पोस्ट ऑफिस च्या मासिक उत्पन्न योजनेच्या कमाल ठेवी मर्यादेमध्ये झाली वाढ -Post office monthly income scheme latest update in Marathi
मासिक उत्पन्न योजना ही पोस्ट ऑफिस स मधील खुप उत्तम योजना आहे ह्या योजनेअंतर्गत ठेवीदारांना दरमहा व्याजाची रक्कम प्राप्त होत असते.
पोस्ट ऑफिस मधील मासिक उत्पन्न योजनेचा सध्याचा चालु व्याजदर हा ७.१ टक्के इतका आहे.हया योजनेची एकुण मुदत देखील पाच वर्षे इतकी आहे.पण यात आपणास पाच पाच वर्षाने वाढ घडवून आणता येते.
याआधी पोस्ट ऑफिस च्या मासिक उत्पन्न योजनेची कमाल ठेव मर्यादा ही एका व्यक्ती करिता साडेचार लाख इतकी होती.अणि दोन व्यक्ती मिळुन संयुक्त खात्यासाठी म्हणजे जाॅईट अकाऊंट करीता ९ लाख इतकी ठेवण्यात आली होती.
पण आता ह्या मर्यादेत नवीन आर्थिक वर्षापासून वाढ करण्यात आली आहे १ एप्रिल २०२३ पासुन ह्या योजनेची कमाल ठेव मर्यादा ही एका व्यक्तीसाठी साडेचार लाखावरून ९ लाख इतकी करण्यात आली आहे.
अणि संयुक्त खात्यासाठी म्हणजे जाॅईट अकाऊंट करीता ही मर्यादा ९ लाखावरून १५ लाख इतकी करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या २०२३-२०२४ मधील अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी मासिक उत्पन्न कमाल ठेवीची मर्यादा साडे चार लाखावरून ९ लाख इतकी केली जाणार अणि संयुक्त खात्यासाठी देखील ही मर्यादा वाढविण्यात येणार असुन ९ लाखावरून ही मर्यादा १५ लाख इतकी केली जाईल अशी घोषणा केली होती.
ही ठेव मर्यादा देखील नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजे १ एप्रिल २०२३ पासून लागु केली जाणार आहे.
ज्या गुंतवणुकदारांना दरमहा चांगले उत्पन्न प्राप्त करायचे आहे अशा गुंतवणुकदारांसाठी ही एक उत्तम योजना ठरणार आहे.
ह्या खात्यात एक व्यक्ती आता ९ लाख रुपये गुंतवु शकतो अणि संयुक्त खाते असल्यास दोघे मिळून १५ लाखापर्यतची गुंतवणूक करू शकतात.अणि गुंतवणुकदारांना दर महिन्याला दहा हजार रूपये इतकी रक्कम प्राप्त होणार आहे.
ह्या नवीन वर्षामध्ये ह्या योजनेच्या व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ देखील करण्यात आली आहे.
आधी गुंतवणुकदारांना यात ६.७ टक्के इतके व्याज प्राप्त होत होते आता यावर ७.१ टक्के इतके वार्षिक व्याज भेटणार आहे.
अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही एक सुरक्षित योजना आहे.हया योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतातील कुठलाही अठरा वर्षे पुर्ण नागरीक आपले ह्या योजनेत खाते तयार करू शकतो.हया योजनेमध्ये खाते सुरू करायला आपणास हजार रुपये इतकी किंमत मोजावी लागु शकते.
पोस्ट ऑफिस योजनेचे काही नियम –
ह्या योजनेत पैसे गुंतवल्यावर एका वर्षाच्या अगोदर आपणास आपले ठेव रक्कम काढता येत नसते.
अणि समजा योजनेचा परिपक्वता कालावधी पुर्ण होण्याआधी तीन ते पाच वर्षे इतक्या कालावधी मध्ये एखाद्या व्यक्तीने यातुन आपले पैसे काढले तर त्याच्या मुददलामधुन एक टक्के इतकी रक्कमची कपात केली जाते.
जो व्यक्ती परिपक्वता म्हणजे मॅच्योरीटी कालावधी पुर्ण झाल्यावर आपले पैसे काढेल ती व्यक्ती योजनेचे सर्व लाभ घेण्यास पात्र ठरेल