राष्ट्रीय क्रीडा दिवस का साजरा केला जातो? राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे महत्त्व काय आहे?
दरवर्षी २९ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय क्रिडा दिवस म्हणजेच national sport day साजरा केला जातो.
दरवर्षी मेजर ध्यानचंद यांच्या सारख्या क्रीडा क्षेत्रातील दिग्दज खेळाडुंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देशाला गौरव प्राप्त करून देणारया देशातील असंख्य खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी देखील हा विशेष दिवस साजरा केला जातो.
हाॅकीचे जादुगर म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांची जयंती २९ आॅगस्ट रोजी असते.त्यांच्या ह्याच जयंतीला राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून दरवर्षी साजरे केले जाते.
मेजर ध्यानचंद कोण होते?
मेजर ध्यानचंद हे हाॅकी ह्या खेळातील एक महान खेळाडू होते.त्यांना क्रीडा विश्वातील अत्यंत प्रेरणादायी व्यक्तीमत्व म्हणून देखील ओळखले जाते.
मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या हाॅकी खेळातील उत्तम कामगिरीमुळे हाॅकीचे जादुगर म्हणून देखील ओळखले जाते.
मेजर ध्यानचंद यांना क्रीडा विश्वातील त्यांच्या उत्तम कामगिरीकरीता त्यांच्या दिलेल्या उत्तम योगदाना करीता पद्मभूषण पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आले आहे.
मेजर ध्यानचंद यांनी हाॅकी ह्या खेळातील केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्यांना १९२७ मध्ये लांस नायक हे पद देण्यात आले.यानंतर १९३२ मध्ये ते नायक बनले अणि १९३६ मध्ये त्यांना सुभेदार हे पद देण्यात आले होते.
पुढे त्यांनी कॅप्टन, लेफ्टनंट,मेजर इत्यादी पदे देखील भुषवली.अशा पद्धतीने आपल्या उत्तम कामगिरीमुळे मेजर ध्यानचंद यांना नेहमी खेळात बढती प्राप्त झाली.
२०२३ मधील राष्ट्रीय क्रीडा दिनाची थीम काय आहे?
२०२३ मधील राष्ट्रीय क्रीडा दिनाची थीम क्रीडा नायकांचा सन्मान (honouring sporting heroes) अशी ठेवण्यात आली आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिवस दरवर्षी कसा साजरा केला जातो?
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी दरवर्षी देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते वेगवेगळ्या पुरस्कारांचे वितरण केले जाते.
ह्या सर्व पुरस्कारांमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार,राजीव गांधी खेलरत्न,अर्जुन पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश होतो.
याचसोबत खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून परिचित असलेला पुरस्कार मेजर ध्यानचंद पुरस्कार देखील दिला जातो.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी सर्व शाळा महाविद्यालयात शैक्षणिक तसेच सार्वजनिक संस्थांमध्ये क्रीडा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यां मध्ये खेळाविषयी जागरूकता निर्माण केली जाते.
ह्या दिवशी राष्ट्रपती भवन मध्ये सर्व खेळाडुंना मेजर ध्यानचंद तसेच इतर क्रीडा क्षेत्रातील विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
क्रीडा विश्वातील उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडुंना दिल्या जात असलेल्या खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे याजागी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे हया पुरस्काराला नाव देण्यात आले आहे.
मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा विशेष बदल करण्यात आला आहे.