आताच चेक करा नरेगा जॉब कार्ड ची नवीन लिस्ट –Nrega Job Card List 2023
नरेगा जॉब कार्ड लिस्ट ही त्या व्यक्तींसाठी आहे,ज्या व्यक्तीने आपले नामांकन “राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम” मध्ये केले आहे. नरेगा जॉब ही भारतीय सरकारची योजना आहे ,ज्यात ही योजना भारतातील प्रत्येक ग्रामीण परिवाराला, प्रत्येक आर्थिक वर्षांमध्ये कमीत कमी १०० दिवस मजुदुरी रोजगार प्रदान करते , ज्यामध्ये वरिष्ठ माणसे त्यांच्या शारीरिक सेहत नुसार कामे करू शकतील.
ज्या नागरिकांनी सरकारच्या नरेगा योजनेमध्ये नवीन खाते उघडले असेल , त्यांनी नरेगा च्या ऑफिशीयल साईट वरती जाऊन “nrega.nic.in” आपले नरेगा लिस्ट मध्ये नाव आहे की नाही हे पाहू शकतील. भारत सरकार दरवर्षी ही नरेगा लिस्ट जारी करत असते आणि ज्यांनी मागल्या वर्षी नरेगा योजनेसाठी apply केले आहे, त्यातील योग्यता पात्र उमेदवाराचे नाव दरवर्षीच्या नरेगा लिस्ट मध्ये येते.
या नरेगा लिस्ट मध्ये अगोदर च असलेले उमेदवार जे की या नरेगा लिस्ट ची पात्रता पार करू शकत नाही, अशा व्यक्तींना या नरेगा च्या नवीन लिस्ट मधून काढले जाते. तुम्हाला जर पुढच्या वर्षीच्या नरेगा लिस्ट मध्ये नाव हवे असेल ,तर तुम्हाला या वर्षी सरकारच्या नरेगा योजनेसाठी apply करणे गरजेचे असते.
तुम्ही जर नरेगा योजनेसाठी apply केले असेल आणि तुम्हाला जर तुमचे नाव नरेगा लिस्ट मध्ये आहे की नाही हे पाहायचे असेल तर तुम्ही आजचा लेख संपूर्ण वाचा. आजच्या लेखामध्ये आपण नरेगा लिस्ट बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
भारत सरकार द्वारे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अधिनियम २००५ च्या अंतर्गत देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील बेरोजगार परीवारांना रोजगार मिळण्यासाठी भारत सरकारने नरेगा जॉब लिस्ट जारी केली.ही नरेगा लिस्ट प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी असते.
ह्या लिस्ट मध्ये ज्या ज्या व्यक्तींची नावे असतील अशा व्यक्तींना नरेगा जॉब कार्ड दिले जाते . ज्यामध्ये लाभार्थी कुटुंबातील सदस्यांना ग्रामपंचायत लेव्हल वरती १०० दिवसापर्यंत चे काम मिळते.तुम्ही ही ३४ वेगवेगळ्या राज्यांची नरेगा लिस्ट त्यांच्या ऑफिशीयल साईट वरती जाऊन पाहू शकता.
नरेगा जॉब कार्ड च्या ग्रामीण आणि शहरी जिल्ह्यातील बेरोजगार नागरिकांना दरवर्षी १०० दिवसापर्यंत चा रोजगार दिला जातो.जो व्यक्ती बेरोजगार आहे,तो व्यक्ती या नरेगा जॉब कार्ड चा फायदा घेऊन आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनू शकतो.
नरेगा जॉब कार्ड च्या मदतीने बेरोजगार नागरिक आत्मनिर्भर बनू शकतो. नरेगा जॉब कार्ड लिस्ट साठी apply करणे हे इंटरनेट वरती उपलब्ध असल्यामुळे कोणीही घरूनही नरेगा जॉब कार्ड लिस्ट साठी पाहू शकतो किंवा नरेगा जॉब कार्ड लिस्ट साठी घरी बसल्या apply करू शकतो.
नरेगा जॉब कार्ड लिस्ट चे फायदे खालीलप्रमणे आहेत:
१) या नरेगा जॉब कार्ड लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तुम्ही घर बसल्या किंवा कुठेही ऑनलाइन नरेगा जॉब कार्ड लिस्ट पाहू शकता.
२) तुम्ही ह्या नरेगा जॉब कार्ड लिस्ट ला डाऊनलोड देखील करू शकता.
३) दरवर्षी या नरेगा जॉब कार्ड साठी apply करणाऱ्यांची संख्या वाढत जाते.
४) या नरेगा जॉब कार्ड लिस्ट चा फायदा देशातील सर्व राज्यातील नागरिकांना घेता येतो.
नरेगा जॉब कार्ड लिस्ट अंतर्गत कोणकोणती कामे येतात ?
नरेगा जॉब कार्ड लिस्ट अंतर्गत खालील कामे येतात –
• घर बनवण्याचे काम
• सिंचन करण्याचे काम
• वृक्षारोपण करण्याचे काम
• गोशाला चालवण्याचे काम
• नेविगेशन करण्याचे काम
नरेगा जॉब कार्ड लिस्ट मध्ये apply करण्यासाठी आपल्याकडे खालील डॉक्युमेंट असणे गरजेचे असते –
• आधार कार्ड
• रेशन कार्ड
• जन्माचा दाखला
• रहिवासी दाखला
• मोबाईल नंबर
• पासपोर्ट साइज फोटो
तुमच्या कडे जर नरेगा जॉब कार्ड नाहीये आणि तुम्हाला नरेगा जॉब कार्ड साठी apply करायचे आहे ,तर तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून
नरेगा जॉब कार्ड साठी apply –
- सर्वात आधी तुम्ही नरेगा जॉब कार्ड च्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जा. https://nregaplus.nic.in/netnrega/statepage.aspx?Page=C&Digest=GmpYzpnzFJIVhl6rY0MeSw
- त्यानंतर पुढचे पेज ओपन होईल. पुढच्या पेज वरती तुम्हाला Data Entry चा पर्याय दिसेल, त्यावरती तुम्ही क्लिक करा.
- तुमच्या पुढे नरेगा जॉब कार्ड लिस्ट ची सर्व राज्याची लिस्ट ओपन होईल.
- त्यानंतर तुम्ही तुमच्या राज्याच्या नावा वरती क्लिक करा.
- पुढच्या पेज वरती तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्ही क्लिक करा.
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काही माहिती भरावी लागेल,ती माहिती तुम्ही योग्य रित्या भरून नरेगा जॉब कार्ड लिस्ट साठी रजिस्टर करा.
- त्यानंतर लॉगिन ऑप्शन वरती क्लिक करून लॉगिन करा.
- नंतर पुढच्या पेज वरती तुम्हाला “Registration & Job Card” हा ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्ही क्लिक करा आणि दिलेली माहिती योग्य रित्या भरून निवेदन फॉर्म सेव्ह करा.
- नंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट सायझ फोटो अपलोड करावा लागेल ,तो फोटो तुम्ही अपलोड करा आणि निवेदन फॉर्म सेव्ह करा.
- तुमचे नरेगा जॉब कार्ड लिस्ट साठीचे निवेदन यशस्वी रित्या सबमिट होईल.