नारळी भात कसा बनवतात? – Narali Bhaat- Sweet Coconut Rice

नारळी भात ? – Narali Bhaat- Sweet Coconut Rice

मित्रांनो नारळी पौर्णिमा हा पुर्णपणे नारळाला अपर्ण दिवस आहे.या दिवशी कोळी बांधवांकडुन समुद्राला नारळ अपर्ण केले जाते.कोळी बांधव सर्व नारळापासुन बनवले जाणारे पदार्थ या दिवशी देवाला नैवेद्य म्हणुन दाखवत असतात अणि स्वता देखील खात असतात.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी सर्व नारळाचे अन्नपदार्थ विशेषकरून तयार केले जात असतात.नारळी भात, नारळाची करंजी नारळाचा पाक इत्यादी.

आजच्या लेखात आपण घरच्या घरी चवदार असा नारळी भात कसा बनवायचा?हे जाणुन घेणार आहोत.

नारळी भात तयार करण्याची संपुर्ण प्रक्रिया –

आता आपण जाणुन घेऊया नारळी भात तयार करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेविषयी –

● सर्वप्रथम आपण अर्धी वाटी भरून बासमती तांदुळ घ्यायचे.

● वाटीत घेतलेले तांदळाला स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे.

● यानंतर गँसवर कढाई ठेवायची गँस आँन वरून त्या कढाईत दोन किंवा तीन चमच तुप टाकायचे मग ते व्यवस्थित गरम करून घ्यायचे.

● मग कढाईमध्ये तीन किंवा चार तुकडे लवंगाचे टाकायचे.लवंगासोबतच तीन वेलची तसेच दालचिनीचा एखादा तुकडा,खडा मसाला देखील त्यात टाकुन घ्यायचा.

● यानंतर काजु बदामचे काप कढाईत टाकायचे अणि व्यवस्थित तळुन घ्यायचे.

● मग आपण जो अर्धा वाटी बासमती तांदुळ स्वच्छ पाण्यात सर्वप्रथम धुवून घेतला होता तो एक किंवा दोन मिनिट व्यवस्थित परतुन घ्यायचा आहे.याने तो हलका होत असतो.नारळ भातसाठी बासमतीसोबत आपण कुठलाही दुसरा सुवासिक तांदुळ पण वापरू शकतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी.

● मग यानंतर नारळाचे दीड ते दोन कप इतके दुध अणि अर्धा कप पाणी त्यात टाकुन घ्यायचे अणि तो भात नीट शिजवुन घ्यायचा असतो.नारळाचे दुध हे बाजारात पण रेडीमेड विकत मिळते किंवा आपण घरच्या घरी बनवलेले पण वापरू शकतो.

See also  सायक्लाॅन मोचा म्हणजे काय? Cyclone mocha in Marathi

● जेव्हा आपण भात शिजवत असतो तेव्हा जोरात केलेल्या गँसवर भाताला एक उकळी येऊ द्यायची असते.

● मग भाताला उकळी आली की १५ ते २० मिनिट गँसचा स्पीड कमी करून कढाईवर झाकण ठेवायचे असते.याने दुध व्यवस्थित त्या तांदळामध्ये नीट शोषले जाते.

● पुढे मग भात व्यवस्थित फुलून शिजला की त्यामध्ये गुळ टाकायचा असतो पण तो कमाल अर्धा कप इतकाच टाकायला हवा.कारण आपण तांदुळ देखील अर्धा कप इतकाच घेतला आहे.गुळ हा आपण डार्क जँग्री, चिक्कीचा देखील घेऊ शकतो.याने भातास चांगला रंग येण्यास मदत होते.

● यानंतर आपण अर्धा किंवा पाव कप इतका ओले नारळाचा चव टाकुन घ्यावा.

● भाताला चांगला रंग येण्याकरीता चल येण्याकरीता आपण त्यात केशर दूध टाकु शकता.

● मग वेलची अणि जायफळ पावडर किमान पाव चमचा इतकी किसलेली टाकुन घ्यावी.याने भातास चव देखील चांगली येते

● फक्त चवीपुरता थोडे मीठ टाकुन घ्यावे.

● शेवटी सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे अणि मग गुळ पुर्णपणे विरघळला की कढाईवर झाकण ठेवायचे खुप कमी गँसचा वेग ठेवून दहा मिनिटे एक वाफ काढुन घ्यावी.

● यानंतर आपणास आपला नारळी भात तयार झालेला दिसुन येईल.

नारळी भात तयार करण्यासाठी कोणकोणत्या साहित्याची आपणास आवश्यकता असते?

नारळ भात तयार करण्यासाठी  साहित्याची आवश्यकता असते.

● बासमती तांदुळ (अर्धी वाटी भरून)

● लवंग तीन किंवा चार

● नारळाचे दुध दीड किंवा दोन कप

● मीठ चवीपुरता

● एक किंवा दोन चमचा तुप

● वेलची तीन किंवा चार

● केशर दुध

● वेलचीची तसेच जायफळाची पावडर

● एक तुकडा दालचिनी

● बदाम

● मनुका

● काजु

● गुळ फक्त अर्धा वाटी भरून