PFMS म्हणजे काय ? PFMS Complete Information In Marathi

PFMS संपूर्ण माहिती काय ? PFMS Complete Information In Marathi

आपल्या सर्वानाच माहीत आहे कोरोनाच्या महामारीत आज आपला भारत देशच नव्हे तर संपुर्ण जग लढा देत आहे.

त्यातच कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जागोजागी लाँकडाऊनची घोषणा देखील करण्यात आली होती.

जागोजागी लाँकडाऊन लागल्यामुळे देशातील अशी गरीब जनता जे रोजंदारीवर आपला उदरनिर्वाह करते त्यांच्या जीवणावर ह्या लाँकडाऊनमुळे खुप जास्त प्रभाव पडलेला दिसुन येतो.

अशा परिस्थितीत गरीब जनतेस मदतीचा हात देण्यासाठी शासनाने विविध योजना राबवून हवी तशी मदत देखील गरीबांना केली.

आपल्याला देखील जाणुन घ्यायची ईच्छा असेल की सरकारने पीएफ एम एस अंतर्गत तुमचे अकाऊंट मध्ये डिबीटी द्वारा तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहे किंवा नाही?

तर आपल्याला पीएफ एम एस म्हणजे काय?त्यात Payment Status कसे चेक करतात याविषयी माहीती असणे फार गरजेचे आहे.

म्हणुन आजच्या लेखात आपण पीएफ एम एस विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

PFMS चा फुल फाँर्म काय असतो? – PFMS Full Form

PFMS चा फुल फाँर्म Public Financial Management System असा होत असतो.

PFMS म्हणजे काय?

पी-एफ एम-एस ही एक सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सेवा(Public Financial Management System) आहे .

पीएफएमएस ही एक संगणकीय प्रणाली (Web based software ) आहे.जिच्या साहाय्याने शासनाकडुन दिले जात असलेले अनुदान,सबसिडीज आणि त्यासंबंधित प्राप्त होत असलेले इतर आर्थिक लाभ हे Direct Users च्या बँक खात्यात जमा होत असतात.

इंडियन गर्वमेंटने आत्तापर्यत अनेक सर्वोत्तम निर्णय घेतले आहेत हा निर्णय देखील अशाच काही महत्वाच्या निर्णयांपैकी एक मानला जातो.

See also  Share Market -  80 महत्वाचे शब्द आपल्याला माहीत असायलाच हवेत - Share Market important terms beginner should know

ज्याच्या साहाय्याने फ्राँड,भ्रष्टाचार यासारख्या गुन्हयांवर चांगलाच आळा बसणार आहे.आणि याचसोबत Usres ला अनुदान तसेच इतर लाभांचा देखील पुरेपुर फायदा उठवता येईल.

PFMS ही एक Automatic System आहे ज्यात कोणाच्याही हस्तक्षेपाविना लाखो रूपयांची रक्कम फक्त एका इंटरनेटच्या माध्यमातुन केलेल्या एका क्लीकवर सर्व Users च्या बँक खात्यात Transfer केली जात असते.

PFMS चा मुख्य हेतु काय आहे? – What’s PFMS Aim

User ला कुठलीही धावपळ न करता आँनलाईन आपली रक्कम डायरेक्ट बँक अकाऊंटवर प्राप्त करता यावी तसेच आपले बँक स्टेटस आँनलाईन चेक करता यावे.हा PFMS System चा मुख्य हेतु आहे.

PFMS चा आरंभ कधी आणि केव्हा झाला? – When PFMS Started?

• PFMS ची मूलभूत सुरवात ही 2009 पासूनच झाली, त्यात प्रतेक वर्ष किंवा दर 2 वर्षानी नवीन तंत्रज्ञान चा अंगीकार करत बदल केले गेलेत.
• 2013 डिसेंबर मध्ये कॅबिनेट ने मंजूरी देवून संपूर्ण भारत व राज्यात PFMS चा विविध राज्य व केंद्रीय योजना करता विस्तार केला गेला.
• 2014 मध्ये अर्थ मंत्रालयाने CAG ल आदेश देवून सरकारी खाती PFMS माध्यमातून डिजिटलायेझेशन सुरवात केली

• पब्लिक फायनान्शिअल मँनेजमेंट सिस्टिम ही एक भारत सरकारने राबवलेली एक योजना आहे.जिचा आरंभ 2016 मध्ये करण्यात आला होता.

• पीएफ एम एस ह्या योजनेची सुरु़वात वित्त मंत्रालयाच्या आणि नीती आयोगाच्या सहकार्याखाली केली गेली होती.

