह्या पोलिस शिपाई,शिपाई चालक ह्या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र हेच असणार आहे.शिपाई चालक पदाकरीता उमेदवाराला ड्रायव्हिंगचा अनुभव असायला हवा सोबत त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन देखील असायला हवे.
या भरतीसाठी ओपन कँटँगरीच्या उमेदवारांसाठी वयाची अट 18 ते 28 वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.अणि इतर मागासवर्गीयांसाठी 18 ते 33 वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.
ओपन कँटँगरीवाल्यांना अर्ज करण्याची फी 450 रूपये तर मागास वर्गीयांसाठी 350 ठेवण्यात आली आहे.यात उमेदवाराला एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे.
अधिक माहीतीसाठी आपण mahapolice.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.