पिके संजीवके म्हणजे काय ? Plant Growth Promoter Marathi information
भाजीपाला उत्पादनात पिकाची वाढ ही बाब महत्त्वाची आहे. म्हणून पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी जशी संजीवके उपयोगी पडतात त्याप्रमाणे वाढीचे नियंत्रण करण्यासाठी उपयोगी पडतात म्हणून त्यांना झाडाची वाढ नियंत्रके, असें संबोंधलें जाते.
पिके संजीवके अतिशय सूक्ष्म प्रमाणात वापरावी लागतात. त्यांचा वापर अंदाजाने करू नये. तसे केल्यास दुष्परिणाम होतात म्हणून दिलेल्या परिमाणातच त्यांचा वापर करावा.
संजीवके म्हणजे काय? What is Plant Growth Promoter
पीक संजीवके ग्रोथ हार्मोन्स किंवा प्लाट ग्रोथ हार्मोन्स या नावानेओळखली जातात. पिकांच्या वाढीवर आणि अतर्गत क्रियेवर नियंत्रणठेवण्याचे कार्थ ही संजीवके करतात. संजीवके हो नैसर्गिकरीत्या पिकामध्ये सूक्ष्म प्रमाणात असतात; परतु बाह्य वापरामुळे हे प्रमाण वाढविता येते. असे केल्यास त्याचे दृश्य परिणामत: पिकांची जोमदार वाढ इत्यादीमध्ये दिसून येते.
संजीवके द्रावणाची पद्धत
संजीवके हौ भुकटी अथवा द्रव स्वरूपात असतात. काही संजीवके अल्कोहोलमध्ये, तर काही पाण्यात विरघळतात. परतु, ही संजीवके बाजारामध्ये वेगवेगळ्या तीव्रतेची असल्याने उदा. जीए (९९ ठक्के ),
सौ.सी.सी. (५० टक्के ), इथेल (४० टक्के ) या तीव्रतेवरून संजीवके पाण्यात अथवा अल्कोहोल मिश्रण तयार करावे लागते. उदा. लिहोसीन ५० टक्के दोन मिलि एक लिटर पाण्यात मिसळल्यास १००० पी.पी.एम. द्रावण तयार होतें.
संजीवके वापरण्याच्या पद्धती : How to use Plant Growth Promoter
- बियाण्यांवर प्रक्रिया करून जमिनीवर फवारणी.
- पानांवर किंवाफळांवर फवारणी.
- द्रावण तयार करून जमिनीतून देणे.
- रोपांची मुळे बुडविणे
- फक्त विशिष्ट भागावर वापर.
- बियाणे/ रोपे यांवर उपचार करणें.
- जमिनीत निरवणी करून,
- संजीवके द्रावणामध्ये उत्पादन बुडविणे.
संजीवकाचा वापर करताना त्याबरोबर बुरशी नाशक, कीटकनाशक, पोषणट्रव्य इत्यादींचा वापर केल्यास पिकाची नियमित वाढ व त्याचप्रमाणे बुरशी, कीटक यांनाही आपण आला घालू शकतो.
पीक संजीवके ही नैसर्गिक किंवा प्रक्रिया करून निर्माण केलेली असतात.
पीक संजीवकांचे वर्गीकरण पाच वेगवेगळ्या गटांत केले आहे.ते खालीलप्रमाणे Types of Plant Growth Promoter
१) ऑझिन्स :
ऑक्झिन्स चे मुख्य कार्य वनस्पतींचे विभाजन व वनस्पतींच्या पेशींची लांबी वाढविणे, हे आहे. ऑक्झिनमुळे वनस्पतींच्या खोडातील पेशींचे दीर्घीकरण घडून येते, तसेच वनस्पतींच्या पेशींचे संख्या वाढते. त्यामुळे तंतुग्रंथी वाढतात.
वेलवर्गीय ऑक्झिनची निर्मिती ही प्रकाशाशी संबंधित असते. सूर्यप्रकाशात ऑक्झिनचे प्रमाण कमी होते, तर अंधारात ते वाढते. ऑक्झिनमुळे दुय्यम मुळे वाढण्यास मदत होते. फलधारणा होऊन फुले वाढीस लागल्यानंतर ऑक्झिनचा उपचार दिल्यास फळांचा आकार वाढून फळे काढणीस लवकर येतात. उदा.आय.ए.ए., आय.बी.ए.
२) सायटोकायनिन :
सायटोकायनिनचे मुख्य कार्य म्हणजे पेशीविभाजन आणि पेशींची वाढ करणे, हे आहे. सायटोकायनिन ही
संप्रेरक वनस्पतीमधील पेशींची वाढीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि ती पुढे चालू ठेवण्यासाठी आवश्यक असतात. याच्या वापरामुळे वनस्पतीमधील पेशींचे दीर्घीकरण होऊन पानांची लांबी-रुंदी वाढते.तसेच, वनस्पतींच्या अवयवाची (पाने, फळे, फुले इ.) जीर्णता लांबवते. उदा. कायनेटीन, झायटीन.