• पीएफ एम एस सिस्टमचा आरंभ होण्याआधी Users च्या अकाऊंटमध्ये कँश तसेच अनुदान डिबीटी मार्फत पाठवले जायचे.डिबीटीची सुरूवात ही 1 जानेवारी 2013 रोजी झाली होती.

याचा प्रमुख हेतु अनुदानाची कँश तसेच अमाऊंट डायरेक्ट लाभार्थींच्या बँक अकाऊंटमध्ये Transfer करता यावे हा होता.

PFMS चे सुरुवातीला काय नाव होते? PFMS Earlier Name

PFMS चे आधीचे नाव Cpsms(Central Plan Scheme Monitoring System असे ठेवण्यात आले होते.

पण 2016 पासुन इंडियन गर्वमेंटदवारे राबविण्यात येत असलेल्या योजनांतील आर्थिक लाभ डायरेक्ट Users च्या Beneficial Bank Account मध्ये Dbt अंतर्गत Transfer करण्यात येऊ लागला.तेव्हापासुन Cpsms हे नाव बदलुन PFMS ठेवण्यात आले.

PFMS ची System कशापदधतीने Work करते? – How PFMS Works ?

  • PFMS ही एक User साठी Generate केलेली System आहे.ह्या सिस्टमचा कंट्रोल इंडियन गर्वमेंटकडे असतो.
  • शासनाशी संबंधित अशा प्रत्येक व्यक्तीचा तपशील इथे दिलेला असतो.आणि अशा व्यक्तींचा डेटा शासनाकडुन वेळोवेळी अपडेटस देखील केला जात असतो.
  • शासनाकडे Users चा जो डेटा उपलब्ध असतो.त्यानुसार शासन सर्व लाभार्थींना अनुदान तसेच इतर आर्थिक लाभ पुरवत असते.
  • सर्व Users चा डेटा वेळोवेळी अपडेट करायचे कार्य नियोजन आयोगाचे असते.आणि मग निती आयोग अशा Users ची एक लिस्ट तयार करते ज्यांना ह्या योजनेचा लाभ द्यायचा आहे.
  • यानंतर शासनाकडून कोणत्याही योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ दिला जातो.मग निती आयोग ह्याच सर्व लाभार्थींची सुदधा एक यादी तयार करते.
  • मग शेवटी सर्व लाभार्थींची पुर्ण माहीती गोळा केली जात असते.ज्यामध्ये त्यांची बँक अकाऊंट डिटेल देखील असते.मग एकाच वेळेस सर्व फंड सर्व लाभार्थींच्या खात्यात जमा केला जात असतो.
  • अशा पदधतीने सर्व अमाऊंट हे Users च्या बँक अकाऊंटमध्ये कुठलाही अडथळा न येता Direct Transfer होत असते.
See also  FD आणि RD मध्ये काय फरक आहे? - Difference in recurring deposit and fixed deposit

PFMS योजनेमध्ये प्राप्त होत असलेल्या सबसिडी- Subsidies Under PFMS

भारत सरकारकडुन राबविण्यात आलेल्या अनेक योजनांच्या अनुदानाचा फायदा PFMS द्वारे Users ला प्राप्त होत असतो.जो डायरेक्ट त्याच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केला जात असतो.

● विदयार्थ्यांना शासनाकडुन दिल्या जात असलेल्या शिष्यवृतीच्या रक्कम

● वृदधांना पेंशन योजने द्वारे प्राप्त होणारा फायदा

● गँस सिलेंडरवर प्राप्त होत असलेले अनुदान

● मनरेगा योजनेअंतर्गत काम करत असलेल्या मजुरांना दिले जाणारे पैसे

● प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभ

● शेतकरी तसेच इतर वर्गाला दिला जात असलेला कर्जमाफीचा लाभ

अशा विविध प्रकारच्या योजनांशी संबंधित असलेले आर्थिक लाभ PFMS Throuth आपल्या म्हणजेच लाभार्थीच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले जात असतात.

PFMS Payment Status आँनलाईन कसे चेक करतात? How To Check PFMS Payment Status

● ज्या Users ला PFMS System चा वापर करायचा असेल म्हणजेच आपले पेमेंट स्टेटस चेक करायचे असेल त्याने पीएफ एम एसच्या आँफिशिअल साईटवर जाऊन आधी व्हिझिट करावे.

● Home Page वर आपणास Know Your Payment असे आँप्शन दिसुन येईल त्यावर Click करावे.

