मोरगावच्या मोरेश्वर मंदीराची कथा,इतिहास वैशिष्ट्य,महत्व – Moreshwar Ganpati mandir Morgaon information.
मोरेश्वर :
मोरेश्वर मंदिराचे स्वरूप रचना –
मोरगावचा मोरेश्वर हा अष्टविनायकांपैकी पहिला गणपती आहे.याला मयुरेश्वर असे देखील म्हटले जाते.
मोरेश्वराचे मंदिर हे पुण्यात आहे.
मयुरेश्वर मंदिराची,मोरगाव मंदिराची बांधणी सुभेदार गोळे यांनी केली आहे.हे बांधकाम आदीलशाही कालखंडात करण्यात आले होते.
मोरेश्वराचे मंदिर हे एका प्रशस्त गढीचे बनविण्यात आले आहे.ह्या मंदिराची बांधणी बहामनी काळात केली गेली होती.हे मंदिर काळया दगडापासुन तयार केले गेले आहे.
मोरेश्वराचे हे मंदीर गावाच्या एकदम मध्यभागी आहे.मंदिराच्या चारही बाजुस मनोरे बांधलेले आहेत.
मोगल काळामध्ये मंदिरावर आक्रमण केले जाऊ नये म्हणुन मंदिरास मशिदीचा आकार देण्यात आला आहे.मंदिराच्या बाजुस पन्नास फुट इतक्या लांबीची एक संरक्षक भिंत देखील आहे.
मंदिराच्या गाभारयात बसवलेली मयुरेश्वराची मुर्ती अत्यंत आकर्षक बैठी डावे सोंड असलेली,अशी आहे.गणपतीच्या मुर्तीच्या डोळयामध्ये बेंबीमध्ये हिरे बसवले गेले आहे.कपाळावर नागराजाचा फना सुदधा आहे.
मुर्तीच्या उजव्या तसेच डाव्या बाजुला रिदधी सिदधीची एक पितळाची मुर्ती आहे.पुढे मयुर अणि मुषक वाहन आहे.
मोरगावच्या मोरेश्वराची कथा,आख्यायिका –
गणेशाचे नाव मयुरेश्वर कसे पडले?
असे म्हटले जाते की कळकी नगरीचा राजा चक्रपाणी याचा मुलगा सिंधु एक राक्षस होता ज्याने सुर्य देवाची उपासना करीत अमरत्वाचे वरदान प्राप्त केले.
पण अमरत्व प्राप्त झाल्यानंतर त्याच्यात अहंकार निर्माण झाला अणि तो पृथ्वीवरील लोकांना देवदेवतांना खुप त्रस्त करू लागला.त्याने पृथ्वीवर खुप हैदोस घातला होता त्याने इंद्रदेवास पराभुत करत स्वर्गावर देखील आपले अधिपत्य स्थापित केले होते.
हे सर्व बघितल्यावर भगवान विष्णुंनी सिंधुला युदधासाठी आवाहन केले पण सिंधुने विष्णुचा देखील पराभव केला.
मग विष्णुला पराभुत केल्यावर सिंधुने कैलासावर स्वारी केली अणि सर्व देवतांना कळकी नगरीत बंदिस्त करून ठेवले.
हतबल झालेल्या सर्व देवतांनी गणेशाची आराधना केली.गणेशाने त्यांना ह्यातुन मुक्त करणार असे वचन देखील दिले.
गणेश अणि सिंधु या दोघांमध्ये एक घमासान युदध घडुन आले.गणेशजी एका मयुरावर अध्या मोरावर आरूढ होऊन सिंधुसोबत युदध करू लागले.
शेवटी गणेशाने सिंधुचा वध केला अणि त्याच्या देहाचे तीन तुकडे केले अणि ते तिन्ही तुकडे तीन दिशांना फेकुन दिले.
मग सिंधुचे मस्तक जिथे पडले त्याला मोरगाव म्हटले गेले कारण गणपती बाप्पाने मोरावर आरूढ होऊन त्या असुराचा संहार केला होता.
मग सर्व गणेश भक्तांनी मिळुन जिथे सिंधुचे मस्तक पडले तिथेच गणेशाची मुर्ती स्थापण केली.जो अष्टविनायकांपैकी पहिला गणपती आहे मोरगावचा मोरेश्वर.ज्याला मयुरेश्वर असे देखील म्हणतात.
मोरगावला मोरगाव असेच का म्हणतात?
असे म्हटले जाते की मोरगाव ह्या गावात मोरांची संख्या खुप अधिक आहे.म्हणुन हे गाव मोरांचे गाव मोरगाव म्हणुन प्रचलित आहे.
मोरगावच्या मोरेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य –
● सुखकर्ता दूखकर्ता वार्ता विघ्नाची ही गणपतीची आरती समर्थ रामदास यांनी ह्याच मोरेश्वर मंदिरात रचली असल्याचे सांगितले जाते.
● मोरगावच्या मोरेश्वर मंदिरामध्ये गणपतीच्या मुर्तीसोबत रिदधी सिदधीची मुर्ती देखील आहे.ब्रम्हदेवाने ही मोरेश्वराची मुर्ती दोन वेळेस बनवली होती.पहिल्यांदा बनवलेली मुर्ती सिंधुने तोडुन टाकली होती.मग ब्रम्हदेवाने दुसरी मुर्ती तयार केली होती.
● सध्याच्या मोरेश्वराच्या मंदिरात जी मुर्ती बसवलेली आहे.ती बनावट असुन खरी मुर्ती तिच्या मागे आहे असे म्हटले जाते.जी वाळु लोखंडाचे कण हिरे यांच्यापासुन बनवली गेली आहे.
● या मंदिराच्या समोरच एक नंदीची मुर्ती सुदधा आहे.असे म्हणतात की महादेवाच्या मंदीराकरीता नंदीची मुर्ती एका रथामधुन नेण्यात येत होती.पण रथ जात असताना अचानक रथाचे चाक मोरेश्वराच्या मंदिरासमोर तुटले तेव्हा ह्या नंदीस इथेच मंदिराच्या समोर स्थापित करण्यात आले.
● मंदिरात प्रवेश केल्यावर आपणास एक अदभुत प्रसन्नता जाणवते.तेथील सौंदर्य पाहुन मन आनंदी होऊन जाते.
मोरगाव किती अंतरावर आहे?
पुणे जिल्हयातील बारामती तालूक्यात मोरगाव आहे.बारामतीपासुन फक्त ३५ किलोमीटर अंतर इतका प्रवास करून आपण मोरगावला मोरेश्वराच्या दर्शनासाठी जाऊ शकतो.
पुणे येथील रेल्वे स्थानकापासुन मोरगाव हे हडपसर,सासवड जेजुरी या मार्गाने ६४ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
पुणे सोलापुर मार्गावर पुण्याहुन ५५ किलोमीटर इतक्या अंतरावर एक गाव आहे ज्याचे नाव चौफुला असे आहे.
तेथुन आपण मोरगावला जाऊ शकतो.चौफुलापासुन मोरगाव २२ ते २३ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.