३) जिब्रेलीन्त :
या संजीवकात पेशीविभाजनाची व त्यांची लांबी वाढविण्यासाठी अथवा या दोन्ही क्रिया करण्याची क्षमता आढळते. जिब्रेलिन्समुळे वनस्पतींमध्ये पुष्पधारणा घडवून आणली जाते. या संजीवकांच्या वापराने काही वनस्पतींच्या बियाण्यांची सुप्तावस्था संपुष्टात आणता येते. तर, काही वनस्पतीवर याचा वापर केल्यास त्या उंच वाढतात. उदा. जी.ए १, जी.ए २.
४) वाढ नियंत्रके :
वनस्पतींच्या शरीरांतर्गत चालणाऱ्या क्रिया कमी करण्याची अगर पूर्णपणे थांबविण्याची, नियंत्रित करण्याची क्षमता या गटातील संजीवकांच्या अंगी आढळते. उदा. सायकोसील. ५) इथिलीन (इथ्रेल) : या संजीवकाचा वापर प्रामुख्याने फळांचा आकार व वजन वाढविणे तसेच फळास रंग येणे इ. गुणधर्मांसाठी करण्यात येतो. याचबरोबर, वनस्पतीमध्ये मादी फुलांची संख्या वाढविण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग होतो.
संजीवकांचा उपयोग कुठे करावा – Where to use Plant Growth Promoter
वनस्पतीची अभिवृद्धी :
भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी लैंगिक अभिवृद्धीच्या पद्धतीच्या म्हणजे बियांचा उपयोग केला जातो. तर, काही भाजीपाल्यासाठी अलैंगिक किंवा शाखीय पद्धतीचा उपयोग केला जातो. संजीवकाच्या वापरामुळे पेशीविभाजनाचे काम होऊन इच्छित भागात मुळे फोडण किंवा त्यांचे एकमेकांत मिसळणे शक्य होऊन कमी वेळात अधिक प्रमाणात अभिवृद्धीचे काम होऊ शकते. विविध शोभेच्या व फुलझाडांच्या अभिवृद्धीमध्ये संजीवकांच्या वापर करता येतो.
२) फळझाडांचा बहर :
बहारापूर्वी वनस्पतीची वाढ पूर्ण होणे गरजेचे असते; पण बऱ्याच वेळा सूर्यप्रकाश, हवामान यांच्यातील अनियमित बदलामुळे किंवा हंगामात फांदीच्या टोकास वाढ, संजीवकांचे ज्यादा प्रमाण तयार झाल्याने फळझाडांना बहर येत नाही. अशा वेळी वनस्पतीच्या आंतरक्रिया थांबवून अन्नसंचय प्रवृत्त करण्याकरिता
वनस्पतीची पानगळ करावी लागते. डाळिंब, अंजीर, लिंबू, संत्रा, मोसंबी यासारख्या फळझाडांवर हवामान व त्याची शारीरिक अवस्था लक्षात घेऊन वेगवेगळ्या संजीवकांच्या वापर करणे फायदेशीर ठरते. यासाठी
ऑक्झीन्स, सायटोकायनिन, जिबरेलीन्स व वाढ रोधके यांचा वापर केल्यास फळधारणा बहर येण्यास मदत होते.
३) फळे व बियांची वाढ :
अँस्टर, निशिगंध, शेवंतीमध्ये फुलांची वाढ पालेभाज्यांत पानांची वाढ, द्राक्ष, स्ट्रॉबेरीसारख्या फळांची वाढ,
वेलवर्गीय भाज्यांत मादी फुलांच्या प्रमाणात वाढ होते.
संजीवके वापरताना घ्यायची काळजी
१) संजीवकांचे योग्य प्रमाण व वाढीच्या अवस्था यांचा मेळ हवा. जमिनीवरून एखाद्या संजीवकाचा वापर करायचा असल्यास द्रावणाचे प्रमाण जास्त असावे. हवेतून फवारणीद्वारे द्यायचे असल्यास द्रावणाचे प्रमाण कमी असावे. संजीवके विरघळण्याचे योग्य ते द्रावण तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापरावे.
२) वेगवेगळ्या संजीवकांचे गुणधर्म भित्न असल्यामुळे उष्णता व हवेचेप्रमाण कमी असताना करावा. संजीवकांचा वापर शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी उष्णता व हवेचे प्रमाण कमी असताना करावा.
नवीन संजीवकांचा वापर पिकाच्या थोड्या भागावर करून अनुभव घेऊनच मग मोठ्या प्रमाणावर करावा.
३) संजीवकांच्या वापरासंबधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा विद्यापीठाच्या शिफारशीनुसार सांगितलेले संजीवक वापरावे. पिकांवर कोणती संजीवके व केव्हा वापरली आहेत, याची नोंद ठेवावी.
[catlist name=कृषितंत्रज्ञान numberposts=5]