राष्ट्रीय जल पुरस्कार २०२२ – National Water Awards
मध्य प्रदेश ह्या राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.नुकताच चौथ्या क्रमांकाच्या राष्ट्रीय जल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
१७ जुन २०२३ रोजी हा पुरस्कार मध्य प्रदेश राज्याला प्रदान करण्यात आला आहे.भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते विज्ञान भवन येथील प्लेनरी हाॅलमध्ये ह्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.
जल शक्ती मंत्रालयाने एकुण ११ श्रेणीमध्ये ४१ विजेत्यांची नावे घोषित केली आहेत.सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार हा मध्य प्रदेश ह्या राज्याला देण्यात आला आहे तर सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा पुरस्कार ओडिशाच्या गंजाम जिल्ह्याला देण्यात आला आहे.
जलसंपदा नदी विकास अणि गंगा पुनरूज्जीवन विभागाच्या वतीने एकुण अकरा श्रेणी समाविष्ट करण्यात आलेल्या चौथ्या क्रमांकाच्या राष्ट्रीय जल पुरस्कार २०२२ साठी एकुण ४१ विजेत्यांची नावे घोषित केली आहेत.
प्रत्येक विजेत्याला प्रशस्तीपत्र,ट्राॅफी अणि पारितोषिक रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय जल पुरस्काराचे आयोजन कोण करते?
राष्ट्रीय जल ह्या पुरस्कारांचे आयोजन जलशक्ती मंत्रालय,जलसंपदा,गंगा पुनरुज्जीवन आणि नदी विकास मंत्रालयातर्फे केले जाते.
राष्ट्रीय जल पुरस्कारामुळे आपल्या स्टार्ट अप्ससाठी अग्रगण्य संस्थांना भारतातील सर्वोत्तम जलस्रोत व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करण्यासाठी वरिष्ठ धोरण निर्मात्यांशी संलग्न होण्याची एक उत्तम संधी देखील प्राप्त होते.
हे देशभरातील व्यक्ती आणि संस्थांनी केलेले चांगले कार्य प्रयत्न आणि जलसमृद्ध भारताच्या मार्गासाठी सरकारच्या दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करण्याचे काम करते.
राष्ट्रीय जल पुरस्कार २०२२ प्रमुख विजेत्यांची यादी –
१) सर्वोत्कृष्ट राज्य- मध्य प्रदेश
मध्य प्रदेश राज्याला चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार २०२२-२०२३ मध्ये राज्य श्रेणीमध्ये पहिले स्थान देण्यात आले आहे.म्हणजे सर्वश्रेष्ठ राज्याचा प्रथम पुरस्कार देऊन मध्य प्रदेश राज्याला देण्यात आला आहे.
२) सर्वोत्कृष्ट जिल्हा – ओडिसा राज्यातील गंजाम जिल्ह्याला सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा पुरस्कार देण्यात आला आहे.
३) सर्वोत्कृष्ट ग्राम पंचायत पुरस्कार –
भददादी कोठागुडेम जिल्ह्यातील जगन्नाथ पुरम ग्रामपंचायतीला तेलंगणा मधील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
४) सर्वोत्कृष्ट नागरी स्थानिक स्वराज्य संस्था –
सर्वोत्कृष्ट नागरी स्थानिक स्वराज्य संस्था हा पुरस्कार चंदीगढ महानगरपालिका चंदिगढला देण्यात आला आहे.
५) सर्वोत्कृष्ट माध्यम –
सर्वोत्कृष्ट माध्यमाचा पुरस्कार अॅडव्हान्सड वाॅटर डायजेस्ट प्रा लि गुरूग्राम हरियाणाला देण्यात आला आहे.
६) सर्वोत्कृष्ट शाळा –
जमियतपुरा प्रायमरी स्कूल मेहसाणा गुजरातला सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
७) कॅम्पस वापरासाठी सर्वोत्कृष्ट संस्था –
श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड रियासी जम्मु काश्मीरला कॅम्पस वापरासाठी सर्वोत्कृष्ट संस्था हा पुरस्कार देण्यात आला आहे.
८) सर्वोत्कृष्ट उद्योग पुरस्कार –
बरोनी थर्मल पॉवर स्टेशन बेगुलसराय बिहारला सर्वोत्कृष्ट उद्योग हा पुरस्कार देण्यात आला आहे.
९) सर्वोत्कृष्ट एनजीओ –
अपर्ण सेवा संस्थान उदयपुर राजस्थानला सर्वोत्कृष्ट एनजीओ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
१०) सर्वोत्कृष्ट पाणी वापरकर्ता संघाचा पुरस्कार –
संजीवनी पियाट सहकारी मंडळी लिमिटेड नर्मदा गुजरातला सर्वोत्कृष्ट पाणी वापरकर्ता संघाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
११) सीएस आर करीता सर्वोत्कृष्ट उद्योग –
काॅर्पोरेट सोशल रिस्पाॅन्सिबिलिटी करीता सर्वोत्कृष्ट उद्योग पुरस्कार एचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेड नोएडा उत्तर प्रदेशला देण्यात येणार आहे.