नॅनो DAP , नॅनो Urea – TSP- दर्जेदार खतां करता सरकारची एक मोठी योजना -NanoUrea a step towards Sustainable farming to achieve ‘Sahakar Se Samriddhi

नॅनो DAP , नॅनो Urea – SAP- दर्जेदार खतां करता सरकारची एक मोठी योजना

सरकार कडून  उत्कृष्ठ दर्जाचे प्रीमियम फर्टिलाईझर ,शेतकरी संरक्षण व त्यासोबत सबसिडी कपात असे  तीन उद्देश्य ठेऊन खतांच्या वापरा करता एक मेगा योजना  आणली जात आहे 

नॅनो DAP , नॅनो Urea – TSP उद्देश 

  1. फर्टिलाईझर आयतीचा होणारा अवाढव्य खर्च कमी करून देशावरील आर्थिक बोजा कमी करणे
  2. अनावश्यक तिथे सबसिडी कमी करणे किंवा बंद करणे
  3. पर्यावरण पूरक अशी उत्कृष्ट दर्जेदार खत कमीत कमी किमतीत शेतकऱ्यांना उपलब्द करून देणे 

कोणते आहेत प्रीमियम खत ( प्रीमियम फर्टिलाइझर)

  1. नॅनो DAP -di ammonium phosphate
  2. गोल्ड युरिया – Humic acid +
  3. ट्रिपल एस पी-super phosphate

नॅनो DAP , नॅनो Urea – TSP योजना शेतकऱयांना फायदेशीर कशी?

  1. येत्या खरीप हंगामा पासून सरकार नॅनो dap चा पुरवठा सुरू करणार.
  2. याबर एकतर खूप कमी सबसिडी असणार किंवा नसेलच कारण
  3. आता बाजारात येणारी 50 kg बॅग 3850 ला येते , यात सरकार 2500 rs सबसिडी देते व शेतकऱ्यांना ही बॅग 1350 रुपयात मिळते. परंतु  नविन येणारा 
  4. नवीन IFFCO  कडून उत्पादित नॅनो dap ची 500 CC ची एक बॉटल जी 50 KG बॅग तुलनात्मक रित्या समान असेल ची किमंत फक्त 600 रुपये असणार  आहे अश्या रीतीने   शेतकऱ्यांचे बॅग मागे 750 रुपये तर सरकारचे सबसिडी तुन जाणारे 2500 रुपये वाचतील
  5. या व्यतिरिक्त ही नॅनो खत जमिनिची सुपीकता वाढवतील च पर्यावरण पूरक असतील

सरकार एक नवीन मेगा प्लॅन तयार करत आहे.ज्यानुसार पारंपरिक खत यावर विकल्प तसेच पर्याय म्हणून सरकार शेतकरी वर्गासाठी प्रिमियम स्वरुपात खते उपलब्ध करून देणार आहे.

See also  राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची यादी २०२३ । List of Chief Ministers of Rajasthan In Marathi

अणि शेतकरी वर्ग जर प्रिमियम फर्टिलाईजर सबसिडी मुळे संतुष्ट होत असताना सरकारला दिसुन आले तर हळूहळू सरकार फर्टिलाईजर सबसिडी देणे कमी करणार आहे.किंवा भविष्यात ही सबसिडी बंद देखील केली जाऊ शकते.

कारण प्रिमियम फर्टिलाईजर वर कुठलीही सबसिडी शेतकरयांना दिली जाणार नाहीये अणि जरी दिली गेली तर तिचे प्रमाण खुप कमी असणार आहे खुप मोजक्याच जणांना ही सबसीडी प्राप्त होऊ शकेल.

पण पारंपरिक खत जेवढ्या किंमतीत शेतकरयांना बाजारात उपलब्ध होत होते तेवढ्याच दरात हे नॅनो डिएपी शेतकरयांना उपलब्ध करून दिले देणार आहे.

हे नॅनो डिएपी खत पारंपरिक खतापेक्षा शेतकरी वर्गाला अधिक आकर्षक अणि फायदेशीर असणार आहे.हा एक खुप मोठा फायदा शेतकरयांना याच्यामुळे होणार आहे.

असे सांगितले जाते आहे की ह्या वर्षी नॅनो डिएपी शेतकरयांना बाजारात उपलब्ध करून दिले जाऊ शकते.याचे प्रोडक्शन करण्याचे काम कोरोमंडल आंतरराष्ट्रीय अणि आय एफ एफ सीओ हे करणार आहे.

असे सांगितले जाते आहे की भारत सरकारकडुन ईफको अणि कोरोमंडल आंतरराष्ट्रीय यासोबत याकरीता एक करार करण्यात आला आहे.

कोरोमंडल आंतरराष्ट्रीय कडुन याकरीता आंध्र प्रदेश राज्यात ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट सुरू केला गेला आहे.अणि इफकोकडुन‌ गुजरात अणि उडिसा मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

इफकोकडुन‌ तीन प्लांटमधून करोड बाटल्या तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.अणि ह्या एक करोड बाॅटल मुळे आपल्या भारत देशाला बाविसशे 50 करोड इतकी बचत सबसिडी तसेच आयात पर्याय म्हणून होणार आहे.

याचसोबत भारत सरकार युरीया केमिकल याला पर्याय म्हणून अजुन एक प्रोडक्ट लाॅच करण्याच्या तयारीला लागले आहे ज्याचे नाव आहे युरिया गोल्ड.हया युरिया गोल्ड वर देखील खुप कमी सबसिडी शेतकरयांना दिली जाणार आहे.

युरिया गोल्ड याची चाचणी देखील सुरू केली गेली आहे अणि बाजारात याची मार्केटिंग केली जावी म्हणून लवकरच याला मंजुरी देण्यात येणार आहे.

See also  यूएस गव्हर्नरची यादी । राज्यानुसार यूएस गव्हर्नरची सध्याची यादी । List of US Governors In Marathi

सिंगल सुपर फॉस्फेट याला पर्याय म्हणून भारत सरकार अजुन एक प्रोडक्ट लाॅच करणार आहे.ज्याचे नाव ट्रिपल सुपर फॉस्फेट.हयावर देखील खुप कमी सबसिडी शेतकरयांना दिली जाणार आहे.यावर देखील चाचणी सुरू झाली आहे लवकरच हे प्रोडक्ट देखील बाजारात लाॅच करण्यात येणार आहे.

भारत सरकारने ह्या प्रोजेक्ट साठी एक उद्दिष्ट ठेवले आहे समजा 2026-2027 पर्यंत जर 17 करोड नॅनो डिएपी बाॅटल निर्माण करण्यात आल्या तर आपल्या भारत देशाला 38 हजार 250 करोड इतकी बचत करण्यात ह्या मुळे यश प्राप्त होणार आहे.

याशिवाय शेतकरयांना पारंपरिक खताच्या जागी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडुन हे पाऊल उचलले जाते आहे.जेणेकरून पारंपरिक खतावरील दबाव देखील कमी होईल आणि शेतकरयांना दुसरा विकल्प देखील उपलब्ध होईल.

जेणेकरून यामुळे फर्टिलायझर सबसिडी देखील हळुहळु कमी होण्यास मदत होणार आहे.