एम सी क्यु फुलफॉर्म – MCQ full form in Marathi

एमसी क्यु फुलफाँर्म – MCQ full form in Marathi

एम सी क्युचा फुलफाँर्म काय होत असतो?MCQ full form in Marathi

एम सी क्युचा फुलफाँर्म Multiple choice questions असा होत असतो.

एम सी क्यु म्हणजे काय?MCQ meaning in Marathi

ज्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपणास तीन ते चार पर्याय दिले जात असतात त्यालाच एमसीक्यु म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न असे म्हणतात.यालाच आँब्जेक्टिव्ह टाईप क्वेशन असे सुदधा म्हणतात.

एम सी क्यु मध्ये आपणास एक प्रश्न विचारला जात असतो अणि त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला चार ते पाच पर्याय दिले जातात.त्यातुन एक योग्य अणि अचुक पर्याय आपणास निवडावा लागत असतो.

इथे आपणास प्रश्नाचे कुठलेही लांबलचक अणि सविस्तर उत्तर देण्याची आवश्यकता नसते फक्त दिलेल्या पर्यायांपैकी एक अचुक पर्याय आपणास निवडायचा असतो.

एम सी क्यु प्रकारचे प्रश्न आपणास कुठे विचारले जात असतात?

एम सी क्यु टाईपचे क्वेशन हे गर्वमेंटकडुन भरतीसाठी घेतल्या जात असलेल्या विविध आँफलाईन आँनलाईन परीक्षेत विचारले जात असतात.

सध्या ह्या प्रकारचे प्रश्न शाळा महाविद्यालय मध्ये देखील विदयार्थींची युनिट टेस्ट वगैरे घेताना विचारले जातात.

मल्टीपल चाँईस क्वेशन ही टेस्ट कोणी विकसित केली होती?

मल्टीपल चाँईस क्वेशन ही टेस्ट बेंजामिन डी वुड ह्यांनी विकसित केली होती.

एमसी क्यु टाईप क्शेशनचे फायदे कोणकोणते असतात?

● इथे आपणास प्रश्नाचे सविस्तर लांबलचक उत्तर लिहिण्याची आवश्यकता नसते.फक्त योग्य तो एक पर्याय निवडायचा असतो.याने आपल्या वेळेची उर्जेची देखील बचत होते.

See also  एप्रिल महिन्यात बॅकेचे कामकाज इतके दिवस राहणार बंद Bank holiday April 2023 in Marathi

● इथे प्रश्नाचे उत्तर आपल्या समोरच असते फक्त ते आपणास अचुकपणे ओळखायचे असते.

● एक प्रश्नाचे उत्तर सोडवायला बहुपर्याय दिलेले असतात.ज्यात एक अचुक पर्याय आपणास सिलेक्ट करायचा असतो.

● थेरी पेपरच्या तुलनेत एमसी क्यु टाईप पेपर सोडवायला खुप कमी वेळ लागत असतो.

● एमसीक्यु टाईप प्रश्नांची उत्तरे कंप्यूटर वर देखील चेक करता येत असतात.याने शिक्षकांचा परीक्षकांचा पण वेळ वाचतो.

● एमसीक्यु टाईप प्रश्नांच्या परीक्षेचा निकाल लगेच किंवा काही दिवसातच लागत असतो.

● एमसीक्यु मध्ये कधीकधी अंदाधुंद पणे पुरेसा अभ्यास नसताना कुठलेही उत्तर निवडले तरी देखील काही विदयार्थी पास होऊन जात असतात.कारण काही वेळा आपण जे उत्तर अंदाधूंदपणे सिलेक्ट केलेले असते ते बरोबर सुदधा निघुन जाते.पण हे काही मोजक्याच व्यक्तींसोबतच घडते सर्वासोबत असे घडत नाही.खुप विदयार्थी असे केल्याने झिरो गुण मिळुन नापास देखील होत असतात.तसेच काहींना चुकीचे उत्तर दिल्यामुळे निगेटिव्ह मार्किग मिळत असते जर परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असेल तर.

एमसीक्यु टाईप क्वेशनचे तोटे कोणकोणते असतात?

● एका प्रश्नाचे उत्तरासाठी आपणास येथे विविध पर्याय दिले जात असतात त्यातुन एक कुठलाही अचुक पर्याय आपणास निवडायचा असतो.जे आपणास थोडे कठिन जात असते.कारण कधी कधी सर्व उत्तरे आपणास सारखीच आहे असे सुदधा वाटत असते.

● परीक्षेचा ठरलेला कालावधी संपण्याच्या आधी आपणास सर्व प्रश्न अचुकपणे सोडवावे लागत असतात.

● एमसीक्युमध्ये विचारलेल्या कुठल्या प्रश्नाचे उत्तर काय आहे हे प्रश्न सोडवताना समजायला आपला त्या विषयाचा सखोल अभ्यास केलेला असणे गरजेचे आहे.कारण यात परीक्षक सिलँबसमधील कुठल्याही चँप्टरवर टाँपिक मुददयावर प्रश्न तयार करू शकतात.म्हणुन यात आपला अभ्यास सखोल झालेला असणे गरजेचे आहे.जेणेकरून प्रश्न समोर आल्यावर झटकन आपल्याला लक्षात येईल की विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणुन दिलेल्या पर्यायात कुठला पर्याय योग्य आहे.

● परीक्षेत अधिक विचारले जाणारे प्रत्येक चंँप्टरमधील तसेच सिलँबसमधील विचारलेले सर्व महत्वाचे मुददे वाचुन ठेवावे लागतात.

See also  जीवनावर प्रेरणादायी मराठी विचार -30 Life Quotes

एमसी क्यु टाईप प्रश्न परीक्षेत कसे सोडवायचे?

● सर्वप्रथम आपला वेळ वाया जाऊ नये यासाठी आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तरे येता आहेत अणि जी अत्यंत सोप्पी आहेत ती पटकन साँलव्ह करून घ्यायची.म्हणजे बाकीचा उरलेला वेळ आपण बाकीच्या अवघड प्रश्नांना सोडविण्यात देऊ शकतो.

● यानंतर अशा प्रश्नांची उत्तरे साँलव्ह करावी जे अवघड आहेत पण त्यांचे थोडेफार का होईना उत्तर आपणास येते आहे.

● अणि मग सगळयात शेवटी असे प्रश्न सोडवायचे ज्याचे उत्तर आपणास अजिबातच आठवत नहीये.येत नाहीये.इथे काय करायचे की प्रश्नाचे जेवढेही पर्याय आहे ते नीट बघायचे अणि जे पर्याय त्या प्रश्नाचे उत्तर असुच शकत नाही असे पर्याय बाजुला काढायचे अणि जे पर्याय त्याचे उत्तर असू शकते त्या पर्यायात कुठलाही एक योग्य पर्याय निवडायचा प्रयत्न करावा.