● मग आपल्याला एक Online फाँर्म दिला जातो ज्यात आपणास आपली बँक डिटेल फील करावी लागते.(नाव पत्ता बँक खाते धारकाचे नाव आणि बँक अकाऊंट नंबर इत्यादी)

● आपला अकाऊंट नंबर कन्फर्म करावा लागत असतो.

● मग एक कँपच्या आपल्यासमोर दिला जातो तो जसाच्या तसा तिथे फिल करावा लागतो.

● कंँप्च्या फिल केल्यावर आपल्या रेजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जात असतो जो आपण तिथे जसाच्या तसा टाईप करायचा असतो.

● कंँप्च्या ओटीपी फिल करून झाला की Search Option वर ओके करावे यानंतर आपली सर्व Payment Information आपणास Website वर दिसुन जाते.

PFMS चे कोणकोणते फायदे असतात? Benefits of PFMS system

PFMS System चे पुढीलप्रमाणे अनेक फायदे असतात-

See also  NGO म्हणजे काय ? NGO information in Marathi

● PFMS System मुळे कँश डायरेक्ट युझर्सच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होत असते जेणेकरून यात कुठल्याही प्रकारचा फ्राँड तसेच भ्रष्टाचार होण्याची संभावना नसते.

● PFMS System आल्यामुळे पैसे डायरेक्ट युझर्सच्या अकाऊंटला जमा होत असतात याने Users ला गर्वमेंट आँफिसला जाण्याची आवश्यकता पडत नाही.तसेच आपली रक्कम प्राप्त करण्यासाठी सरकारी आँफिसमध्ये जाऊन कुठल्याही अधिकारीच्या रावण्या करण्याची देखील गरज पडत नाही.

● PFMS मुळे सरकारने राबवलेल्या कुठल्याही योजनेचा लाभ Users ला जलदगतीने प्राप्त होत असतो.आधी ह्या प्रक्रियेस खुप वेळ लागायचा.

● PFMS System मुळे Users चा वेळ वाचतो आणि कामात देखील पारदर्शकता येते.

● PFMS System मुळे लाखो Users ला एकाच वेळी त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे पाठविणे अधिक सहज आणि सोपे झाले.

● PFMS System ही इलेक्ट्राँनिक सिस्टम बेझिड आहे ज्यामुळे यात साँफ्टवेअरची सिक्युरीटी फार जास्त असते.यामुळे कोणीही यात अफरातफर करू शकत नाही.

● आणि सगळयात महत्वाचे म्हणजे यामध्ये डीबीटी द्वारे Users च्या अकाऊंटमध्ये कँश तसेच अमाऊंट डायरेक्ट जमा होत असते.त्यामुळे आपले लाभाची रक्कम प्राप्त करण्यासाठी आपल्याला कोणावरही Depend राहावे लागत नाही.

PFMS चा लाभ कोणाकोणाला घेता येतो? – Who are beneficiaries under PFMS

PFMS योजनेचा लाभ भारत देशातील प्रत्येक नागरीकाला घेता येऊ शकतो.

PFMS पोर्टल वर आपला फिडबँक कसा नोंदवायचा?

● PFMS पोर्टलवर आपला फिडबँक नोंदवायसाठी आपण सर्वप्रथम पीएफ एम एसच्या आँफिशिअल साईटवर जाऊन व्हिझिट करावे.

● मग तिथे आपल्यासमोर होम पेजचे ओपन येईल जिथे Feedback हे Option देखील आपणास दिसुन येईल.

● Feedback Option वर क्लीक करावे मग त्यानंतर आपल्यासमोर एक Feedback Form ओपन होत असतो ज्यात आपण विचारलेली आपली सर्व माहीती भरायची असते(नाव,ईमेल,विषय इत्यादी).

● यानंतर कुठलीही एक कंँटँगरी सिलेक्ट करून आपली कमेंट नोंदवायची असते.

● मग तिथे एक क़प्चा दिला जातो जो जसाच्या तसा फिल करायचा असतो.आणि Submit Button वर शेवटी ओके करायचे असते.

PFMS ची आँफिशिअल Website साईट कोणती आहे?

PFMS .Nic.In ही PFMS ची Official Website आहे.

PFMS संबंधित हेल्पलाईन नंबर :

1800118111 हा PFMS चा हेल्पलाईन नंबर आहे.यावर आपण PFMS शी संबंधित मदत प्राप्त करू शकतो किंवा आपली तक्रार नोंदवू शकतो.

 

ASMR म्हणजे काय ?

 

ASMR म्हणजे काय? – ASMR Information In Marathi