Pinterest काय आहे? । Pinterest information in Marathi

Pinterest सोशल साईट माहिती काय आहे? | Pinterest information in Marathi

आपण वापरत असलेले फेसबुक, ट्विटर सारखे Pinterest देखील एक सोशल मीडिया अँप आहे. Pinterest वर आपण Photo आणि Video शेअर करू शकतो. यामध्ये फोटो आणि व्हिडिओचे सर्व वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. फोटो आणि व्हिडीओ साठी Pinterest सर्वात जास्त प्रसिद्ध आहे त्यामुळे याला Image Sharing Social Media म्हणून ओळखले जाते.

आपल्याला जर एखाद्या वेबसाईटवरील फोटो जर Pinterest वर शेअर करायचा असेल तर आपण त्या वेबसाईटवर जाऊन त्याच्या लिंक सोबत तो फोटो Pinterest वर शेअर करू शकतो. Pinterest चा वापर लोक बॅकलिंक बनविण्यासाठी देखील करत आहेत. ब्लॉगर्स साठी वेबसाईटवर ट्राफिक आणण्यासाठी Pinterest एक माध्यम आहे. जेव्हा एखादा त्या फोटोवर जास्त माहिती मिळावी म्हणून क्लिक करतो तेव्हा तो त्या फोटो च्या ऑफिशियल साईट वर जातो.

Pinterest नावाचा अर्थ | Pinterest Meaning in Marathi

Pinterest या नावात त्याचा अर्थ आहे. पिन युअर इंटरेस्ट म्हणजेच Pinterest होय. यामध्ये जो कोणताही वापरकर्ता असेल तो त्याच्या आवडीनुसार pins करू शकतो. पिन करणे म्हणजे तो फोटो सेव्ह करणे होय. 

Pinterest विषयी इतिहास | History of Pinterest in Marathi

Pinterest हे एक अमेरिकन कंपनीने बनविलेले अँप आणि वेबसाईट आहे. सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे Pinterest कंपनीचे ऑफिस स्थित आहे. बेन सिलबरमन, पॉल सायरा आणि एव्हन शार्प यांनी 2010 साली pinterest ची सुरुवात केली. Pinterest ची सुरुवात एक फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून करण्यात आली होती. काही काळानंतर यामध्ये व्हिडीओ आणि आता मेसेजिंग हा पर्याय देण्यात आलेला आहे.

See also  उसेन बोल्ट याची एकुण नेटवर्थ किती आहे?- Usain Bolt net worth information in Marathi

Pinterest चे फायदे | Benefits of Pinterest in Marathi

  • Pinterest अँप वर अनेक मनोरंजक फोटो, व्हिडीओ देखील आहेत. त्यामुळे फेसबुक प्रमाणे Pinterest वर देखील meme मटेरियल असते.
  • आपल्याला जर आपल्या व्यवसायाला इतर लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर आपण Pinterest वर आपल्या व्यवसायाविषयी जाहिरात टाकून आपला व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
  • तुम्ही जर ब्लॉगर असाल तर तुम्ही स्वतःच्या ब्लॉगवरील फोटो टाकून आपल्या ब्लॉगवर देखील ट्राफिक घेऊन येऊ शकतात.
  • तुमचा युट्युब चॅनल असेल आणि त्यावर तुम्हाला ट्राफिक हवी असेल तर तीच व्हिडीओ Pinterest वर टाकून युट्युब व्हिडीओ वर View आणता येतात.
  • Pinterest वरून आपल्याला ग्राफिक डिझायनिंग साठी लागणारे मटेरियल फ्री मध्ये मिळू शकते.
  • याशिवाय अनेक quotes, माहितीपूर्ण संदेश देखील आपल्याला Pinterest वरून मिळू शकतात.

Pinterest वर खाते कसे सुरू करावे?

Pinterest वर खाते सुरू करायचे असेल तर खालील पायऱ्या फॉलो करा. 

  • सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये Pinterest App डाउनलोड करा किंवा Pinterest वेबसाईट सुरू करा.
  • अँप सुरू केल्यानंतर किंवा वेबसाईटवर आपल्याला साइन अप करण्यासाठी ईमेल साइन अप, फेसबुक साइन अप आणि गुगल साइन अप असे तीन पर्याय मिळतात.
  • आपण यापैकी कोणत्याही पर्यायाने साइन अप करू शकतो. ईमेल ने साइन अप करत असाल तर पुढच्या टॅब मध्ये तुम्हाला ईमेल आणि नंतर पासवर्ड टाकावा लागेल.
  • गुगलने लॉगिन करत असाल तर त्यामध्ये तुम्ही लगेच लॉगिन करू शकतात. तुम्हाला तुमचे नाव, वय, लिंग आणि देश यासारखी माहिती भरावी लागणार आहे.
  • पुढील स्टेप मध्ये तुमच्या आवडीच्या 5 गोष्टी तुम्हाला निवडायच्या आहेत. एकदा या 5 टॉपिक्सला तुम्ही निवडले की तुमचे pinterest खाते सुरू झालेले असेल. तुम्हाला तुम्ही निवडलेल्या टॉपिक्स निगडित काही फोटो किंवा व्हिडीओ आता स्क्रीनवर दिसायला लागतील.

Pinterest बिझनेस खाते

आपल्याला जर आपल्या फोटो आणि व्हिडिओला किती लोक बघत आहेत हे ट्रॅक करायचे असेल तर Pinterest आपल्याला बिझनेस खाते हा पर्याय देतात. गुगल ऍनालिटिक्स प्रमाणेच पिन्स चे देखील एनालिसीस तुम्हाला डेटा वरून करता येते.

See also  G20 presidency - जी टवेंटी प्रेसीडेन्सी म्हणजे काय - G20 presidency meaning in Marathi

Pinterest मध्ये पिन्स (Pins) काय असतात?

आपण इन्स्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्म वर ज्याप्रमाणे एखादा फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट सेव्ह करत असतो त्याचप्रमाणे आपल्या आवडीचे फोटो आपण Pinterest मध्ये पिन करून ठेवू शकतो. यालाच Pinterest वरील बुकमार्क म्हणून ओळखले जाते.

Pinterest मध्ये बोर्ड (Board) काय असतात?

आपल्या संगणकात ज्याप्रमाणे फोल्डर असतात त्याचप्रमाणे pinterest मध्ये बोर्ड असतात. Pinterest मध्ये असलेले पिन्स आपण या बोर्डस वर साठवून ठेवत असतो. आपल्याला आपल्या पिन्स ऑर्गनाईज करण्यासाठी बोर्डचा वापर करता येतो.

अनेक लोक आपल्या कला आणि आपले व्यवसाय Pinterest च्या माध्यमातून जगासमोर आणत आहेत. आपल्याला जे काही हवे आहे ते सर्व काही फोटो स्वरूपात आपल्याला Pinterest या प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे. त्यामुळे शैक्षणिक कार्यात किंवा बिझनेससाठी तुम्हाला जर काही फोटो हवे असतील तर Pinterest चा तुम्ही वापर करू शकता. 

मला अशा आहे तुम्हाला आता Pinterest information in Marathi या लेखातून Pinterest संबंधी सर्व माहिती समजायला मदत झाली असेल, तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.